गुरुवार, १७ नोव्हेंबर, २०२२

ग्रोथ माइण्डसेट - भाग २


 

गेल्या ब्लॉग मध्ये आपण ग्रोथ माइण्डसेट आणि फिक्स माइण्डसेट ह्यामधील फरक बघितला. 

फिक्स माइण्डसेट मधून बाहेर पडणे खूप महत्वाचे आहे आणि त्यासाठी ग्रोथ माइण्डसेट निर्माण करणं गरजेचं आहे. 

आता आपण ग्रोथ माइण्डसेट निर्माण करण्याच्या दहा स्टेप्स बघणार आहोत. 

ह्या ब्लॉग मध्ये आपण पहिल्या ५ स्टेप्स ची चर्चा करणार आहोत, चला मग सुरुवात करूया. 


1. तुमच्या कोणत्या कौशल्याने तुम्हाला यश किंवा अपयश मिळालं त्याची पडताळणी करा:



गेल्या कित्येक वर्षापासून तुम्हीं काही गोष्टी अप्रतिम प्रकारे करता, तर काही गोष्टींचा तुम्हाला अजिबातच गंध नाही आणि त्यांचा विचार केला की तुम्हाला कापर सुटतं. 

      माणसाच्या मूलभूत प्रवृत्तीनुसार, त्याला तेच परत परत करायला आवडतं ज्यात त्याच्याकडे प्राविण्य आहे. दुसऱ्या बाजूला ज्या गोष्टी त्याला आवडत नाहीत, त्यापासून तो कळत नकळत स्वतःला लांब ठेवतो. 

ह्या वेळी तुम्हीं स्वतःला हे दोन महत्त्वाचे प्रश्न विचारा , 

मी काय उत्कृष्टरित्या करतो?

कोणत्या गोष्टीवर मी आयुष्यात स्ट्रगल करतोय?

जी उत्तरं मिळतील ती एका कागदावर उतरवायला सुरुवात करा, पुढे जाऊन ह्या माहितीचा आपण वापर करणार आहोत. 


2.  तुमची ताकद (Strength ) आणि कमतरता (Weakness) समजून घ्या:



जे काही तुम्ही चांगलं करताय ती  तुमची ताकद बनली आहे आणि ज्या गोष्टीकडे तुम्ही कळत नकळत दुर्लक्ष करत आला आहात; त्याच्यामुळे तुम्हीं आयुष्यात मागे पडल्याची भावना तुमच्यामध्ये निर्माण झाली आहे.

एका कागदावर तुमच्या सगळ्या ताकद (Strength ) लिहून काढा.

- मी चांगलं वाचतो.

- चांगला ऐकतो.

- चांगलं लिहितो. 

- चांगल्या प्रकारे माझे मुद्दे मांडू शकतो. 

- मी खूप क्रिएटिव्ह आहे. 

- मला देवाने उपजतच नेतृत्व कौशल्य दिलेलं आहे. 

- मी रोज न चुकता साधना (ध्यान) करतो.

मला जर तुम्हीं विचारलंत तर ह्या माझ्या काही Strengths  आहेत.

- त्याचबरोबर दिलेला शब्द न पाळणं. 

- खूप जास्त प्लॅनिंग करणं आणि त्यावर हवी तेवढी ॲक्शन न घेणं. 

- चालढकल करणं. 

- नको त्या गोष्टीत गुंतून पडणं. 

या माझ्या काही कमतरता आहेत.

तुम्ही देखील एक कागद घ्या आणि त्यावर तुमच्या ताकद (Strength ) आणि कमतरता  (Weakness )लिहून काढा. पुढे जाताना तुम्हाला नक्कीच या सगळ्याचा फायदा होईल.  


3. तुमच्या यशाला आणि अपयशाला समजून घ्या:



जगातला महान तत्ववेत्ता  सॉक्रेटिस म्हणतो की, "अनुभव तुम्हाला काहीच शिकवत नाही; पण जेव्हा तुम्हीं अनुभवाचे पृथक्करण करता त्यावेळी तुम्हीं बऱ्याच गोष्टी शिकता." 

   तुमच्या  आतापर्यंतच्या अनुभवाचे पृथक्करण करून तुम्हीं,

-कोणत्या गोष्टीमुळे यशस्वी झालात?

-कोणत्या गोष्टी तुमच्या अपयशाच कारण ठरल्या? हे लिहायला सुरुवात करा.

