बुधवार, ९ फेब्रुवारी, २०२२

चालढकल - तुमचा सगळ्यात मोठा शत्रू

 चालढकल - तुमचा सगळ्यात मोठा शत्रू



"कल करे सो आज कर,
आज करे सो अभी,
नही करेगा अभी,
तो होगा नही कभी".

पण आपण नेहमीच्या आयुष्यात त्याच्या अगदी विपरीत वागतो.
सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात हे वाक्य अगदी उलट आहे.

'आज करे सो कल कर,
कल करे सो परसो,
नहीं करेगा परसो,
तो होगा नही बरसो'.


नवीन वर्षाची सुरुवात होऊन साधारण एक महिना होऊन गेला आहे आणि या वर्षाच्या सुरुवातीला आपण स्वतःला जी वचने दिली होती त्याच्यावर आपण आतापासूनच चालढकल सुद्धा करायला लागलो आहोत. कदाचित तुम्ही ठरवलेल्या गोष्टींपैकी किती तरी तुम्ही विसरले देखील असाल.

★तुम्हाला तुमची ध्येयं पूर्ण करण्याची इच्छा असेल आणि चालढकल न करता सातत्याने कार्यक्षम राहण्याची इच्छा असेल तर हा ब्लॉग तुमच्यासाठीच आहे.

नमस्कार, मी केतन गावंड. ऑनलाईन स्वराज्य सारथी, मिशन ऑनलाईन स्वराज्य या प्लॅटफॉर्मचा संस्थापक आणि येत्या तीन वर्षात स्वराज्य सुपर ग्रोथ सिस्टिमच्या मदतीने एक लाख ऑनलाईन स्वराज्य निर्माण करणे हा माझा ध्यास.

चला तर मग, चालढकल करणाऱ्यांची पाच महत्त्वाची कारणं आणि त्यांना हाताळण्याचे 5 सोपे उपाय आता आपण बघुया.

१) नेहमी परफेक्शनचा विचार करणे:


आपल्यापैकी प्रत्येकाची इच्छा असते की आपण केलेलं प्रत्येक काम हे परफेक्टच असावं. इतर आपल्या कामाबद्दल काय बोलतील याची आपण खूपच जास्त चिंता करतो आणि त्या चिंतेपाई आपण सुरुवातच करत नाही.
मी माझ्या अनुभवातून तुम्हाला सांगू शकतो की या जगात परफेक्ट असं काहीच नसतं. आपण सगळेच प्रॉडक्ट इन मेकिंग आहोत. जसजसे आपण कृती करत जातो आणि आपल्या कृतीतून शिकत जातो तसा आपण परफेक्शनच्या जास्त जास्त जवळ जाऊ लागतो, पण त्यासाठी ॲक्शन घेणं खूप महत्त्वाचे आहे.

◆Visualisation - परफेक्शन टाळण्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी डोळे बंद करून तुम्हीं ठरवलेलं काम पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला कसं वाटेल? त्यातला आनंद, समाधान याच्याबद्दल जाणीवपूर्वक विचार करण्याची गरज आहे. तुम्हाला कल्पनेतील ही कार्यपूर्ती ऊर्जा देईल काहीतरी करण्यासाठी प्रवृत्त करेल.
म्हणून परफेक्शन विसरा आणि कामाला लागा.

२) फक्त स्वप्न आणि कृती अजिबात नाही:


यालाच आपण मुंगेरी लाल के हसीन सपने असं म्हणतो.
स्वप्न आणि सत्याच्या सीमारेषेवर माझ्या स्वप्नातला बंगला तरंगतो, स्वप्नात तो कळस गाठतो, मात्र सत्यात तो दुभंगतो. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी हे अनुभवलं असेल.
मानवी मन स्वप्नांचे मनोरे बांधण्यात पटाईत असतं, पण जेव्हा कृती करायची वेळ येते तेव्हा मात्र ते लगेच कच खातं.
ह्याला टाळण्यासाठी ऑनलाइन स्वराज्यात आपण एक कॉन्सेप्ट वापरतो आणि ती म्हणजे इम्परफेक्ट ॲक्शन.

