इंग्लिश मध्ये एक खूप सुंदर म्हण आहे
When the destination is clear decisions automaticजेव्हा जायचं कुठे हे स्पष्टपणे माहिती असतं तेव्हा निर्णय घेताना जास्त विचार करण्याची गरज पडत नाही.
प्रत्येक क्षणी आपल्या सगळ्यांच्या समोर दोन पर्याय असतात ,एक जो आपल्याला आपल्या ध्येयाकडे घेऊन जातो आणि दुसरा जो आपल्याला आपल्या ध्येयापासून लांब घेऊन जातो.
ज्या व्यक्तींकडे त्यांचे ध्येय अस्पष्ट असते , ते बहुतांशी तोच मार्ग निवडतात जो त्यांना त्यांच्या ध्येयाच्या आणखीन जवळ घेऊन जातो.
दुर्दैवाने 98 टक्के लोकांकडे स्पष्ट ठरवलेली आणि प्रेरणा देणारी अशी निश्चित ध्येय नसतातच आणि म्हणून ते आयुष्यात बराच काळ समुद्राच्या प्रवाहात पडलेल्या एखाद्या ओंडक्याप्रमाणे वाहत राहतात आणि लाट येईल त्या किनाऱ्याला पोहोचत राहतात.
तुम्हाला देखील अजून स्पष्ट ध्येय असण्याचं महत्त्व पटलेलं नाही आहे का तर मग हा ब्लॉग तुमच्यासाठीच आहे.
नमस्कार माझं नाव केतन गावंड, गेल्या तेरा वर्षापासून मी अडीच लाख पेक्षा जास्त प्रशिक्षणार्थींना ध्येय निश्चितीचे महत्व शिकवत आलो आहे.
आज पासून मी तुम्हाला ध्येयनिश्चिती का महत्त्वाची आहे, तुमचे ध्येय कसे असावे ,ते पूर्ण करण्यासाठी काय काय करावे अशा वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन करायला सुरुवात करणार आहे.
चला तर मग सुरुवात करुया.
रिसर्च असं सांगतो की स्पष्ट हे असणाऱ्या लोकांची अचीवमेंट ध्येयं नसणाऱ्यांपेक्षा 275 टक्के जास्त असते. मला वाटतं हे एकच कारण आपल्याला ध्येय निश्चिती करण्यासाठी प्रवृत्त करणारे आहे ,तरीपण आपण आणखी थोडं खोलात जाऊ या.
१-ध्येयनिश्चितीमुळे आपण जास्त चांगले बनतो
कल्पना करा की तुम्ही आज पॉईंट A ला उभे आहात आणि तुम्हाला पॉईंट B ला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचायचं आहे.
पॉईंट A आणि पॉइंट B ह्याच्या मधली दरी आहे ती मुख्यत्वे चार गोष्टींवर अवलंबून असते
-एकतर ज्ञानाची कमतरता आहे
-दृष्टिकोनाची कमतरता आहे
-कौशल्यांची कमतरता आहे किंवा
-सवयींची कमतरता आहे
जेव्हा निश्चित ध्येय ठरवून तुम्ही स्वतःमध्ये ज्ञान, दृष्टिकोन, कौशल्य आणि सवयी यांच्यात सुधारणा करायला सुरुवात करता तेव्हा तुम्ही जास्त सक्षम जास्त चांगले बनता .
२-ध्येय आपल्याला वेळेचे व्यवस्थापन करायला भाग पाडते
परीक्षेचा सगळ्यात चांगला अभ्यास टाईम टेबल डिक्लेअर झाल्यावर होतं कारण आता आपल्या डोळ्यासमोर ध्येय स्पष्ट असतं. वेळेचं उत्तम नियोजन करून आपण कामाला लागतो आणि बऱ्याच वेळेला आपलं ध्येय पूर्ण करण्यात यशस्वी होतो.
जसं हा नियम परीक्षेला लागू पडतो तसंच आयुष्यातल्या विविध ध्येयांनादेखील हा लागू पडतो . एकदा ध्येय ठरले आणि ते प्राप्त करण्याची तारीख ठरली की आपोआप आपण ॲक्शन मध्ये येतो आणि कमीत कमी वेळात जास्तीत जास्त मिळवण्यासाठी प्रयत्न करतो.
३- ध्येयामुळे आत्मविश्वास वाढतो
मी माझ्या कारकिर्दीत अश्या असंख्य व्यक्ती बघितल्या आहेत ज्यांच्या आत्मविश्वासात फक्त ध्येय ठरवल्यानंतर प्रचंड वृद्धी झालेली आहे .
