सोमवार, १९ ऑक्टोबर, २०२०

चांगल्या सवयी निर्माण करण्याच्या १० मूलभूत गोष्टी


 ‘10 मूलभूत गोष्टीं ज्यांच्या मदतीने तुम्ही 99% चांगल्या सवयी निर्माण करू शकाल’

तुम्हाला माहितीच असेल की चांगल्या सवयीच चांगल्या आयुष्याचा पाया आहेत. 

टोनी रोबिंस ( Tonny Robins)  म्हणतो की आपण चुकूनमाकून जे करतो त्याने आपल्या आयुष्याला आकार येत नाही, पण आपण जे सातत्याने जाणीवपूर्वक करतो त्याचा आपल्या आयुष्यावर प्रचंड प्रभाव असतो. 

मग मलाही वाटलं की आयुष्य बदलणाऱ्या या सवयींचे गूढ  शोधून काढावे .

बरीच सेल्फ डेव्हलपमेंटची पुस्तक वाचल्यानंतर तुमच्यासाठी घेऊन आलोय ‘10 मूलभूत गोष्टीं ज्यांच्या मदतीने तुम्ही 99% चांगल्या सवयी निर्माण करू शकाल’.  तुम्हालाही जबरदस्त Life Changing  सवयी निर्माण करायच्या  असतील तर हा ब्लॉग शेवट पर्यंत वाचा. 

नमस्कार माझं नाव केतन गावंड - ऑनलाइन स्वराज्यसारथी!

मिशन ऑनलाइन स्वराज्य ह्या प्लॅटफॉर्मचा संस्थापक येत्या तीन वर्षांमध्ये एक लाख ऑनलाईन स्वराज्य घडवणे हा माझा ध्यास आहे . 

चला तर मग सुरुवात करुया. 

१- ६६ दिवसांचे सातत्य 


सवयी घडवताना पहिली गोष्ट जी समजून घेणे प्रचंड महत्त्वाचे आहे , ती म्हणजे कोणतीही सवय तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग होण्यासाठी 66 दिवस लागतात. 

बरेच वेळा आपल्याला सांगितलं जातं की कोणतीही सवय लागण्यासाठी 21 दिवस लागतात, पण मी माझ्या अनुभवातून नक्की सांगतो की 21 दिवस हा खूपच कमी काळ आहे . कमीत कमी 66 दिवसांच टार्गेट ठेवणं खूप महत्वाचे. 

२- अर्जुनासारखं पूर्ण लक्ष एकाच सवयींवर केंद्रित करणं



दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकाच सवयीवर शंभर टक्के फोकस करणं . आपल्याकडे एक म्हण फार प्रचलित आहे , ‘एक ना धड भाराभर चिंध्या’. 

एकाच वेळी बऱ्याच गोष्टी करण्याच्या प्रयत्नात हाती काहीच लागत नाही, म्हणून कमीत कमी तीस दिवसांची विंडो (Window) एका सवयीला घडवण्यासाठी द्या. 

३- KISS - शक्य तेवढं सोप्प ध्येय ठेवा. 


तिसरी गोष्ट म्हणजे किस ( KISS ) प्रिन्सिपल म्हणजे - KEEP IT SHORT AND SIMPLE 

गोष्टी क्लिष्ट झाल्या म्हणजे सुरू होण्याआधीच त्या अपयशाचा पाय रचतात. 

मिनी हॅबिट्स या पुस्तकाचा लेखक स्टिफन गुईसे ( Stephan Guise) म्हणतो की एखादं सेंटीमीटर पुढे जा आणि मग प्रवाहच तुम्हाला मदत करेल आणि तुम्हाला ध्येयापर्यंत पोहोचवेल. 

मला रोज 45 मिनिटे चालण्याची इच्छा होती पण पहिल्याच दिवशी एकदम 45 मिनिटे चालणं हे थोडे त्रासदायक वाटत होतं. 

