बुधवार, १३ जानेवारी, २०२१

लेडी बॉस 2021 !




झी मराठीवर 'अगं बाई सासूबाई' या सिरीयल मध्ये मी निवेदिता जोशी सराफ यांचा  डायलॉग मी ऐकला,प्रत्येक स्त्रीमध्ये एक उद्योजिका असतेच तिला फक्त बाहेर काढण्याची गरज आहे,योग्य मार्गदर्शन देण्याची गरज आहे.


तुमच्यामध्ये देखील एक उद्योजिका दडलेली आहे का ? 

नमस्कार माझं नाव केतन गावंड!

2008 पासून मी ट्रेनिंग क्षेत्रात काम करतो. 

मी मॅक्स न्यूयॉर्क लाइफ इन्शुरन्स (MNYL)  कंपनी मध्ये असताना माझ्याकडे अनेक महिला इन्शुरन्स ॲडव्हायझर यायच्या. वय साधारणतः 35 ते 45 वर्ष. 

महत्त्वाकांक्षी, सुशिक्षित,उच्चशिक्षित,अनुभवी,कार्यक्षम,तल्लख, संवाद कुशल आणि संवेदनशील. 




मला त्यांच्याबरोबर काम करताना नेहमीच आश्चर्य वाटायचं की इतके वर्ष ह्या फक्त गृहिणी म्हणून कशा जगत होत्या. 

त्यांच्याशी बोलताना मला जाणवायचं की कुटुंबासाठी आणि इतरांसाठी त्यांनी जबरदस्त त्याग केलेला आहे. 

स्वतःच्या आशा-आकांक्षा कौशल्य यांना बाजूला सारून त्या फक्त कुटुंबासाठी जगत आलेल्या आहेत. 

एक पर्व नवऱ्यासाठी आणि दुसरं पर्व मुलांसाठी खर्ची घातलेलं आहे आणि त्याना  ह्याबद्दल कधीच वाईट वाटलेलं नाही. 

आता नवरा आपल्या व्यवसायात आणि कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यात खूप जास्त व्यस्त झालाय त्यामुळे ,बायकोसाठी इच्छा असूनही तो वेळ काढू शकत नाही. 


मुलं अशा वयात येऊन पोहोचली आहेत की त्यांना आता आईच्या पंखा खालून बाहेर पडून स्वतःचे विश्व निर्माण करण्याची इच्छा सतावू लागली आहेत. 

या अशा विचित्र परिस्थितीमध्ये या महत्त्वाकांक्षी स्त्रियांना आयडेंटिटी क्रायसिस (Identity Crisis) निर्माण होऊ लागतो. 

स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी त्या धडपडू लागतात. 


काही, त्यांचे विसरलेले छंद जसं गाणं, फोटोग्राफी ,पेंटिंग ,शिवणकाम अशा वेगवेगळ्या छंदांना पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न करतात तर काही आपलं मन,किती पार्टी आणि मैत्रिणींमध्ये रमवतात. 

काही स्वावलंबी होण्यासाठी इन्शुरन्स किंवा नेटवर्क मार्केटिंग सारखं क्षेत्र निवडतात. 

काही छोटा-मोठा जॉब करायला सुरुवात करतात. 

पण या सगळ्या मागे फक्त स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याची सुप्त इच्छा असते,स्वतःला सिद्ध करून काहीतरी करून दाखवण्याची तळमळ असते. 

काहीना योग्य मार्ग सापडतो तर काहींच्या आत तेवणारा तो दिवा, काही दिवसातच सांसारिक जबाबदाऱ्या, ठरलेलं रुटीन आणि योग्य मार्गदर्शनाच्या अभावी विजून जातो.

प्लस या वयात येणाऱ्या हॉर्मोनल चेंजेस मुळे त्या जास्त चीडचिड्या , असुरक्षित आणि एकाकी व्हायला लागतात . 

तुम्ही देखील असाच काही अनुभवलय का ?  

मिशन ऑनलाइन स्वराज्य या प्लॅटफॉर्मची निर्मिती केल्यानंतर अशा अनेक महत्त्वाकांक्षी गृहिणी कम उद्योजकांच्या मी संपर्कात आलो. 

त्यांनी केलेली प्रगती पाहून मी थक्क झालोय. 