छोटी का होईना पण कृती करायला सुरुवात करा. ही कृतीच तुम्हाला ताकद देईल, इंग्लिश मध्ये एक खूप सुंदर म्हण आहे, 'Motion Will change your emotions' (मोशन विल चेंज युवर इमोशन)
कालच्यापेक्षा आज मी थोडं पुढे आलोय ही भावनाच खूप सुखदायी असते आणि मग ते आपल्याला पुढची कृती करण्यासाठी प्रवृत्त करते. म्हणून स्वप्नांच्या दुनियेतुन बाहेर या आणि कृती करायला सुरुवात करा.

३)कामाचा विचार करूनच गलितगात्र होऊन जाणं:


ह्याचा अनुभव आपल्याला वर्षाच्या सुरुवातीला नक्की येतो. कितीतरी आरंभशूर व्यक्ती मोठी मोठी ध्येय ठरवतात पण नंतर शांतपणे विचार केल्यावर ते प्रचंड घाबरून जातात, कारण आपल्या आवाक्याबाहेरची गोष्ट करण्याचा प्रयत्न ते करत आहेत; अस त्यांचं अंतर्मन त्यांना सांगत राहतं.
तुम्हाला देखील जर हे अनुभव असेल तर यापुढे छोट्या छोट्या गोष्टी करा.

'Eat the elephant piece by piece' (इट द एलिफंट पीस बाय पीस)
अख्खा हत्ती खाणं कदाचित तुम्हाला शक्य नसेल तर त्याला छोट्या छोट्या तुकड्यात विभागा आणि रोज एक छोटा तुकडा खाण्यास सुरुवात करा . काही दिवसातच अख्खा हत्ती तुम्ही फस्त कराल.
मला माहिती आहे आपल्यापैकी कोणीच हत्ती खात नाही पण हे उदाहरण डोक्यात अगदी चपखल बसत म्हणून ईथे मी ते देण्याचा प्रयत्न केला आहे.
त्यानंतर तुम्ही ज्या छोट्या छोट्या उपलब्धता मिळवाल त्यांचं सेलिब्रेशन करा, तुमच्या या अचीव्हमेंट इतरांबरोबर शेअर करा, त्यांच्याकडून वा ह वा आणि प्रोत्साहन मिळवा.

४) नको त्या गोष्टीत अडकून राहणे:


दिवस गेला रेटारेटीत आणि अंधारात कापूस वेचीत ही म्हण चालढकल करणाऱ्यांना तंतोतंत लागू पडते. सकाळी उठल्यापासून ते अशा काही गोष्टी करण्यात प्रचंड बिझी असतात की दिवस त्यांच्या डोळ्यांसमोरून कधी संपतो हे त्यांच्या लक्षातच येत नाही आणि संध्याकाळ झाली की मी दिवसभरात प्रॉडक्टिव असं काहीच केलं नाही याची बोच त्यांच्या मनाला लागते.
महान ग्रीक तत्ववेत्ता गोथे ह्याचं एक अजरामर वाक्य,

'There is never enough time to do everything, but there is always enough time to do the most important thing'.

सगळं काही करण्यासाठी तुमच्याकडे कधीच पुरेसा वेळ नसतो पण महत्त्वाच्या गोष्टी करण्यासाठी तुमच्या कडे गरजे पेक्षा जास्त वेळ असतो.
दिवसाच्या सुरूवातीलाच तुमच्या प्रायॉरिटी ठरवा.

◆८०-२० प्रिंसिपल
२०% गोष्टी आपल्याला ८०% रिझल्ट देतात, दिवसाच्या सुरुवातीला जर तुमच्या लक्षात आलं की आज दिवसभरात मला कोणत्या २०% गोष्टी करायच्या आहेत, ज्या मला ८०% रिझल्ट देतील तर तुम्ही तुमची प्रायोरिटी व्यवस्थित सेट करू शकता.

मिशन ऑनलाईन स्वराज्यामध्ये रोज सकाळी आपण मॉर्निंग रिच्युअल्स घेतो त्याच्यामध्ये आपण सहा वाजताच दिवसभराच्या प्रायॉरिटी ठरवतो आणि मग आपण चालढकल करत नाही.

