आयुष्य हातातून चाललंय असं तुम्हाला वाटतं का ?
तुमच्या सवयींवर तुमचा ताबा नाही असं तुम्हाला वाटतं का?सतत चिडचिड होते का ?
तुमची करिअर कुठेतरी अडकली आहे असे वाटते का ?
यापैकी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर हा असे असेल तर हा ब्लॉग तुमच्यासाठीच आहे
नमस्कार मी केतन गावंड , तुमचा लाईफ मास्टरी कोच आणि माझी सिम्पल फिलॉसॉफी आहे स्वतःला जिंका जग जिंका .
बऱ्याच वेळा आपण काही मूलभूत गोष्टींकडे दुर्लक्ष करतो आणि पुढे जाऊन त्यातूनच मोठ्या समस्या निर्माण होतात .
माझे गुरु नेहमी म्हणतात 'Whenever in doubt , go back to basic' जेंव्हा करायचे ते कळत नाही त्यावेळी मूलभूत गोष्टींवर लक्ष केंद्रित करा
पुढे सांगितलेल्या काही मूलभूत गोष्टी करून बघा
स्वतःला प्राधान्य द्या
आयुष्याला जिंकायचं असेल तर आधी स्वतःला जिंकायला लागेल शारीरिक मानसिक भावनिक स्वास्थ्याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्या.
ठरवून ब्रेक घ्या, आराम करा, स्वतःच्या बॅटरीज रिचार्ज करा जेणेकरून तुम्हाला शारीरिक आणि मानसिक पातळीवर थकल्यासारखे वाटणार नाही
चांगल्या सवयी निर्माण करा !
आधी तुम्ही सवयी घडवता आणि मग सवयी तुमचं आयुष्य घडवतात.
या क्षणात जगण्यासाठी स्वतःला प्रवृत्त करा तुमच्या विचारांचा भावनांचा एक त्रयस्थ म्हणून अवलोकन करा.
अश्या कोणत्या सवयी आहेत ज्या तुमच्या आयुष्यावर सकारात्मक परिणाम पाडतील त्या जाणीवपूर्वक मजबूत करायला सुरुवात करा .
व्यायाम
पोषक आहार
चांगली पुस्तके वाचणे
आत्मपरीक्षण करणे
नवीन कौशल्यं निर्माण करा
ध्यान करा
सगळ्यात महत्वाचे म्हणजे सुरुवात छोट्याश्या कमिटमेंट ने करा . केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे.
मर्यादा घालायला शिका !
आपला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम बऱ्याच वेळा हाच असतो की आपण स्वतःला मर्यादा घालण्यात कमी पडतो .
अंतर्मनातून आपल्याला काही गोष्टींची पुरेपूर जाणीव असते , ह्या गोष्टींमुळे आपलं नुकसान होते हे देखील जाणवत असते .
आपण एखाद्या कट्पुटली प्रमाणे आपल्या सवयीचे गुलाम होऊन , त्या गोष्टी वारंवार करत राहतो .
आणखी एक समस्या म्हणजे बऱ्याचदा आपण नाही बोलू शकत नाही .तुम्ही नाही बोलायला शिकलात तर कारण नसताना स्वतःची धावपळ टाळून महत्त्वाच्या गोष्टींना महत्त्व द्यायला तुम्ही तयार व्हाल, त्यामुळे तुम्ही एक उत्तम वर्क लाईक बॅलेन्स निर्माण करायला शिकाल
इतरांशी कनेक्ट व्हा !
स्वतःची काळजी घेऊन आपल्याला इतरांशी चांगल्या प्रकारे कनेक्ट होता आले पाहिजे.
उत्तम नातेसंबंध जोपासताना कुटुंबातील व्यक्तींना मित्रांना आणि सहकाऱ्यांना प्रोत्साहन देणं आणि त्यांच्याकडून प्रोत्साहन घेणं ही एका प्रगतीशील आयुष्याची गुरुकिल्ली आहे
वर सांगितलेल्या गोष्टींची जर तुम्ही सुरुवात केली तर तुमचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारून तुम्ही आयुष्यावर प्रभुत्व मिळवायला सुरुवात कराल याबद्दल माझ्या मनात काहीही शंका नाही
लवकरच मी तुमच्यासाठी लाइफ मास्टरी हा पहाटेचा वर्कशॉप घेऊन येत आहे.
ह्या वर्कशॉप मध्ये आपण आरोग्य, नाती, करियर आणि आर्थिक समृद्धी मिळवण्याच्या मूलभूत गोष्टी समजून घेणार आहोत
तुम्हाला जर याबद्दल अधिक माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मेसेज ऑनलाइन स्वराज लाईफ मास्टरी हा फेसबुकचा ग्रुप जॉईन करा - https://bit.ly/3vPd52v
तुमच्या सारख्या दहा हजार पेक्षा जास्त समविचारी लोकांबरोबर राहून स्वतःच्या आयुष्यावर प्रभुत्व मिळवायला सुरुवात करा.
तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट द्वारे नक्की कळवा. तुम्ही कोणत्या गोष्टींवर काम करायला सुरुवात करत आहे त्याबद्दल कमेंट मध्ये तुम्ही मला सांगू शकता. लवकरच पुन्हा एकदा आणखीन एका जबरदस्त विषयावर ब्लॉग घेऊन येत आहे , तोपर्यंत स्वतःची ची काळजी घ्या.
धन्यवाद !