इतक्या साऱ्या जबाबदाऱ्या सांभाळून त्यांच्या पॅशनला न्याय देत, स्वतः ऑनलाइन स्वराज्य निर्माण करायला त्यांनी सुरुवात केली आहे. 

महत्त्वाचं म्हणजे 

  • त्यांचा दृष्टिकोन बदलला आहे
  • त्यांच्यात जास्त सकारात्मकता आलेली आहे
  • त्या स्वतःची जास्त काळजी घ्यायला लागल्या आहेत. 
  • स्वतःला व्यक्त करायला शिकल्या आहेत
  • व्हिडिओ बनवून युट्युबर बनल्या आहेत
  • ब्लॉग लिहून ब्लॉगर झाल्या  आहेत  
  • इतरांचे मनापासून कौतुक करायला शिकल्या आहेत
  • स्वतःच्या प्रायॉरिटी व्यवस्थित मॅनेज करायला लागल्या आहेत

त्यांच्या प्रगतीला मी जेव्हा समजून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा माझ्या लक्षात आलं की या वैश्विक महामारीत,लॉकडाऊन मध्ये आणि प्रचंड नकारात्मकता असताना देखील ह्या सगळ्यांनी आऊटस्टँडिंग रिझल्ट मिळवले आहेत. 

माझ्या लक्षात आलं की या आधीपासूनच सुपरस्टार आहेत,कित्येक जबाबदाऱ्या एकाच वेळी या लीलया पेलू  शकतात

योग्य टाईम मॅनेजमेंट करू शकतात

फक्त गरज होती ती 

  • योग्य मार्गदर्शनाची 
  • योग्य वातावरणाची आणि 
  • सातत्याने योग्य कृती करण्याची



ह्या तीन गोष्टी मिळाल्या की सामान्य वाटणारी गृहिणी देखील असामान्य गोष्टी करायला तयार होते. 

तुम्ही असं काहीतरी करण्याचा विचार करताय का ? 

कारण सध्याच्या बदलणाऱ्या वातावरणात आपल्या जबाबदार्‍यादेखील झपाट्याने बदलत आहेत. 

कदाचित आत्तापर्यंत प्रामुख्याने तुम्ही कुटुंबाची आणि मुलांची जबाबदारी घेतलीत , आता तुम्हाला स्वतःची जबाबदारी घ्यावी लागणार आहे, स्वतःला भविष्यासाठी तयार करावं लागणार आहे

कदाचित कुटुंबाची थोडीफार आर्थिक जबाबदारी देखील तुम्हाला उचलावी लागणार आहे. 

तुम्ही जे करताय तेच करत राहिलात तर तुम्हाला तेच मिळेल जे आत्तापर्यंत मिळाला आहे तुम्हाला असं काहीतरी हवं असेल जे आजपर्यंत मिळालं नाही तर तुम्हाला असं काहीतरी करावं लागेल जे तुम्ही आजपर्यंत केलेला नाही

  • सध्याच्या अनिश्चित परिस्थितीमध्ये तुमच्यासारख्या अनेक महिलांना मी, 
  • स्वतःचा आवाज ओळखून
  • योग्य ध्येय ठरवून 
  • टेक्नॉलॉजी हाताळायला तयार करून 
  • व्यक्त व्हायला मार्गदर्शन केलं  आहे आणि त्यांचे संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं आहे. 

त्या आता स्वतःच्या आयुष्याच्या लेडी बॉस झाल्या आहेत. 

श्रद्धा पाटील, माया दणके, अक्षदा विचारे,स्वाती अभंग,हर्षाली एडणकर ,प्रणोती शितोळे ह्या अशाच काही ऑनलाईन स्वराज्यातल्या रणरागिणी आहेत. 

यांना बघून तुमच्या मनात देखील जर काहीतरी करण्याची इच्छा जर बळावून आली तर मला नक्की कळवा. 

एका नवीन आयुष्याची सुरुवात करून करण्यासाठी जर तुम्हाला मार्गदर्शन हवे असेल,

आनंदी, संयमी आणि भक्कम आयुष्य जगायचं असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून लेडी बॉस 2021 तीन तासाच्या वर्कशॉपसाठी रजिस्टर करा व माझं ऑनलाइन स्वराज्यनिर्मीतीच्या सहा पायऱ्या हे पुस्तक मोफत मिळवा. 