मग मी पाच मिनिटांनी सुरुवात केली आणि हळूहळू ते वाढवत नेलं  . साधारणतः दोन महिन्यानंतर मी रोज 45 मिनिटं चालायला लागलो आणि हो माझा सीरियसनेस वाढवण्यासाठी मी चालताना काही चांगली ऑडिओ बुक्स( ऐकायला सुरुवात केली. ( त्या निमित्ताने का होईना पण मी ऑडिओबुक संपेपर्यंत चालायचो ) 

आज गेली साधारण पाच-सहा वर्ष मी रोज जाणीवपूर्वक 45 मिनिट चालतोय आणि माझ्या एक गोष्ट लक्षात आली की 80 टक्के यश हे फक्त आपण त्या गोष्टीसाठी ठरलेल्या जागेवर उपलब्ध असणं यातच आहे . आजपर्यंत एकदाही असं झालेले नाही की मी शिवाजी पार्कला पोहोचलो आणि न चालताच परत आलोय . 

४- तुमचा ‘का’(Why?) शोधा 



चौथी गोष्ट म्हणजे तुमचा का प्रस्थापित करा ( Find your why ?)

कसं करायचं हे फक्त 5% महत्त्वाचं आहे पण का करायचं हे 95% महत्त्वाचं आहे . इंग्लिश मध्ये खूप सुंदर म्हण आहे, If you know why you will do it anyhow. का करायचं हे माहिती असेल तर कसं करायचं ते तुम्ही नक्की शोधून काढाल. 

जेव्हा  एखादी गोष्ट तुम्ही सोडून देण्याचा विचार कराल तेव्हा स्वतःला परत एकदा आठवण करून द्या की  सुरुवातच का केली होती . 

  • मला शेवटच्या श्वासापर्यंत सुदृढ जगायचं आहे. 
  • मला शेवटच्या दिवसापर्यंत स्वतःच्या पायावर हिंडायचं आहे.
  • पूर्वार्धात प्रचंड मेहनत करून मिळवलेल्या गोष्टींचा उत्तरार्धात पुरेपूर उपभोग घ्यायचा आहे. 

मी सातत्याने माझ्या शरीरावर काम करण्याचे हे तीन महत्त्वाचे ‘का’ (Why?)आहेत. 

जरा विचार करुन बघा आणि सांगा तुम्ही रोज सकाळी उठून एक तास शरीरावर काम करण्यासाठी तुमचे महत्त्वाचे ‘का’ (Why?)काय आहेत?

५- तुमचा संदर्भ (Referrence ) जिवंत ठेवा. 

जेव्हा एखादी गोष्ट तुम्ही सातत्याने परत परत करता, तेव्हा तुमची वचनबद्धता हळूहळू वाढत जाते. 

मी रोज माझ्या ठरलेल्या मार्गावरच माझा मॉर्निंग वॉल्क करतो. 

कुठे पोहोचल्यावर साधारणतः किती स्टेप्स झालेल्या असतील आणि अजून किती वेळ मला चालायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टींचं आकलन मला घड्याळ्यात न बघताच हल्ली यायला लागलेलं आहे आणि त्यामुळे बहुतांशी गोष्टी ऑटोमॅटिक व्हायला लागल्या आहेत. 

६ - स्वतःला जबाबदार धरा



हि सहावी गोष्ट फार महत्वाची , माझं सवयींच्या बाबतीत सगळ्यात आवडतं वाक्य ‘What get's measured gets done’, जे मोजता येतं तेच करून घेतलं जाऊ शकतं. 

मोजण्यासाठी काही छोट्या छोट्या युक्त्या

१- ट्रेकिंग (Tracking)



मानवी मनाला कुठल्याही बंधनात राहणे आवडत नाही , ठरलेल्या वेळेला उठणार, ठरलेल्या गोष्टी करणार ह्या सगळ्याचा प्रचंड तिटकारा मानवी मनाला असतो ,पण खरं सांगू तर हे खूप गरजेचे आहे. 