मी तुम्हाला सांगू शकतो की, पुढच्या पाच मिनिटांत जर तुम्हीं हा एक्सरसाइज व्यवस्थित केला, तर इथून पुढे नक्की काय करायचं त्याच्याबद्दल बरीच स्पष्टता तुम्हाला मिळेल. 

ऑनलाईन स्वराज्यात आपण गेले ६०० दिवस सातत्याने मॉर्निंग रिच्युअल्स करतो आणि न चुकता त्यात आत्मपरीक्षण करून घेतो. 

तुम्हीं देखील ह्या उपक्रमात सहभागी होऊ शकता आणि सातत्याने आत्मपरीक्षण करून, योग्य विकल्प निवडून स्वतःची प्रगती साध्य करू शकता. 

4. कृती करा, जबरदस्त ॲक्शन घ्या: 


'केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे.'

वर दिलेल्या तीनही गोष्टींचं परीक्षण केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की; काही गोष्टी तुम्हांला सातत्याने आणखी जास्त करण्याची गरज आहे. तसेच काही गोष्टींकडे कळत नकळत तुमच्याकडून दुर्लक्ष झाले आणि आता त्या गोष्टींना जाणीवपूर्वक शिकण्याची त्यांच्यावर प्रभुत्व मिळवण्याची वेळ आलेली आहे. 

नवीन वर्ष येण्याआधी त्याच्या पूर्वसंध्येला आपण ही कृती नेहमी करतो. 

         कमीत कमी दहा-बारा नवीन संकल्प तयार करतो,पण दुर्दैवाने त्याच्यावर जी कृती करायला पाहिजे ती आपल्याकडून सातत्याने होत नाही. 

दररोज दहा हजार स्टेप्स चालणारी व्यक्ती ही वर्षभरात ३६,५०,०००  स्टेप्स चालू शकते आणि ती व्यक्ती वर्षाला ३६,५०,०००  स्टेप्स चालली तर तिचे आरोग्य कसं असेल हे सांगणायची आपल्याला गरज नाही. 

          आपल्या अंतर्मनाला या फायद्यांबद्दल माहिती देखील असते पण आपण कृती करण्यात कमी पडतो. 

तुम्हीं सातत्याने लिहिलेले ब्लॉग, बनवलेले व्हिडिओ किंवा रेकॉर्ड केलेले पॉडकास्ट हे देखील वर्षभरात तुमच्या आत्मविश्वासात अमुलाग्र बदल घडवून आणू शकतात, तुमचा जबरदस्त ब्रँड बनवण्यासाठी मोठं योगदान करू शकतात. 

एखाद्या नात्यात सातत्याने आणि जाणीवपूर्वक केलेली गुंतवणूक त्या नात्याला एका वेगळ्या उंचीवरही घेऊन जाऊ शकते. 

       आपण सगळे ध्येयाचे नियोजन नक्कीच करतो पण त्यावर ज्या प्रकारे कृती करायला हवी ती करत नाही. 

आजच स्वतःशी निर्धार करा की, मी छोट्या का होईना, ज्या काही गोष्टी ठरवेन त्या सातत्याने करेन, त्याच्यावर जबरदस्त ॲक्शन घेत राहीन. 

ऑनलाईन स्वराज्यात आम्हीं अनेक छोट्या छोट्या गोष्टी सातत्याने करतो, ज्यामुळे पुढे जाऊन खूप मोठा बदल अनुभवायला मिळतो. 

ॲक्शन घेण्यासाठी तुम्हांला ज्या ऊर्जेची गरज आहे ती मिळण्यासाठी पुढील काही गोष्टी करा. 

◆तुम्हीं जर तुमचे ध्येय साध्य केलं तर आयुष्य कसं असेल त्याची कल्पना करा. 

प्रत्येक गोष्ट दोनदा होते, एकदा कल्पनेत आणि मग अस्तित्वात. कल्पनेत तुम्हीं एखादी अचिव्हमेंट जितक्या स्पष्टपणे अनुभवू शकाल, तितके चांगले नियोजन तुम्हीं ती गोष्ट साध्य करण्यासाठी करू शकाल. 

◆तुमचे ध्येयं लिहून काढा आणि ती पूर्ण करण्यासाठी जी-जी कृती करावी लागेल ती सविस्तर लिहून काढा. 

