तुमच्या मोबाईल फोनच्या मदतीने जबरदस्त व्हिडिओ निर्माण करायचा आहे?
हलती चित्र प्रत्येकाच्याच मेंदूमध्ये उत्सुकता निर्माण करतात.
मग ते तीन वर्षाचं मूल असो कि एखादी प्रौढ व्यक्ती, आणि म्हणूनच व्हिडिओ हा मार्केटिंग करणाऱ्यांचा सगळ्यात चांगला मित्र आहे . व्हिडिओ समोरच्याला थांबण्यास प्रवृत्त करतात आणि तुम्ही जे सांगताय त्यामध्ये रस निर्माण करतात.
असं असलं तरीही व्हिडीओची क्वालिटी उत्तम असण हे फार महत्वाचं आहे . पण तुमचं बजेटच खूप कमी असेल तर काय कराल ?
मी सांगतो काय करायचं ते, तुमच्या छोट्याशा खिशातला तो छोटासा मोबाईल आज खूपच जास्त शक्तिशाली झाला आहे. ह्या मोबाईल च्या मदतीने तुम्ही सुंदर जाहिराती आणि व्हिडीओज बनवू शकता.
यासाठी तुम्हाला फक्त काही मूलभूत गोष्टी माहिती असणे गरजेचे आहे.
नमस्कार , मी केतन गावंड - Online स्वराज्य सारथी , मिशन Online स्वराज्य ह्या प्लॅटफॉर्मचा संस्थापक आणि येत्या ३ वर्षात १ लाख Online स्वराज्य निर्माण करणं हा माझा ध्यास.
तुम्हाला मोबाइलच्या मदतीने दर्जेदार व्हिडिओ बनवायचे असतील तर हा ब्लॉग शेवट पर्यंत वाचा .
१) चांगलं नियोजन करा
मोबाईलच्या मदतीने तुम्ही एक सुंदर व्हिडिओ निर्माण करू शकता पण त्यासाठी तुमचं नियोजन चांगलं असणं गरजेचे आहे.
सगळ्यात आधी तुमच्याकडे स्टोरीबोर्ड असण्याची गरज आहे .
तुमच्या व्हिडिओमध्ये कोणकोणत्या गोष्टी येणे गरजेचे आहे ते तुम्ही आधीच ठरवणं महत्त्वाचं .
तुम्हाला आवडणारे आणि सोशल मीडियावर प्रसिद्ध असणारे काही व्हिडिओ जर तुम्ही नीट बघितले तर तुमच्या लक्षात येईल की या सगळ्या व्हिडीओ मध्ये एक पॅटर्न फॉलो केला जातो.
- चांगली हेडलाईन
- इंट्रोडक्शन
- प्रॉब्लेम
- सोल्युशन
- कन्क्लूजन
- कॉल टू ॲक्शन
हे सहा भाग तुमच्या व्हिडिओमध्ये असणे महत्त्वाचंआहे . माझ्या ऑनलाईन ब्रँड बिल्डिंग कोर्समध्ये मी याबद्दल सविस्तर बोलतो.
एकदा याची स्पष्टता आली की मग
- शूटमध्ये कोणत्या कोणत्या वस्तू लागणार आहेत?
- कोणतं ठिकाण योग्य आहे?
- म्युझिक कशा प्रकारची घ्यायची?
- टायटल्स कुठे कुठे द्यायचे?
- रंगसंगती कोणती वापरायची?, ह्या सगळ्या गोष्टी आपोआपच स्पष्ट होत जातात
ऐन वेळी एखादी गोष्ट विसरलात तर पूर्ण शूटिंगचाच विचका होऊ शकतो.
२) लाईटचा प्रभावी वापर करायला शिका.
हल्ली बऱ्याच प्रकारचे घरगुती शूटिंगसाठी लाईट्स देखील येतात त्यांचा वापर करून तुम्ही योग्य लाइटिंग निर्माण करू शकता.
एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की लाईट चेहऱ्याच्या आणि वस्तूंच्या समोरच्या बाजूने येणं खूप महत्त्वाचा आणि मागच्या बाजूला जेवढ्या लाईट असतील त्या टाळणं देखील तितकाच महत्वाचं.
३) हेडफोनच्या युगात आवाज फार महत्वाचा.
माझ्या इतक्या वर्षाच्या अनुभवातून मी तुम्हाला नक्की सांगतो की आजकल व्हिडिओ बघितला कमी जातो पण ऐकला जास्त जातो. प्रवासात,गाडीमध्ये आणि काम करत करत हेडफोनचा वापर होत असल्यामुळे आवाज उत्कृष्ट असणं खूप महत्त्वाचं.
चांगल्या म्युझिक साठी तुम्ही युट्युब ला जाऊन फ्री म्युझिक लायब्ररी मधून योग्य त्या म्युझिक डाऊनलोड करू शकता.