तुम्हाला देखील जर हे मॉर्निंग रिच्युअल्स अटेंड करायचे असतील तर ह्या लिंक वर क्लिक करून https://bit.ly/34um7te आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करा.

बऱ्याच गोष्टी महत्त्वाच्या असतात पण तातडीच्या नसतात; अशाच गोष्टींची आपण चालढकल करतो. खाली दिलेल्या चित्रामध्ये तुमच्या लक्षात येईल की या सगळ्या गोष्टी ज्या आज केल्या नाही तर फरक पडत नाही पण उद्या जाऊन त्याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स निर्माण होणार आहेत त्यांच्यासाठी आत्तापासूनच वेळ द्यायला सुरुवात करा.

५) विचलित होणे:


चालढकल करण्याचं हे आणखीन एक खूप महत्त्वाचं कारण. आपण आपल्याला ध्येयपूर्तीसाठी महत्त्वाचं असं काम करायला सुरुवात करतो आणि दुसऱ्या मिनिटाला एखादा मेसेज, एखादं नोटिफिकेशन, एखादा कॉल, एखादा मित्र आपल्याला डिस्ट्रॅक्ट करतो आणि जोपर्यंत आपल्या लक्षात येतं की, आपण डिस्ट्रॅक्ट झालोय तोपर्यंत काही वेळा अर्धा तास आणि कधीकधी तर अर्धा दिवस निघून गेलेला असतो.
दोन प्रकारच्या डिस्ट्रॅक्शनपासून, आपल्याला दूर राहण्याची गरज आहे.

●आंतरिक डिस्ट्रॅक्शन:
- आपल्याला स्पष्टता नसल्यामुळे (Lack of clarity)
- भुकेमुळे, तहान लागल्यामुळे आणि
- आपण विचारांचं व्यवस्थापन नीट न केल्यामुळे येतात.
यांना टाळण्यासाठी मेडिटेशन करा, आपल्याला नक्की काय हवे त्याची स्पष्टता आणा आणि योग्य वेळी योग्य आहार व पेय घ्या.
बाहेरून येणाऱ्या विचलित करणाऱ्या गोष्टी मध्ये सध्या सगळ्यात मोठी गोष्ट, आपला मोबाईल फोन. सोशल मीडिया, अवेळी येणारे कॉल्स, अचानक भेटायला येणारे लोक आणि मी लोकांना 'नाही' बोलू शकत नाही ही भावना कारणीभूत असते.
ऑनलाइन स्वराज्यात आपण रोज सकाळी ११ ते १२ आणि संध्याकाळी ५ ते ६ या वेळेत फोकसं अवर घेतो.
फोकस अवरबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी या लिंकवर क्लिक करा. https://www.youtube.com/watch?v=CJuX8uNCL4s

आपल्या संपूर्ण डिस्कशन मधून तुमच्या लक्षात आलं असेल कि, चालढकल करणे हा आपला एक नंबरचा शत्रू आहे आणि त्याच्याबरोबरच आपलं रोज चालणार द्वंद्व जर आपल्याला जिंकायचा असेल तर वर दिलेल्या उपायांचा तुम्ही नक्की वापर करून पहा आणि तुम्हाला मिळालेले रिझल्ट माझ्याबरोबर नक्की शेअर करा.

हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की शेअर करा तुमच्या ओळखीच्या इतर व्यक्तींना ह्या ब्लॉगचा फायदा होऊ शकतो त्यांच्याबरोबर हा ब्लॉग नक्की शेअर करा.
जे आज करायला पाहिजे ते आत्ताच करा कारण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे आणि आपलं स्वराज्य निर्माण करणे, आपली स्वप्न पुर्ण करणं हे आपलं कर्तव्य आहे.

धन्यवाद..!

आयुष्यावर प्रभुत्व मिळवण्यासाठी स्वतः वर प्रभुत्व मिळवा - ह्या मूलभूत गोष्टींवर काम करा

आयुष्य हातातून चाललंय असं तुम्हाला वाटतं का ? तुमच्या सवयींवर तुमचा ताबा नाही असं तुम्हाला वाटतं का? सतत चिडचिड होते का ? तुमची करिअर कुठेत...