तुमच्यामध्ये दडलेल्या स्वतःचं अस्तित्व सिद्ध करू पाहणाऱ्या त्या लेडी बॉसला माझा सलाम, सदैव तुमच्या सेवेत तत्पर . 

ऑनलाईन स्वराज्य हा आपल्या सगळ्यांचा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि आपण तो मिळवणारच. 





सोमवार, ४ जानेवारी, २०२१

2021- ह्यावर्षी स्वतःला हे पाच प्रश्न विचारा? -१० पट रिसल्ट्स मिळवा !

 

2021 ची नुकतीच सुरुवात झालेली आहे

आपण सगळे प्रचंड उत्साह,आकांक्षा आणि अपेक्षेने 2021 कडे बघत आहोत. 


दरवर्षी आपण असाच उत्साह अनुभवतो, पण जानेवारी संपेपर्यंत हा सगळा उत्साह हरपून जातो आणि आपण पुन्हा आपल्या रेग्युलर रुटीनमध्ये बिझी होतो. 

रिसर्च सांगतो की 98 टक्के संकल्प हे 8 जानेवारीपर्यंत कचऱ्याच्या डब्यात गेलेले असतात.

हे असं का होतं?  कारण आपण नव्याचे नऊ दिवस (इथे खरंतर आठच दिवस) आपला उत्साह टिकून ठेवू शकतो. 

दुसरं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आपण आत्मपरीक्षण करायला विसरतो. 

तुम्ही जे करताय तेच करत आलात तर तुम्हाला तेच मिळेल जे आजपर्यंत मिळालं आहे, तुम्हाला असं काहीतरी हवं असेल ते आजपर्यंत मिळालं नाही तर असं काहीतरी करावं लागेल ते आजपर्यंत केलेलं नाही. 

सॉक्रेटिस जगातला एक महान तत्ववेत्ता सांगून गेलाय जर तुम्ही तुमच्या अनुभवांचं पृथक्करण करून आयुष्य तुम्हाला काय शिकवतं  आहे हे समजून घेत नसाल तर तुम्ही तुमचे आयुष्य व्यर्थ घालवताय. 

कदाचित ह्याच कारणामुळे आपण दिवसांमागुन आठवडे, आठवड्या मागून महिने आणि महिन्या मागून वर्ष व्यर्थ घालवत आलो आहोत. 

ह्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला असे पाच प्रश्न सांगणार आहे जे जर तुम्ही स्वतःला आत्ता आणि दर महिन्याच्या सुरुवातीला परत परत विचारले तर कदाचित तुमच्या ध्येयाची  गाडी तुम्ही योग्य रुळावर ठेवू शकाल. 

नमस्कार! माझं नाव केतन गावंड, ऑनलाइन स्वराज्यसारथी, येत्या तीन वर्षांमध्ये एक लाख उद्योजकांना त्यांचं ऑनलाइन स्वराज्य उभं करायला मदत करणे हा माझा ध्यास. 

चला तर मग सुरुवात करूया. 


१) मी माझ्या ध्येयाच्या दिशेने खरंच पुढे जातोय का?

  • गेल्यावर्षी मला वजन कमी करायचं होतं
  • मला बरीच पुस्तकं वाचायची होती 
  • माझे नाते संबंध सुधारायचे होते
  • करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी काही नवीन स्किल्स शिकायच्या होत्या
  • माझ्या तब्येतीवर आणि मानसिकतेवर जाणीवपूर्वक काम करायचं होतं
अशा बर्‍याच गोष्टी मला करायच्या होत्या. 

वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात मी माझ्या संकल्पाची भलीमोठी यादी बनवली आणि पंधरा दिवसातच एक ना धड भाराभर चिंध्या अशी अवस्था झाली होती. 

रॉबर्ट कोच यांनी लिहिलेलं एक उत्कृष्ट पुस्तक - 80-20 Principle 

यात रॉबर्ट कोच म्हणतात की 20 टक्के गोष्टींवर 80 टक्के परिणाम अवलंबून असतात. 