एखादं स्टेप्स मोजणारे घड्याळ 

वजन काटा

कॅलरी मिटर

हार्ट रेट मॉनिटर

ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला तुमच्या प्रोग्रेस ची कल्पना देऊ शकतात आणि स्वतःबरोबरच एक वेगळी स्पर्धा निर्माण करू शकतात. माझे बरेच स्टुडन्ट मला सांगतात , जो पर्यंत ठरवलेले आकडे मोबाइलमध्ये दिसत नाहीत तो पर्यंत आमचा दिवस संपतच नाही. 

२- योग्य समूहात रहा



मी माझ्या बारा वर्षाच्या अनुभवातून सांगतो की जर  आपल्याला प्रोत्साहित करणारा आणि प्रश्न विचारणारा समूह बरोबर असेल तर आपण आपल्या सवयी आणि ध्येयासाठीसाठी जास्त प्रामाणिक असतो. 

ऑनलाईन स्वराज्य कम्युनिटीमध्ये रोज रात्री झोपायच्या आधी ठरलेल्या सात गोष्टी प्रत्येकाने केल्या की नाही याचं रिपोर्टींग  करायला लागतं आणि त्यामुळे लोकांची कमिटमेंट प्रचंड वाढलेली मी अनुभवलेली आहे. 

३- कशाची तरी पैज लावा


तुमच्या जवळच्या मित्राला किंवा मैत्रिणीला दहा हजार रुपये द्या आणि सांगा की जोपर्यंत तुम्ही रोज दहा हजार पावले तीस दिवस चालत नाही तोपर्यंत त्यांनी तुम्हाला ते दहा हजार रुपये परत द्यायचे नाही . आता अचानक तुमचा सीरियसनेस वाढल्या सारखा तुम्हाला जाणवतोय का? 

खरं तर ह्या रोजच्या दहा हजार स्टेप्सची किंमत काही लाखात आहे पण ते आपल्याला समोर दिसत नाही म्हणून आपल्याला त्याची किंमत कळत नाही . तुम्ही नक्की ही दहा हजाराची रुपयांची पैज लावून बघा.

७- कोणत्याही सातत्यात  दोन दिवसाचा खंड पडू देऊ नका. 



रिसर्चमधून हे सिद्ध झालंय कि एखाद दिवस खंड पडला तर फार मोठा फरक पडत नाही पण जर सतत दोन दिवस वाया गेले, तर तुमची सवय निर्माण करण्याची शक्यता 55 टक्‍क्‍यांनी कमी होते. 

आमच्या मास्टरमाईंड कम्युनिटी मध्ये इतरांचे सतत प्रयत्न बघून शक्यतो प्रत्येक जण कोणतीही गोष्ट करण्यात २ दिवसांची गॅप टाळतो. 

८- गोष्टी शक्यतो सकाळी करण्याचा प्रयत्न करा. 


बऱ्याच वेळेला असं लक्षात आलंय की सकाळी आपला इगो फार कमी असतो आणि इच्छा शक्ती ( Will Power ) सगळ्यात जास्त . जस जसा दिवस पुढे सरकत जातो तशी आपली इच्छा शक्ती ( Will Power ) कमी होऊ लागते आणि इगो आपल्यावर जास्त हावी होऊ लागतो. 

दिवस सुरुवात होण्याआधीच महत्वाच्या गोष्टी हातावेगळ्या झाल्या तर एक वेगळीच ऊर्जा दिवसभर अनुभवायला मिळते. 

९- पेन आणि  प्लेजर ( Pain and pleasure) प्रिन्सिपल



सतत केलेल्या व्यायामामुळे तुम्हाला होणारे फायदे लिहून काढा

  • १-तुमची स्ट्रेस लेव्हल कमी होते
  • २-प्रतिकारशक्ती वाढते
  • ३-हाडं मजबूत होतात
  • ४-को-ऑर्डीनेशन चांगलं होतं
  • ५-स्मरणशक्ती सुधारते
  • ६-मूड चांगला होतो
  • ७-स्नायू मजबूत होतात
  • ८-संपूर्ण शरीराला ऑक्सिजन मिळतो
  • ९-आयुष्यमान वाढतं
  • १०-शरीरातून टॉक्सिन्स (Toxins) बाहेर टाकले जातात

आता ह्याच्या विरुद्ध व्यायाम न केल्याचे दुष्परिणाम बघूया

ह्या सगळ्या पॉइंट्सला  उलटं केलंत तर तुम्हाला व्यायाम न केल्याचे दुष्परिणाम मिळतील, शिवाय हार्ट-अटॅक डायबिटीससारख्या रोगांची भीती व वाढणारे वजन हे देखील आहेच. 