मिशन मिलेनिअर माइण्डसेट ह्या आपल्या कोर्स मध्ये आपण ध्येयं निश्चिती आणि त्याची डिटेल प्लांनिंग कशी करावी, सातत्याने आपल्या ध्येयाला चिकटून कसे राहावे, या सगळ्या गोष्टींवर सखोल काम करून तुमचा माइण्डसेट घडवण्याचे आम्हीं काम करतो. 

◆स्वतःशीच कमिटमेंट करा आणि ती जग जाहीर करा.(zukega nahi)

◆तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या हितचिंतकांना सांगा की मी आता ही गोष्ट नक्की करणार आहे आणि तुम्हीं मला त्याच्यासाठी जबाबदार धरा. 

          तुम्ही हे नक्कीच अनुभवलं असेल, आपण स्वतःला दिलेल्या कमिटमेंटचे पालन करू की नाही याची अजिबात शाश्वती नाही, कारण त्याबद्दल फक्त आपल्यालाच माहित असतं (गाजराची पुंगी), पण इतरांना जाहीर केलेल्या गोष्टींबाबत आपण जास्त सिरीयस असतो, कारण तिकडे कळत नकळत आपला अहंकार गुंतलेला असतो. 

मग आज तुम्हीं कोणते ध्येय जगजाहीर करणार? 


5. प्रगतीचे मोजमाप करा:



प्रेरणा मिळाल्यावर कृती करणं सोप्प असतं असं प्रत्येकाला वाटतं, पण माझा अनुभव यापेक्षा अगदी उलटा आहे. मी आजपर्यंत अनुभवले आहे की, जेव्हा जेव्हा मी कृती करतो तेंव्हा प्रेरणा आपोआप निर्माण होते. 

इंग्रजीत एक खूप सुंदर म्हण आहे, 'What gets measured, gets done.' जे मोजलं जातं, तेच साध्य केलं जातं. 

सातत्याने जबरदस्त कृती करा, ती परफेक्ट आहे कि नाही त्याची चिंता करून नका. 

तुम्हीं केलेल्या कृतीची त्यांना मिळालेल्या परिणामांची नोंद ठेवणं खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे एखादी छोटीशी वही बरोबर ठेवा आणि त्यात तुमच्या प्रगतीचा आलेख लिहून ठेवा. 

तुम्हीं जर सातत्याने ही कृती करत राहिलात तर आपोआपच तुमच्या अंतर्मनाला प्रेरणा मिळेल आणि हळूहळू तुम्हीं तुमच्या ध्येयसिद्धीच्या दिशेने अग्रेसर व्हाल आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुमचा माइण्डसेट  ग्रोथ माइण्डसेट बनतोय हे तुमच्या लक्षात येईल. 

आजच्या ब्लॉगमध्ये आपण ग्रोथ माइण्डसेट निर्माण करण्याच्या ५ स्टेप्स बघितल्या . 

पुढच्या भागात आपण उर्वरित ५ स्टेप्स बघू . 

हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा, कमेंट मधून आपली प्रतिक्रिया द्या. 

तुम्हांला आणखी कोणत्या विषयावर मार्गदर्शन हवे आहे ते देखील नक्की कळवा, भविष्यात त्या विषयांवर विचार मांडायला मला नक्की आवडेल. 

१०५०० साकारात्मक आणि ग्रोथ माइण्डसेटवर काम करणाऱ्या उद्योजकांची कम्युनिटी जॉईन करण्यासाठी लिंक वर क्लिक करा. 

दिवसाची जबरदस्त सुरुवात करण्यासाठी आणि ग्रोथ माइण्डसेटसाठी आवश्यक त्या गोष्टी सातत्याने करण्यासाठी ऑनलाईन स्वराज्याचा सुपर मिरॅकल मॉर्निंग हा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. 

तुमच्या बहुमूल्य वेळेसाठी आणि प्रतिक्रियांची मनापासून कृतज्ञता. 

माइण्डसेट बदलूया, सर्वोत्तम मिळवूया !

धन्यवाद

मंगळवार, ८ नोव्हेंबर, २०२२

ग्रोथ माइण्डसेट - भाग १


१- तुम्हीं ध्येयं ठरवली आहेत पण ती साध्य करण्यात अडथळे येताहेत का ?

२- तुम्हीं ध्येय साध्य करण्यासाठी लागणारी योग्य कृती करण्यात कमी पडत आहात का ?

३- कृती करण्यासाठी हवी असलेल्या सकारात्मक ऊर्जेचा अभाव तुम्हाला जाणवतो का ?

