तुमच्या मोबाईल फोनच्या मदतीने जबरदस्त व्हिडिओ निर्माण करायचा आहे?
हलती चित्र प्रत्येकाच्याच मेंदूमध्ये उत्सुकता निर्माण करतात.
मग ते तीन वर्षाचं मूल असो कि एखादी प्रौढ व्यक्ती, आणि म्हणूनच व्हिडिओ हा मार्केटिंग करणाऱ्यांचा सगळ्यात चांगला मित्र आहे . व्हिडिओ समोरच्याला थांबण्यास प्रवृत्त करतात आणि तुम्ही जे सांगताय त्यामध्ये रस निर्माण करतात.
असं असलं तरीही व्हिडीओची क्वालिटी उत्तम असण हे फार महत्वाचं आहे . पण तुमचं बजेटच खूप कमी असेल तर काय कराल ?
मी सांगतो काय करायचं ते, तुमच्या छोट्याशा खिशातला तो छोटासा मोबाईल आज खूपच जास्त शक्तिशाली झाला आहे. ह्या मोबाईल च्या मदतीने तुम्ही सुंदर जाहिराती आणि व्हिडीओज बनवू शकता.
यासाठी तुम्हाला फक्त काही मूलभूत गोष्टी माहिती असणे गरजेचे आहे.
नमस्कार , मी केतन गावंड - Online स्वराज्य सारथी , मिशन Online स्वराज्य ह्या प्लॅटफॉर्मचा संस्थापक आणि येत्या ३ वर्षात १ लाख Online स्वराज्य निर्माण करणं हा माझा ध्यास.
तुम्हाला मोबाइलच्या मदतीने दर्जेदार व्हिडिओ बनवायचे असतील तर हा ब्लॉग शेवट पर्यंत वाचा .
१) चांगलं नियोजन करा
मोबाईलच्या मदतीने तुम्ही एक सुंदर व्हिडिओ निर्माण करू शकता पण त्यासाठी तुमचं नियोजन चांगलं असणं गरजेचे आहे.
सगळ्यात आधी तुमच्याकडे स्टोरीबोर्ड असण्याची गरज आहे .
तुमच्या व्हिडिओमध्ये कोणकोणत्या गोष्टी येणे गरजेचे आहे ते तुम्ही आधीच ठरवणं महत्त्वाचं .
तुम्हाला आवडणारे आणि सोशल मीडियावर प्रसिद्ध असणारे काही व्हिडिओ जर तुम्ही नीट बघितले तर तुमच्या लक्षात येईल की या सगळ्या व्हिडीओ मध्ये एक पॅटर्न फॉलो केला जातो.
- चांगली हेडलाईन
- इंट्रोडक्शन
- प्रॉब्लेम
- सोल्युशन
- कन्क्लूजन
- कॉल टू ॲक्शन
हे सहा भाग तुमच्या व्हिडिओमध्ये असणे महत्त्वाचंआहे . माझ्या ऑनलाईन ब्रँड बिल्डिंग कोर्समध्ये मी याबद्दल सविस्तर बोलतो.
एकदा याची स्पष्टता आली की मग
- शूटमध्ये कोणत्या कोणत्या वस्तू लागणार आहेत?
- कोणतं ठिकाण योग्य आहे?
- म्युझिक कशा प्रकारची घ्यायची?
- टायटल्स कुठे कुठे द्यायचे?
- रंगसंगती कोणती वापरायची?, ह्या सगळ्या गोष्टी आपोआपच स्पष्ट होत जातात
ऐन वेळी एखादी गोष्ट विसरलात तर पूर्ण शूटिंगचाच विचका होऊ शकतो.
२) लाईटचा प्रभावी वापर करायला शिका.
हल्ली बऱ्याच प्रकारचे घरगुती शूटिंगसाठी लाईट्स देखील येतात त्यांचा वापर करून तुम्ही योग्य लाइटिंग निर्माण करू शकता.
एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की लाईट चेहऱ्याच्या आणि वस्तूंच्या समोरच्या बाजूने येणं खूप महत्त्वाचा आणि मागच्या बाजूला जेवढ्या लाईट असतील त्या टाळणं देखील तितकाच महत्वाचं.
३) हेडफोनच्या युगात आवाज फार महत्वाचा.
माझ्या इतक्या वर्षाच्या अनुभवातून मी तुम्हाला नक्की सांगतो की आजकल व्हिडिओ बघितला कमी जातो पण ऐकला जास्त जातो. प्रवासात,गाडीमध्ये आणि काम करत करत हेडफोनचा वापर होत असल्यामुळे आवाज उत्कृष्ट असणं खूप महत्त्वाचं.
चांगल्या म्युझिक साठी तुम्ही युट्युब ला जाऊन फ्री म्युझिक लायब्ररी मधून योग्य त्या म्युझिक डाऊनलोड करू शकता.
तुम्ही बोलताना मध्ये मध्ये निर्माण होणाऱ्या गॅप भरण्याचे काम एक उत्कृष्ट बॅकग्राऊंड म्युझिक करते.
मोबाईल वरून व्हिडिओ शूट करताना खणखणीत आवाजासाठी मोबाईल जवळ पकडणं महत्त्वाचं असतं. ते शक्य नसेल तर तुम्हाला लांब वायरचा हेडफोन किंवा उत्कृष्ट क्वालिटी चा ब्लूटूथ हेडफोन वापरणं कधीही चांगलं. मी माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये ब्लूटूथ हेडफोन चा वापर करतो आणि मला त्याचा खुप छान अनुभव आहे
लॉकडाउनच्या काळात मी जवळजवळ 170 व्हिडिओ रेकॉर्ड केलेत . चला व्हिडिओ बनवायला शिकूया या सीरिजमध्ये मी जवळजवळ 100 व्हिडिओ निर्माण केलेत .
हे व्हिडिओ नक्कीच तुम्हाला एक चांगला व्हिडिओ बनवण्यासाठी काय काय लागतं याची कल्पना देऊ शकतील.
४) रेकॉर्ड मोबाईलवर करा पण एडिटिंग कम्प्युटरवरच करा
मोबाईलवर व्हिडिओ रेकॉर्ड करणं सोपं आहे, पण जर एका मिनिटापेक्षा जास्त मोठा व्हिडिओ असेल तर मी तुम्हाला कॉम्पुटरवरच एडिटकरण्याचा सल्ला देईन.
एडिटिंग सॉफ्टवेअर मोबाईलवर अजून तेवढी चांगली झालेली नाहीत.
चांगला व्हिडिओ शूट करणं हे फार कॉम्प्लिकेटेड नाही ,जर तुमचं नियोजन चांगल असेल आणि छोटी-छोटी उपकरण तुमच्या बरोबर असतील.
लोक फेल होण्याचं नियोजन करत नाहीत पण ते नियोजन करत नाहीत म्हणून फेल होतात.
सुनियोजन करा आणि एक उत्कृष्ट व्हिडिओ बनवून या जगाला इम्प्रेस करा.
म्हणूनच मी म्हणतो लाईट्स , फोन आणि ऍक्शन !
हा ब्लॉग पूर्ण वाचल्याबद्दल आपले मनापासून आभार , ब्लॉग कसा वाटलं हे कॉमेंट मध्ये नक्की कळवा . या आणि अशाच पॉवरफुल टिप्स साठी माझा फेसबुक ग्रुप नक्की जॉईन करा
धन्यवाद !