वरील गोष्टींची जर तुम्ही सातत्याने स्वतःला आठवण करून दिली तर तुम्ही नियमित व्यायाम करण्याची शक्यता खूप जास्त आहे. 

१०- जे हवे ते लिहून काढा


ज्यांच्याकडे त्यांना हवी असलेली ध्येये एका विशिष्ट पद्धतीत स्पष्टपणे लिहिलेली  असतात आणि ते सातत्याने त्यांना वाचून आपल्या मेंदूमध्ये जिवंत ठेवतात ते त्या मार्गावर चालण्याची शक्यता इतरांपेक्षा खूप जास्त असते. 

तुमची ध्येय  स्मार्ट असणं खूप महत्त्वाचं


  • Specific स्पष्ट
  • Measurable मोजता येण्यासारखी
  • Achievable साध्य होण्यासारखी
  • Realistic वास्तवाला धरून
  • Time bound कालमर्यादा असलेली 

Online स्वराज्य ब्लूप्रिंट ह्या माझ्या कोर्से मध्ये आम्ही हे फार सविस्तर शिकवतो आणि प्रत्येकाकडून करून घेतो. 

मला पूर्ण विश्वास आहे की वर सांगितलेल्या दहा गोष्टींवर जर तुम्ही सातत्याने काम करायला सुरुवात केलं तर नवीन सवयी निर्माण करणे आणि त्यांना चिकटून राहणे तुमच्यासाठी फार कठीण राहणार नाही . 

तुम्हाला जर स्वतःची इच्छाशक्ती नेक्स्ट लेवलला घेऊन जाऊन स्वतःची प्रॉडक्टिविटी वाढवण्याची इच्छा असेल तर तुम्ही माझा ऑनलाईन स्वराज्य हा ग्रुप नक्की जॉईन करू शकता . 

हा ब्लॉग संपूर्ण वाचल्याबद्दल तुमचे मनापासून आभार !

ब्लॉग कसा वाटला याबद्दल नक्की प्रतिक्रिया द्या. तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर कमेंट मध्ये नक्की विचारा.

ऑनलाईन स्वराज्य हा आपल्या सगळ्यांचा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि आपण तो मिळवणारच. 




५४ टिप्पण्या:

  1. खूप जबरदस्त सर ...ह्या सवयी आत्मसात केल्यामुळे मला व माझ्या मिशन इलेक्ट्रिकल एम्पायर मधील सभासदांना फायदेशीर ठरत आहे..👍

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. उत्कृष्ट ब्लॉग आहे सर,स्वतः नवीन सवयी लाऊन घेतल्या. त्यामुळे जीवनात अमुलाग्र बदल होताना दिसत आहेत. सेल्फ दिस्कपलीने असणं फारच आवश्यक आहे. ऑनलाईन स्वराज्यमुळे ते शक्य झाले आहे. ज्या गोष्टी शक्य नव्हत्या त्या करायला सुरुवात झाली आहे. ह्या ग्रुप मुळेच मी सकाळी 4 वाजता उठणे सुरू केले आहे. त्यामुळे सकाळचे 3-4 तास क्रिएटिव्ह काम कणाऱ्यांसाठी मिळतात. ऑनलईन स्वराज्य ग्रुपला पुढील वाटचलीसाठी माझ्या मनपूर्वक शुभेच्छा🙏

      हटवा
    2. सर खूप छान मार्ग दाखवला आहात
      माणसाच्या सर्व स्वभावाचा विचार करून मार्ग समोर ठेवला आहेत
      आमाला फक्त त्याचे अनुकरण करायचे आहे