वरीलपैकी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर हो असेल , तर हा ब्लॉग तुमच्यासाठीच आहे .

नमस्कार माझं नाव केतन गावंड, माइण्डसेट ट्रान्सफॉर्मर, मिशन ऑनलाईन स्वराज्य ह्या प्लॅटफॉर्मचा संस्थापक. येत्या ३ वर्षात १ लाख उद्योजकांचा माइण्डसेट ट्रान्सफॉर्म करून त्यांना त्यांचं सर्वोत्तम साध्य करण्यासाठी तयार करणं हा माझा ध्यास.

चला तर मग सुरुवात करूया .

माइण्डसेट - मानसिकता हा आपल्यासाठी जगाचा आरसा आहे.
गेल्या अनेक वर्षांच्या संस्कारातून, अनुभवातून आणि शिक्षणातून आपण आपली मानसिकता निर्माण केली आहे.

समोर येणाऱ्या प्रसंगातून प्रत्येक जण त्याचा वेगळा अर्थ लावतो आणि वेगळी प्रतिक्रिया देतो, हे देखील संपूर्णपणे आपल्या मानसिकतेवर अवलंबून असते.

आपण काय शिकतो हे खरंतर आपल्या मानसिकतेवरच अवलंबून असतं आणि म्हणूनच यशाची मानसिकता निर्माण करण्यासाठी मी हा ब्लॉग खास तुमच्यासाठी लिहिला आहे .


ह्या ब्लॉगच्या मदतीने तुम्ही,
१- स्वतःची मानसिकता समजून घेऊ शकाल.
२- स्वतःमध्ये प्रामुख्याने कोणत्या गोष्टींवर काम करण्याची गरज आहे ह्याची जाणीव तुम्हाला होईल.
३- आत्मपरीक्षण करून स्वतःची ताकद व अडथळे ह्याची यादी तुम्हीं बनवू शकाल.
४- स्टेप बाय स्टेप काम करून तुम्ही यशस्वी होण्यासाठी ग्रोथ माइण्डसेट निर्माण करू शकाल.
५- तुमची ध्येय जास्त वेगाने साध्य करून आरोग्य, आनंद व समाधान प्राप्त करू शकाल.

बऱ्याच जणांना असं वाटतं की, मानसिकतेत आमूलाग्र बदल घडवणं खूप कठीण आहे.
मी माझ्या अनुभवातून तुम्हाला सांगतो, ग्रोथ माइण्डसेट निर्माण करण्यासाठी आपल्याला एक्सपर्ट असण्याची गरज नाही. आज तुम्ही कुठे आहात ह्याने फार जास्त फरक पडत नाही पण तुम्ही कुठे जाण्याचा विचार करताय त्याने खूप फरक पडतो.
आज माझ्या उर्वरित आयुष्याच्या पहिला दिवस आहे, आज मी जे काही ठरवणार आहे आणि त्या मार्गावर जर मी येत्या पाच वर्ष चाललो तर मी भरपूर काही साध्य करणार आहे, हा विश्वास खूप महत्त्वाचा असतो.

आयुष्यात ग्रोथ माइण्डसेट असेल तर आपण भरपूर प्रगती करू शकतो.
साधारणतः लोकांमध्ये दोन प्रकारचे माइण्डसेट आपल्याला बघायला मिळतात. पहिला 'फिक्स माइण्डसेट' आणि दुसरा 'ग्रोथ माइण्डसेट'.



फिक्स माइण्डसेट असणारी व्यक्ती खालील प्रमाणे विचार करते-
- मला माझ्या मूलभूत शिक्षणातून, माझ्या आई-वडिलांकडून ज्या गोष्टी मिळाल्या त्याच्यापेक्षा वेगळं असं काही मी कमावू शकत नाही.
- एका ठराविक वयानंतर नवीन कौशल्य मी कधीच निर्माण करू शकत नाही.
- माझी आर्थिक परिस्थिती हा नशिबाचा भाग आहे, आता कितीही मोठे प्रयत्न केले तरी मी ती बदलू शकत नाही.
- अपयशामुळे माझे कर्तृत्व मर्यादित होते.
- मी एखाद्या गोष्टीत एकतर चांगला आहे किंवा नाही.
- मला आव्हानं आवडत नाहीत.
- माझ्या क्षमता पूर्वनियोजित आहेत.
- मी टीकेला आणि प्रतिक्रियेला वैयत्तिक घेतो.
- मी जेंव्हा वैतागतो, तेंव्हा प्रयत्न सोडून देतो.
- मला जे येतं मी त्यालाच चिकटून राहतो.