मग अशा कोणत्या 20% गोष्टी आहेत ज्या जर मी रोज सातत्याने करायला सुरुवात केली तर त्याचे 80 टक्के परिणाम माझ्या आयुष्यात मिळतील हे यावेळी ठरवणे अतिशय गरजेचे आहे

फार जास्त गोष्टींवर फोकस न करता महत्वाच्या निवडक अशा काही गोष्टींवर तुमचं संपूर्ण लक्ष केंद्रित करा ,कमीत कमी 66 दिवस त्या सवयींवर काम करा आणि एकदा त्या तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग झाला की मग पुढच्या गोष्टींचा विचार करा. 


माझ्या ध्येयाच्या दिशेने कमीतकमी कोणत्या गोष्टी करण्याची  गरज आहे ज्या मला माझ्या ध्येयापर्यंत पोहोचवतील ? 

जेव्हा पोहोचायचे कुठे हे स्पष्ट असतं, तेव्हा रस्ता आपोआप दिसायला लागतो. 
तुमची ध्येय स्पष्ट असतील तर त्यांच्या पर्यंत पोहोचण्यासाठी सातत्याने कोणत्या गोष्टी करायला पाहिजे याचा आराखडा मनात स्पष्ट करा. 
  • नऊ महिन्यात कुठे?
  • सहा महिन्यात कुठे?
  • तीन महिन्यात कुठे?
  • महिन्याभरात कुठे?
 हा जर roadmap' तुम्हाला स्पष्टपणे दिसत असेल तर तुम्ही ध्येयापर्यंत पोहोचण्याची संभावना शक्यता खूप जास्त असते. 

२)मी योग्य दिशेने आणि एकाच देशाने चाललोय का?



परस्पर विरोधी ध्येयांमुळे माझी ओढाताण होते आहे का ? 
कळत-नकळत आपण वेगवेगळ्या ध्येयांना  एकाच वेळेला पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. 
कल्पना करा एक गाडी उभी आहे आणि तुम्ही तिला मागून धक्का मारत आहात , समोरून कोणीतरी दुसरा धक्का मारतोय  आणि बाजूच्या दोन्ही दिशेने इतर दोन जण धक्का मारत आहेत.
मला सांगा ती कार जागेवरून हालेल का?
शक्यच नाही, कळत-नकळत आपण हेच करत असतो. 
  • आपल्याला करिअरमध्ये काहीतरी मोठं साध्य करायचं असतं आणि त्याच वेळी आपण करमणुकीची देखील बरीच ध्येय लिहून ठेवलेली असतात . 
  • आपल्याला तब्येत खूप चांगली करायची असते आणि त्याच बरोबर आपण पार्ट्यांचं आणि गेट-टूगेदर  मनोमन प्लॅनिंग करून ठेवलेलं असतं आणि ह्यामुळे आपल्या ध्येयांची गाडी जागेवरून हलतच नाही. 
यावर्षी हा प्रयत्न नक्की करा की तुमची ध्येय ही एकाच दिशेमध्ये आहेत, परस्परविरोधी ध्येय शक्यतो टाळण्याचा प्रयत्न करा. 

३)मी जे करतोय त्यातून मला निखळ आनंद मिळतोय का?



माझ्या ध्येयांच्या ध्यासापायी मी आनंदाची गळचेपी करतोय का?

आपली विल पावर फार कमकुवत असते. 
वर्षाच्या सुरुवातीला आठ दहा दिवस आपण तिच्या जोरावर काही गोष्टींना नकार देऊ शकतो पण त्यानंतर स्वतःवरचा ताबा सुटायला वेळ लागत नाही.
बऱ्याच वेळेला आपण प्रगतीसाठी अशी ध्येय निवडतो ज्यासाठी आपण आपल्या आनंदाचा त्याग  करतो. 

माझ्या आतापर्यंतच्या अनुभवातून मी तुम्हाला सांगतो की तुम्ही जे करताय त्यातून जर तुम्हाला आनंद मिळत नसेल तर दीर्घकाळ तुम्ही ती गोष्ट करू शकणार  नाही. 
कदाचित ते काम करण्याचं कौशल्य तुमच्याकडे असेल पण जर ते करताना आनंदाची अनुभूती नसेल तर फार काळ ते तुम्ही करू शकणार  नाही. 

४) माझ्या कामाचे चक्रवाढ परिणाम मिळतील का?



