तुम्ही व्यवसाय करताय पण तुमचा ऑनलाईन ब्रँड अस्तित्वात नाही?
तुम्हाला माहिती आहे का सध्याच्या परिस्थितीत इंटरनेट मार्केटिंग हे व्यवसाय वृद्धिचे प्रमुख आणि महत्त्वाचे साधन बनले आहे.
ऑनलाइन ब्रँड का?
कारण तुमच्या प्रतिस्पर्धा कडे तुमच्यासारखे प्रॉडक्ट किंवा सर्विसेस असू शकतात पण तुमचा ब्रँड हा अतिशय वेगळा आणि युनिक असतो.
कितीतरी प्रॉडक्ट आणि सर्विसेस ह्या कालबाह्य होतात, मार्केटच्या बाहेर जातात पण एक चांगला स्ट्रॉंग ब्रांड कित्येक वर्ष अस्तित्वात राहतो.
आणि हो ब्रँड म्हणजे फक्त तुमचा लोगो(LOGO) किंवा तुम्ही बनवलेली वेबसाईट (WEBSITE) असे मुळीच नाही.
तुमचा ब्रँड तुमच्या संपूर्ण उद्योगाला रिप्रेझेंट करतो.
- तुमच्या ग्राहकाला तुमच्या बरोबर कनेक्ट होण्यासाठी मदत करतो.
- ग्राहकांशी आपुलकीचं आणि जिव्हाळ्याचं एक दृढ नातं निर्माण करतो.
माझं नाव केतन गावंड ऑनलाइन स्वराज्यसारथी मिशन ऑनलाइन स्वराज्य ह्या प्लॅटफॉर्मचा संस्थापक आणि येत्या तीन वर्षात एक लाख ऑनलाईन स्वराज्य घडवणे हा माझा ध्यास.
तुम्हाला जर तुमचा ऑनलाईन ब्रँड निर्माण करायचा असेल तर हा ब्लॉग शेवटपर्यंत वाचा.
असं नेहमी म्हटलं जातं Sell an experience and not a product.
तुमच्या ग्राहकाला प्रॉडक्ट किंवा सर्विस न देता एक अविस्मरणीय अनुभव द्या.
तुमच्या लोगो किंवा तुमच्या कलर स्कीम कडे लोक या दृष्टीने बघतात तो तुमचा ब्रँड नाही तर तुमच्या प्रॉडक्ट किंवा सर्विस म्हणणार त्यांना जो अल्टिमेट अनुभव मिळतो तोच तुमचा खरा ब्रँड आहे.
आणि सध्या आपल्याला मान्य करायलाच लागेल की ह्या COVID १९ च्या परिस्थितीत ऑनलाईन ब्रँडिंगला खूप जास्त महत्त्व आलेले आहे.
आपण घरातून बाहेर पडू शकत नाही, आपल्या ग्राहकांना भेटू शकत नाही .
त्या वेळी ग्राहक जिथे सगळ्यात जास्त आपला वेळ गुंतवत आहेत त्या सोशल मीडियावर आपलं अस्तित्व असणे फार महत्त्वाचे झालेले आहे. या कठीण परिस्थितीत ज्यांना ऑनलाईन ब्रँडचे महत्त्व कळलं त्यांनी विपरीत परिस्थितीत सुद्धा खूप चांगला व्यवसाय मिळवलेला आहे.
पुढील सात कारणांसाठी तुम्हाला तुमचा ऑनलाइन ब्रँड बनवायलाच हवा.
१ . ऑनलाईन ब्रँड मुळे तुमच्या प्रसिद्धीत भर होते
तुमच्या संभाव्य ग्राहकापर्यंत तुमची कीर्ती पोहोचवण्याचं फार महत्त्वाचं काम ऑनलाईन ब्रँड करत असतो.
जर तुम्ही सातत्याने तुमच्या ग्राहकाच्या नजरेसमोर येत राहिले तर काही काळानंतर तो तुम्हाला ह्या क्षेत्रातला लीडर किंवा एक्सपोर्ट समजू लागतो.
२. ऑनलाईन ब्रँड मुळे तुमचा ठसा उमटतो
तुमच्या उद्योगाचं एक विशिष्ट असं नाव आहे आणि विशिष्ट असा लोगो आहे . हा लोगो तुम्हाला इतरांपासून वेगळा करतो.
मी ह्या लोक डाऊनमध्ये मिशन ऑनलाइन स्वराज्य या समूहाची स्थापना केली आहे.
आज तिथे जवळजवळ पाच हजार समविचारी उद्योजक एकत्र काम करत आहेत आणि माझी आणि माझ्या कामाची एक वेगळी ओळख मिशन ऑनलाइन स्वराज्य मुळे झालेली आहे.
३. ऑनलाईन ब्रँड मुळे तुमचं वेगळेपण सिद्ध करतो
तुम्ही ज्या प्रकारे स्वतःला मांडता आणि ज्या प्रकारे तुम्ही स्वतःचे विचार व्यक्त करता त्यातून तुम्ही तुमच्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा किती वेगळे आहात , हे तुमचा ब्रँड सहज समोरच्याला पटवून देतो.