दुसऱ्या बाजूला ग्रोथ माइण्डसेट असलेली व्यक्ती स्वतःला सातत्याने जाणीव करून देते की, मी माझ्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत नवीन गोष्ट शिकू शकतो, स्वतःमध्ये आवश्यक बदल घडवूं शकतो.


ग्रोथ माइण्डसेट असणार्यां व्यक्तीचे काही मूलभूत बिलीफ असतात

- ह्या जगात अशक्य असं काहीच नाही.
- प्रत्येकासाठी प्रत्येक गोष्ट ही मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. (Abundance)
- जग मला मदत करायला नेहमीच तयार आहे.
- अपयश ही पुन्हा नव्याने, जोमाने आणि चांगल्या प्रकारे प्रयत्न करण्याची संधी आहे.
- आव्हानं मला प्रगतीसाठी तयार करतात.
- मला काय मिळतं ते यश नाही, मी जे बनतोय ते यश आहे.
- माझे प्रयत्न आणि दृष्टिकोन माझ्या शक्यता ठरवतात.
- प्रतिक्रिया माझ्यासाठी अत्यंत महत्वाच्या आहेत त्या मला सुधारण्यासाठी प्रवृत्त करतात.
- प्रत्येक गोष्ट समजून घेण्याची माझ्यामध्ये प्रचंड उत्सुकता आहे
- मला अज्ञाताची भीती नाही, त्याला सामोरे जाण्याची माझी तयारी आहे.
- अपमानाची किंवा इतरांच्या टीकेची भीती नाही.
- बदलला सामोरं जाण्यास ते नेहमी तयार असतात.

ग्रोथ माइण्डसेट असणारी माणसं सातत्याने नवीन गोष्टी शिकत राहतात, सातत्याने स्वतःला पुढे जाण्यासाठी प्रवृत्त करत राहतात आणि मी काहीही साध्य करू शकतो हा विचारच त्यांच्यासाठी सगळ्यात मोठी प्रेरणा ठरतो.

ग्रोथ माइण्डसेट असणाऱ्या व्यक्ती इतरांपेक्षा जास्त रिस्क घ्यायला तयार असतात त्यांना कठीण कॉम्प्लेक्स गोष्टींमध्ये जास्त वेळ लागतो याची जाणीव असते आणि त्यासाठी ते सातत्याने मेहनत घ्यायला देखील तयार असतात.

हजारो मैलांचा प्रवास हा एका पावलाने सुरू होतो आणि ते एक पाऊल सातत्याने पुढे टाकत राहण्यासाठी ग्रोथ माइण्डसेट असणारी व्यक्ती नेहमीच तयार असतात.

ग्रोथ माइण्डसेट असणाऱ्या व्यक्तींचा आत्मविश्वास हा इतरांपेक्षा प्रचंड जास्त असतो कदाचित त्यांच्याकडे खूप टॅलेंट किंवा दैवी देणग्या नसते, पण सातत्याने कोणतीही गोष्ट मी साध्य करू शकतो या गोष्टीवर त्यांचा दुर्दम्य विश्वास असतो.

वरील सगळ्या गोष्टी बघितल्यावर तुमच्या देखील हे लक्षात आलं असेल की ग्रोथ माइण्डसेट किती महत्वाचा आहे.
मग तुम्हाला काय वाटतं, तुमचा माइण्डसेट कोणत्या प्रकारचा आहे? फिक्स की ग्रोथ ?

कंमेंट मध्ये नक्की कळवा.

तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला त्याबद्दल नक्की प्रतिक्रिया द्या.


पुढच्या भागात आपण ग्रोथ माइंडेस्ट कसा निर्माण करायचा त्याबद्दल बोलू.

माइण्डसेट बदलूया, सर्वोत्तम मिळवूया !

धन्यवाद

आयुष्यावर प्रभुत्व मिळवण्यासाठी स्वतः वर प्रभुत्व मिळवा - ह्या मूलभूत गोष्टींवर काम करा

आयुष्य हातातून चाललंय असं तुम्हाला वाटतं का ? तुमच्या सवयींवर तुमचा ताबा नाही असं तुम्हाला वाटतं का? सतत चिडचिड होते का ? तुमची करिअर कुठेत...