2+2+2+2+2+2+2+2+2+2=20 
2X2X2X2X2X2X2X2X2X2=1024 

गणित असे दिसायला सोपे पण परिणाम फार वेगळे आहेत.
आपण बऱ्याच वेळेला बऱ्याच गोष्टींची धरसोड करतो आणि त्यामुळे आपली प्रगती दोन अधिक दोन अशीच होत राहते.
जे लोक सातत्याने दहा हजार तास त्यांच्या आवडत्या क्षेत्रात काम करतात  त्यांची प्रगती दोन गुणिले दोन गुणिले दोन अशी होते. 
माझ्या या करिअरमध्ये पहिल्या दहा वर्षात मी आठ जॉब बदलले आणि नंतरच्या दहा वर्षात मी ट्रेनिंगला चिकटून राहिलो. 
माझ्या शेवटच्या जॉब मध्ये मी वर्षाला जेवढा पगार घ्यायचो तेवढे उत्पन्न मी काही वर्षापूर्वी एका महिन्यात मिळवू शकलो. 
आपल्या सातत्याचे चक्रवाढ  परिणाम काय असतात हे  मी ट्रेनिंग मध्ये आल्यावर अनुभवले. 

आता मी ऑनलाइन मध्ये काम करायला सुरुवात केली आहे आणि मला खात्री आहे की जर मी दहा हजार तास ऑनलाईन क्षेत्रात देखील काम केलं तर हे चक्रवाढ परिणाम मी माझ्या कामात लवकरच अनुभवेन.

५) गेल्या वर्षी मला कुठे पोहोचायचं होतं?



मी तिथे  पोहोचलो/ नाही पोहोचलो? आणि नाही तर का नाही?

हे प्रश्न खरंच आपल्याला खूप काही शिकवून जातात
इंग्लिश मध्ये खूप सुंदर म्हण आहे , Strengthen your strength and weaken your weakness.
  • ज्या गोष्टी केल्यामुळे तुम्हाला चांगले परिणाम मिळाले ते जास्तीत जास्त करण्याचा निश्चय करा. 
  • ज्या गोष्टींमुळे तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकला नाही त्या कटाक्षाने टाळण्याचा प्रयत्न करा. 

स्टीव्ह जॉब्स एक सुंदर वाक्य,तो म्हणतो की यशस्वी लोकच  यशस्वी होण्याचं सगळ्यात मोठं कारण हे ते काय करतात हे नसून कोणत्या हजार गोष्टींना नाही बोलण्याची ताकद ते ठेवतात ते आहे. 

कदाचित ह्या एका उत्तरातून तुम्ही 2021 मध्ये कित्येक गोष्टी टाळण्याची यादी बनवू शकाल आणि ज्या गोष्टींमुळे तुम्हाला चांगले रिझल्ट मिळाले त्या जास्तीत जास्त करू शकाल. 

तात्पर्य 2021 मध्ये आपण ठरवलेली ध्येय जर साध्य करायची असतील तर नियमित आत्मपरीक्षण करून आपल्या ध्येयाला चिकटून राहण्याची गरज आहे. परस्पर विरोधी गोष्टी टाळून, स्पष्ट विचारांनी, योग्य दिशेने पुढे जाण्याची गरज आहे. 

हा ब्लॉग शेवटपर्यंत वाचल्याबद्दल धन्यवाद!

मला पूर्ण विश्वास आहे की या पाच प्रश्नांच्या मदतीने तुम्ही 2021 ला एक जबरदस्त वर्ष नक्कीच बनवू शकाल. 

तुम्हाला ह्या विषयी जर काही प्रश्न असतील तर कमेंट मध्ये नक्की विचारा. 

तुमच्या ध्येयपूर्तीसाठी योग्य वातावरणात राहण्यासाठी आमची मिशन ऑनलाइन स्वराज्य ही कम्युनिटी नक्की जॉईन करा. 

ऑनलाईन स्वराज्य हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे आणि आपण तो मिळवणारच!













आयुष्यावर प्रभुत्व मिळवण्यासाठी स्वतः वर प्रभुत्व मिळवा - ह्या मूलभूत गोष्टींवर काम करा

आयुष्य हातातून चाललंय असं तुम्हाला वाटतं का ? तुमच्या सवयींवर तुमचा ताबा नाही असं तुम्हाला वाटतं का? सतत चिडचिड होते का ? तुमची करिअर कुठेत...