मिशन ऑनलाइन स्वराज्य ह्या ग्रुप वर ज्याप्रकारे सातत्याने लोकांना व्हिडिओ बनवायला शिकवले जाते , ब्रँड बनवायला शिकवले जाते आणि आत्मविश्वास वाढवणं याच्यावर जे काम होतं त्याबद्दल अनेकांनी हा एक वेगळा उपक्रम असल्याची प्रतिक्रिया दिलेली आहे.
४.ऑनलाईन ब्रँडमुळे ग्राहकांसाठी व्हॅल्यू आणि क्वालिटी निर्माण होते
आज आपण ॲपलचा (Apple) एखादा फोन कम्प्युटर किंवा घड्याळ घेतलं तर त्याची जबरदस्त व्हॅल्यू ब्रँडमुळे आधीच अस्तित्वात आहे आणि म्हणून इतर फोन किंवा कम्प्युटर पेक्षा दुप्पट, तिप्पट, चौपट आणि काहीवेळा दहापट पैसे द्यायला आपण तयार होतो ,कारण ॲपल (Apple) म्हटलं की क्वालिटी आणि व्हॅल्यू हे गणित ब्रँडमुळेच आपल्या डोक्यात निर्माण झालेलं आहे.
कल्पना करा जर तुम्ही अशा प्रकारची इमेज तुमच्या संभाव्य ग्राहकांच्या मनात निर्माण करू शकलात तर तुम्ही किती मोठा व्यवसाय करू शकाल?
५. ऑनलाईन ब्रँडमुळे वेगळा अनुभव निर्माण होतो
अमेरिकेतल्या डिस्नी वर्ल्ड मध्ये जितके लोक जातात ते आल्यावर एकच गोष्ट म्हणतात काय जबरदस्त अनुभव होता.
ग्राहक जेव्हा सातत्याने तुमच्या प्रॉडक्ट किंवा सर्विसेसचा उपभोग घेतो तेव्हा त्याच्या मनामध्ये तुमच्या ब्रँड बद्दल एक विशिष्ट असा अनुभव तयार होतो आणि मग पुढे जाऊन तिच तुमची ओळख बनते.
जेव्हाही हा ग्राहक इतरांशी तुमच्या प्रॉडक्ट किंवा सर्विसेस बद्दल बोलतो, तेव्हा त्याचा अनुभव कळत नकळत तो इतरांना सांगत असतो.
तुमच्या ग्राहकांचे असे अप्रतिम आणि अविस्मरणीय अनुभव तुम्ही online संग्रही ठेवू शकता व इतर ग्राहकांशी शेअर करू शकता.
६. ऑनलाईन ब्रँड मुळे ब्रँड लॉयल्टी निर्माण होते
आपल्याला माहिती आहे कित्येक लोक आयुष्यभर एकच टूथपेस्ट वापरतात.
आता दिवाळी येते आणि दिवाळीला अभ्यंगस्नानासाठी मोती साबण वापरणं ही जणू परंपराच झालेली आहे.
आणि ग्राहक त्यासाठी एवढे वचनबद्ध असतात की दुसरी कोणतीही गोष्ट त्यांना तो अनुभव परत मिळवून देऊ शकत नाही कोणत्याही ब्रँडची ही सगळ्यात मोठी अचिव्हमेंट असते.
गेले कित्येक आठवडे मी सातत्याने फेसबुक लाईव्ह करतो आहे आणि आता सातत्याने त्यास उपस्थिती लावणाऱ्या माझ्या मित्र मैत्रिणींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
७. ऑनलाईन ब्रँड विश्वासहार्यता निर्माण करतो
भारतामध्ये टाटा आणि गोदरेज ह्या ब्रँडने स्वतःची एक वेगळी विश्वासहार्यता निर्माण केलेली आहे.
ग्राहकाला पक्क माहिती असतं की त्यांच्या अपेक्षा हे ब्रँड कुठल्याही परिस्थितीत पूर्ण करतील आणि जर कुठे त्या पूर्ण होऊ शकला नाही तर तो उद्योजक किंवा त्याची संस्था त्याची संपूर्ण जबाबदारी घेतील.
आज ऑनलाईन ब्रँडमध्ये तुमच्या सर्विसेस किंवा प्रॉडक्टसाठी मनी बँक गॅरंटी , ट्रायल युसेज असं करून ती विश्वासहार्यता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो.
तसंच तुमच्या संतुष्ट ग्राहकांचे टेस्टिमोनिअल्स ( Testimonials) इतरांबरोबर ऑनलाइन शेअर करून इतरांच्या मनात देखील तुमच्या ब्रँड बद्दल विश्वास निर्माण केला जाऊ शकतो.
या सातही गोष्टींतुन तुमच्या लक्षात आलं असेल की आजच्या काळात ऑनलाईन ब्रँड निर्माण करून किती महत्त्वाचं झालेलं आहे.