तुम्ही बोलताना मध्ये मध्ये निर्माण होणाऱ्या गॅप भरण्याचे काम एक उत्कृष्ट बॅकग्राऊंड म्युझिक करते.
मोबाईल वरून व्हिडिओ शूट करताना खणखणीत आवाजासाठी मोबाईल जवळ पकडणं महत्त्वाचं असतं. ते शक्य नसेल तर तुम्हाला लांब वायरचा हेडफोन किंवा उत्कृष्ट क्वालिटी चा ब्लूटूथ हेडफोन वापरणं कधीही चांगलं. मी माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये ब्लूटूथ हेडफोन चा वापर करतो आणि मला त्याचा खुप छान अनुभव आहे
लॉकडाउनच्या काळात मी जवळजवळ 170 व्हिडिओ रेकॉर्ड केलेत . चला व्हिडिओ बनवायला शिकूया या सीरिजमध्ये मी जवळजवळ 100 व्हिडिओ निर्माण केलेत .
हे व्हिडिओ नक्कीच तुम्हाला एक चांगला व्हिडिओ बनवण्यासाठी काय काय लागतं याची कल्पना देऊ शकतील.
४) रेकॉर्ड मोबाईलवर करा पण एडिटिंग कम्प्युटरवरच करा
मोबाईलवर व्हिडिओ रेकॉर्ड करणं सोपं आहे, पण जर एका मिनिटापेक्षा जास्त मोठा व्हिडिओ असेल तर मी तुम्हाला कॉम्पुटरवरच एडिटकरण्याचा सल्ला देईन.
एडिटिंग सॉफ्टवेअर मोबाईलवर अजून तेवढी चांगली झालेली नाहीत.
चांगला व्हिडिओ शूट करणं हे फार कॉम्प्लिकेटेड नाही ,जर तुमचं नियोजन चांगल असेल आणि छोटी-छोटी उपकरण तुमच्या बरोबर असतील.
लोक फेल होण्याचं नियोजन करत नाहीत पण ते नियोजन करत नाहीत म्हणून फेल होतात.
सुनियोजन करा आणि एक उत्कृष्ट व्हिडिओ बनवून या जगाला इम्प्रेस करा.
म्हणूनच मी म्हणतो लाईट्स , फोन आणि ऍक्शन !
हा ब्लॉग पूर्ण वाचल्याबद्दल आपले मनापासून आभार , ब्लॉग कसा वाटलं हे कॉमेंट मध्ये नक्की कळवा . या आणि अशाच पॉवरफुल टिप्स साठी माझा फेसबुक ग्रुप नक्की जॉईन करा
धन्यवाद !






Very Informative and Interesting also. Just Do It.लिहीत रहा. All The Best.Ketan Sir.
उत्तर द्याहटवाThank you So Much
हटवाखुपच छान सर
उत्तर द्याहटवाखुपच उपयुक्त माहिती सांगितली...
खरच ऑनलाइन जगात video making skill develop करणे खुप महत्वाचे आहे...
सर्व टिप्स अतिशय उपयुक्त...
वेळ वाचेल आणी चांगले आकर्षक वीडियो बनवण्यासाठी त्यांचा नक्किच उपयोग होइल.
Thank you 😊
Thank You Shraddha
हटवाKhoop chan mahiti dili sir 🙏
उत्तर द्याहटवाThank You
हटवाKhoop chan mahiti dili sir 🙏
उत्तर द्याहटवाखूप छान टिप्स
उत्तर द्याहटवाआजकाल ऑनलाईन युग आहे त्यामुळे प्रत्येकाला व्हिडिओ बनवून व्यक्त होण्यासाठी या टिप्स खूप उपयोगी आहेत
Very useful information Sir🙏
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर सर
उत्तर द्याहटवा👌🏻👌🏻👌🏻
खूपच उपयुक्त व अतिशय योग्य प्रकारे लिहलं आहे सर👍🏻
Thank You
हटवाही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवाUseful information... खूप छान लिहिले आहे... 👌👌
उत्तर द्याहटवाKhup chhan
उत्तर द्याहटवाThank You
हटवाGreat Insights thank u
उत्तर द्याहटवाअतिशय छान आणि उत्तम माहिती.
उत्तर द्याहटवाया माहितीच्या जोरावर आम्ही खूप विडिओ बनवले आहेत आणि खूप मोठा फायदा झाला आहे आम्हाला...ग्रेट केतन सर..💐💐👌👌👍👍
धन्यवाद
हटवाखूप सुंदर
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवाSir very useful blog. It will give us a clarity on how a blog. Should. Be written and importance of videos and pictures. Thank you
उत्तर द्याहटवाधन्यवाद खुप छान माहीती सर
उत्तर द्याहटवाpractical value
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवाJabardasst
उत्तर द्याहटवाEk mobile badal de sari duniya
Yes Doctor
हटवाखुप छान माहिती
उत्तर द्याहटवाखूपच उपयुक्त माहिती. Video बनवीनर्यांसाठी तर खूप मह्त्वाचचे मुद्दे तुम्ही सांगितले सर 👌👌👌👌👌
उत्तर द्याहटवाThank you
हटवाआता मला samajal कि माझे काय चुकतवहोते. मी प्रत्येक गोष्ट विडिओ , blog sagalach phonevarach edit or update karat hote. Thank you for the tips sir.