      हटवा
  2. खूप जबरदस्त सर ...ह्या सवयी आत्मसात केल्यामुळे मला व माझ्या मिशन इलेक्ट्रिकल एम्पायर मधील सभासदांना फायदेशीर ठरत आहे..👍

    उत्तर द्याहटवा
  3. अतिशय सुंदर ब्लॉग...नवीन सवयी लावण्यासाठी खूप उपयुक्त👌👌🙏

    उत्तर द्याहटवा
  4. खूपच सुंदर ब्लॉग सर
    उपयुक्त मार्गदर्शन
    या टिप्स follow करून आपण नक्कीच चांगल्या सवयी लावून घेवू शकतो

    उत्तर द्याहटवा
  5. खूपच छान माहिती दिलेली आहे. याचा उपयोग करून चांगल्या सवयी लावण्यासाठी मदत नक्कीच होईल.Thank you so much sir...

    उत्तर द्याहटवा
  6. खुपच सुंदर ब्लॉग....खुप उपयुक्त माहिती

    खरे तर सर आपल्या online swarajya या course मधे आलय पासुन अनेक चांगल्या सवयी सुरु झाल्या

    त्या मधे सातत्य थेवन्यासाठी हा blogअतिशय उपयुक्त आहे

    Thank you sir

    उत्तर द्याहटवा
  7. खुप छान ब्लॉग सर नेहमी प्रमाणे, सर मध्यंतरी एक कविता केली होती"थोडे थोडे आनंदी रहा" त्यात आपण काय थोडे थोडे कमी केले तर आपण आनंदी कसे राहू शकतो हे लिहिले होते.

    तुमचा ब्लॉग प्रेरणादायी आहे. अभिनंदन

    उत्तर द्याहटवा
  8. अप्रतिम माहिती आहे सर्व काही। हे सर्व वाचून त्या गोष्टी आत्मसात केल्यास फायदा निश्चित होईल। परंतु या सर्व गोष्टी आपण नियमित केल्या पाहिजेत।

    उत्तर द्याहटवा
  9. केतन, खूप छान लिहीलंयस. प्रत्यक्षात आणता येणाऱे अनुभवसिद्ध उपाय सांगितले आहेस. पहिले ४ मुद्दे अत्यंत महत्त्वाचे वाटले. तसेच ६ आणि ७ सुद्धा. उत्कृष्ठ मार्गदर्शन.... अभिनंदन, केतन

    उत्तर द्याहटवा
  10. सर

    लगेचच आपल्या मार्गदर्शनाप्रमाणे अवलंब सुरु करतो. . खुप उपयुक्त आणि प्रेरणदायी

    उत्तर द्याहटवा
  11. खूपच सुंदर ब्लॉग लिहिला आहे.
    केतन सर, ऑनलाईन स्वराज्य कम्युनिटीमध्ये आल्यापासून आणि तुमच्याकडून योग्य प्रशिक्षण घेतल्यापासून माझ्या आयुष्यात वाखाणण्याजोगा बदल झालेला आहे
    आणि माझी स्वतःची किंमत खूपच वाढल्याचे मला जाणवत आहे. हा ब्लॉग वाचून जे जे लोक यावरती काम करून स्वतःला अद्ययावत करतील, ते आयुष्यात नक्कीच एक फार मोठी उंची गाठतील, यात शंकाच नाही.
    धन्यवाद...

    उत्तर द्याहटवा
  12. This blog will be subject of contemplation. The blog is very knowledgeable and descriptive with every subject has proper evidence.
    So naturally this blog will be a subject of study for long time.


    Thanking you

    Namdev Sandbhor

    उत्तर द्याहटवा
  13. Khupach chan blog ahe sir hya blog baron khup shikayla milala sirji. We are proud of you sir

    उत्तर द्याहटवा
  14. The way you are enlightening and encouraging others the big wave of positivity will take you to 1000000 followers soon...