याउलट ज्या व्यक्तींकडे काहीही साध्य करण्याची ध्येय नसतात ते गलितगात्र होऊन हरवल्यासारखे जगत असतात ,म्हणून निश्चित अशी ध्येये ठरवा आणि आत्मविश्वासाने जगा.
४- ध्येयामुळे आपल्याला स्पष्टता मिळते
एकदा आपल्याला तीन वर्षात काय साध्य करायचं हे स्पष्ट असेल तर मग
-दोन वर्षात आपण कुठपर्यंत पोहोचायला पाहिजे
-वर्षभरात पर्यंत पोहोचायला पाहिजे
-सहा महिन्यात आपल्याला काय साध्य करायला लागेल
- तीन महिन्यात काय मिळवायला लागेल
- महिन्याभरात कुठपर्यंत आपली मजल गेली पाहिजे
-आठवडाभरात कुठपर्यंत पोहोचणं महत्वाच राहील
हे सगळे प्रश्न आपल्याला पडायला लागतात आणि एका निश्चित गेम प्लान ने आपण वाटचाल करायला सुरुवात करतो.
बऱ्याच व्यक्तींना आयुष्यात ही क्लारिटी नसते. दिवसभरात समोर येणारं , डोळ्यांना उत्तेजित करणारे किंवा मनाला हवहवसं वाटणारं कामकरण्यात त्यांचा दिवस निघून जातो.
जर ते नोकरीमध्ये असतील तर समोर वाढून ठेवलेलं काम करण्यात त्यांचं आयुष्य निघून जातं आणि मग अचानक मी नक्की काय करतोय हा प्रश्न त्याला पडायला लागतो.
याउलट स्पष्ट ध्येय असणारी व्यक्ती ही आपल्या ध्येयासाठी रोज जाणीवपूर्वक वेळ बाजूला करायला लागते आणि थोडं थोडं का होईना आपल्या ध्येयाच्या दिशेने प्रगती करत राहते.
तात्पर्य निश्चित ध्येय असणारी व्यक्ती आयुष्यात जास्त चांगली बनते, वेळेचे व्यवस्थापन करायला शिकते ,तिचा आत्मविश्वास वाढतो आणि एका स्पष्ट नियोजनाने ती आयुष्यात पुढे चालत राहते.
मला नक्की माहिती आहे की ह्या ब्लॉग मधून तुम्हाला ध्येय निश्चित करण्याची प्रेरणा नक्कीच मिळाली असेल.
तुम्हाला ध्येयनिश्चिती करून ती पूर्ण करण्याबाबत आणखीन जबरदस्त टिप्स हव्या असतील तर नक्कीच ह्या ब्लॉगवर कमेंट करा.
लवकरच मी तुमच्या सगळ्यांसाठी ध्येयनिश्चितीचा तीन तासाचा एक जबरदस्त लाईव्ह वर्कशॉप घेऊन येत आहे ,जो तुम्हाला आयुष्यात वेगाने प्रगती करण्यासाठी नक्कीच मदत करेल.
वर्कशॉप अटेंड करण्याची प्रबळ इच्छा निर्माण झाली असेल तर कंमेंट मध्ये ध्येनिश्चिती असं टाईप करा.
वेळेचं, पैशाचं आणि निवडीचं स्वातंत्र्य मिळवून तुम्ही तुमचं उर्वरित आयुष्य स्वतःच्या मर्जीने जगावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की कळवा.
साडेसहा हजार समविचारी ध्येयवादी लोकांची कम्युनिटी जॉईन करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आमचा मिशन ऑनलाइन स्वराज्य हा ग्रुप नक्की जॉईन करा
वर्कशॉप अटेंड करण्याची प्रबळ इच्छा निर्माण झाली असेल तर कंमेंट मध्ये ध्येनिश्चिती असं टाईप करा.
वेळेचं, पैशाचं आणि निवडीचं स्वातंत्र्य मिळवून तुम्ही तुमचं उर्वरित आयुष्य स्वतःच्या मर्जीने जगावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की कळवा.
साडेसहा हजार समविचारी ध्येयवादी लोकांची कम्युनिटी जॉईन करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आमचा मिशन ऑनलाइन स्वराज्य हा ग्रुप नक्की जॉईन करा
https://www.facebook.com/groups/884927385661089/?ref=share
ऑनलाईन स्वराज्य हा आपल्या सगळ्यांचा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो आपण मिळवणारच!
ऑनलाईन स्वराज्य हा आपल्या सगळ्यांचा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो आपण मिळवणारच!