उत्तर द्याहटवाOnline ची सुरुवात व्हिडिओने केल्यास यश जास्त लवकर मिळते. त्यासाठी व्हिडिओ कसे बनवावेत हे जाणणे गरजेचे आहे. पुढील लेखात त्यावर थोडी विस्तृत माहिती मिळेल अशी आशा आहे. 🙏
उत्तर द्याहटवाखूपच छान information.
उत्तर द्याहटवाVery useful information sir👍
उत्तर द्याहटवाअतिशय प्रेरणादायी आणि खूप छान माहिती...👍👍👌👌💐💐
उत्तर द्याहटवाVery much informative sir... 👍👍👍
उत्तर द्याहटवाThanks for the valuable inputs
उत्तर द्याहटवाKhupatach chan mahiti . Online swarajya is a great platform for all entrepreneurs.thank you sir
उत्तर द्याहटवाAgadi mojkya shabdhat mahiti dilit, masta... Thank you Sir..
उत्तर द्याहटवानमस्कार सर एखादी अवघड विषयाला सोप्या शब्दांमध्ये कमीत कमी शब्दांमध्ये कसं मांडायचं हे फक्त तुम्हीच करू शकता सर amazing powerful....Thank you so much
उत्तर द्याहटवाThank you 🙏
हटवाThanks sir best video aahe
उत्तर द्याहटवानमस्कार सर , ऑनलाईन स्वराज्य मध्ये येण्या आधी मी इतक्या छान छान गोष्टी मला शिकायला मिळतील ह्याचा विचारच केला नाही. सर तुम्ही किती छान आणि सोप्या शब्दात समजून सांगितलय कॅमेराफेसिग , कॉम्प्युटर वर एडिटिंग कस करायच . मोबाईल मध्ये शूट करत असताना लाईट music 📷 कडेपाहत असताना छोट्या छोट्या गोष्टी कडे लक्ष देउन कसे छान व्हिडिओ आपण ही बनवु शकतो.
उत्तर द्याहटवाThanku sir 🙏,. इतक्या छान आणि सोप्या भाषेत आम्हाला ह्या गोष्टी मांडून दिल्या .
Great sir....
खरच अमेझिंग टिप्स भेटल्या आमचं ऑनलाईन स्वराज्य बनवायला .
Thank you 🙏
हटवाआदरणीय सर,
उत्तर द्याहटवाअप्रतिम ब्लॉग व अतिशय उपयुक्त अशी माहिती आपण लिखित स्वरूपात दिली आहे. खरं तर येणारा काळ हा व्हिडिओस मधून शिकण्याचा, जग पाहण्याचा, सर्व काही अभ्यासण्याचा असून आपण Online Swarajya हे एक अतिशय चांगले मिशन हाती घेतले असून त्यातून आमच्या सारख्या असंख्य होतकरू प्रशिक्षकांची जडणघडण होणार आहे. म्हणून आपले खुप खुप आभार, शुभेच्छा व मनापासून कृतज्ञता. विनीत, विजय.
Thank you 🙏
उत्तर द्याहटवाKhup chhan sir, thank you for sharing.
उत्तर द्याहटवामिशन ऑनलाईन स्वराज्य मध्ये कॅमेरा कॉन्फिडन्स क्लारिटी ॲक्शन कन्सिस्टन्सी तसेच व्हिडिओ बनवताना बॉडी लैंग्वेज लाईटचा वापर म्युझिक चा वापर इमेजचा वापर या सर्व गोष्टी साध्या आणि सोप्या भाषेमध्ये तुम्ही शिकवल्या स्वप्नातही वाटले नाही की मला हे सर्व जमेल परंतु सर तुमच्या शिकवण्याच्या पद्धतीमुळे हे सर्व शक्य झाले थँक यु सो मच थँक्यू सर
उत्तर द्याहटवामिशन ऑनलाईन स्वराज्य मध्ये कॅमेरा कॉन्फिडन्स क्लारिटी ॲक्शन कन्सिस्टन्सी तसेच व्हिडिओ बनवताना बॉडी लैंग्वेज लाईटचा वापर म्युझिक चा वापर इमेजचा वापर या सर्व गोष्टी साध्या आणि सोप्या भाषेमध्ये तुम्ही शिकवल्या स्वप्नातही वाटले नाही की मला हे सर्व जमेल परंतु सर तुमच्या शिकवण्याच्या पद्धतीमुळे हे सर्व शक्य झाले थँक यु सो मच थँक्यू सर
उत्तर द्याहटवा