आणि नक्कीच तुमच्या व्यवसायाचा ऑनलाईन ब्रँड तुम्हाला देखील वरील सात गोष्टी मिळवून देऊन तुमच्या व्यवसायवृद्धी मध्ये मोलाचं योगदान करू शकतो.
तुमच्या अंगणात जर पंचवीस फूट उंच सागाचे झाड तुम्हाला हवं असेल तर ते लावण्याची योग्य वेळ ही कदाचित पंधरा वर्षांपूर्वी होती आणि जर पंधरा वर्षांपूर्वी तुम्ही ते केलं असेल तर त्याची योग्य वेळ की आज आहे.
आजपर्यंत जर तुम्ही तुमचा ऑनलाईन ब्रँड बनवला नसेल तर आजच ती योग्य वेळ आहे ,कारण आज माझ्या उर्वरित आयुष्याचा पहिला दिवस आहे.
मिशन ऑनलाइन स्वराज्य या प्लॅटफॉर्मच्या मदतीने आम्ही हजारो उद्योजकांना मोफत ऑनलाईन ब्रँड निर्माण करायला मदत करतो .
तुम्हाला देखील ऑनलाइन ब्रँडिंगबद्दल आणखीन जाणून घ्यायचं असेल तर हा ग्रुप नक्की जॉईन करा हा ब्लॉग शेवटपर्यंत वाचल्याबद्दल आपले मनापासून आभार.











खुपच छान सर
उत्तर द्याहटवाखुप सुंदर आणि खुप महत्वाचे सांगितले आहे...
खरच आजच्या काळात ऑनलाइन ब्रँड असणे खुप महत्वाचे आहे...
आणि तुमच्या मार्गदर्शना खाली...आंम्ही ही ऑनलाइन ब्रँड उभारण्याचा प्रयत्न करत आहोत..
Thank you so much sir
Online स्वराज्य हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो आपण मिळवणारच.
Thank you so much shradhdha ..I am blessed to have all of you
उत्तर द्याहटवाVery Informative and Motivation blog
उत्तर द्याहटवाThank you Madhura
हटवाखूप छान माहिती
उत्तर द्याहटवानक्कीच यावरून सर्व ऑनलाईन ब्रँड बनवू शकतात
Thanks
Nitin patil
Nitin Sir Thank you
हटवाजबरदस्त 👍
उत्तर द्याहटवाThank you
हटवाPowerful sir Great Ideas
उत्तर द्याहटवाThank you
हटवाखूपच उपयुक्त माहिती आहे सर. निश्चितच या सात गोष्टींचा उपयोग मी माझा ऑनलाइन ब्रॅन्ड तयार करताना करीन. खुप खुप धन्यवाद.
उत्तर द्याहटवाThank you 🙏
हटवाअतिशय महत्वाची माहिती दिलीत सर आम्हाला सुद्धा आमचं फूड प्रॉडक्ट ऑनलाईन विकण्यासाठी खूप मदत झालेली आहे आणि भविष्यात अजून या सर्व गोष्टींची आम्हाला गरज भासणार आहे. आणि आम्ही सुद्धा तुम्ही वन-टू-वन सेशनमध्ये घेतलेल्या प्रत्येक विषयांवर अभ्यास करत आहोत आणि त्याच प्रमाणे आम्हाला अनुभव चांगला येत आहे. तुसी ग्रेट हो सर. 👍🙏🙏
उत्तर द्याहटवाThank you 🙏 Vidya tai
हटवाखूप उपयुक्त माहिती दिली आहे सर... तुम्ही दिलेल्या टिप्स नेहमीच आम्हाला उपयोगी येतात... खूप छान माहिती share करता तुम्ही... Thank you sir... 🙏
उत्तर द्याहटवाThank you
हटवाVery informative sir
उत्तर द्याहटवाDr smita Chakote
उत्तर द्याहटवा7 principles of life can create your Brand
Yes Doctor
हटवाSo true
उत्तर द्याहटवाखूप छान सर
उत्तर द्याहटवाछान, उपयुक्त माहीती आहे.धन्यवाद
उत्तर द्याहटवाहा ब्लॉग वाचल्यानंतर तुमचं १ लाख online स्वराज्य निर्मितीच लक्ष्य लवकरच पूर्ण होईल, असं दिसतंय.
उत्तर द्याहटवाखूपच "अर्थ"पूर्ण माहिती.
धन्यवाद केतन सर
तुम्ही आमचे गुरू असल्याचा सार्थ अभिमान आहे.
खुप छान सर..
उत्तर द्याहटवाKhupach chhan confidently
उत्तर द्याहटवाSir you set examples in front of us by doing things yourself. You practice yourself what you teach us. Has learnt lot of things from you and I am sure even if we practice few of them we will. Achieve our goals. This blog is a perfect example of how all. Of us should write a blog. Thank you sir for everything.
उत्तर द्याहटवाThank you so much ...keep growing
हटवाVery nice information sir
उत्तर द्याहटवाMeenal Agrawal
उत्तर द्याहटवाजो दिखता है वही बिकता है और वही टिकता है।