    उत्तर द्याहटवा
  15. खूपच सुंदर ब्लॉग लिहिला आहे.
    केतन सर, ऑनलाईन स्वराज्य कम्युनिटीमध्ये आल्यापासून आणि तुमच्याकडून योग्य प्रशिक्षण घेतल्यापासून माझ्या आयुष्यात वाखाणण्याजोगा बदल झालेला आहे
    आणि माझी स्वतःची किंमत खूपच वाढल्याचे मला जाणवत आहे. हा ब्लॉग वाचून जे जे लोक यावरती काम करून स्वतःला अद्ययावत करतील, ते आयुष्यात नक्कीच एक फार मोठी उंची गाठतील, यात शंकाच नाही.आयुष्यात असे वाटले होते की शिक्षण फक्त शाळेत मिळतं त्याही पलीकडे अनमोल शिकायला मिळाले आपल्याकडून सर खूप खूप
    धन्यवाद...

    उत्तर द्याहटवा
  16. 👌 खूप छान टीप आहेत. अशा माहिती मुळे मनाची उजळणी होते
    धन्यवाद.

    उत्तर द्याहटवा
  17. खूपच अनमोल मार्गदर्शन आहे सर... मी यावर नक्कीच अवलंब करेल...

    उत्तर द्याहटवा
  18. सूचना फारच सुंदर आहेत. सातत्य राखण्यासाठी आपण माध्यमे देखील शोधू शकता जसे मी कुत्रा पाळला होता त्याला सकाळी व सायंकाळी फिरवणे अपरिहार्य होते तर मी 2004 ते 2013 सातत्याने 9 वर्ष सकाळी व सायंकाळी 40 ते 60 मिनीटे फिरावयास जात असे

    उत्तर द्याहटवा
  19. खूप छान ब्लॉग लिहिला आहे सर आम्हाला आमच्या कामात खरंच सातत्य कसे ठेवावे आणि का ठेवावं याची खूप चांगली माहिती तुम्ही दिली..🙏

    उत्तर द्याहटवा
  20. खुपच जबरदस्त ब्लॉग लिहिला आहे मी या दहा सवयी आत्मसात करण्याचा नक्की प्रयत्न करेन...
    धन्यवाद केतन सर

    उत्तर द्याहटवा
  21. सर खूपच सुंदर आहे, आमच्या सवई बदलण्यामध्ये तुमचा सिंहाचा वाटा आहे.

    उत्तर द्याहटवा
  22. खूप जबरदस्त सर ... खरंच SMART व अप्रतिम असा ब्लॉग लिहला आहे. लिहणारे आपण ही स्मार्ट आणि हे पाळणारे पण होतील स्मार्ट.

    उत्तर द्याहटवा
  23. अतिशय सुंदर ब्लॅाग सर, सर्वच वयोगटातील लोकांसाठी महत्वाचे आणि उपयुक्त असे मार्गदर्शन 🙏🏻

    उत्तर द्याहटवा
  24. अतिशय सुंदर ब्लॅाग सर, सर्वच वयोगटातील लोकांसाठी महत्वाचे आणि उपयुक्त असे मार्गदर्शन 🙏🏻

    उत्तर द्याहटवा
  25. खूप सुंदर ब्लॉग सर.मिशन ऑनलाईन स्वराज्य जॉईन केल्यावर लाईफ मध्ये आमूलाग्र बदल होण्यास नक्कीच मदत होते.चांगल्या सवयीनबरोबर योग्य लोकांची साथ इथे मिळते आहे. Thank you Sir.

    उत्तर द्याहटवा
  26. सर तुम्ही नेहमीच काहीतरी छान प्रेरणा घेऊन येता. हे देखील लिखाण खूपच मस्त. मिशन ऑन लाईन स्वराज्य जॉईन करायला निश्चतच आवडेल.

    उत्तर द्याहटवा
  27. सर खूपच छान मार्गदर्शन केले आहे, आपणाकडून ट्रेनिंग घेतल्यापासून आणखी बदल झालेला आहे, gd article, once again thanks for revision

    उत्तर द्याहटवा

आयुष्यावर प्रभुत्व मिळवण्यासाठी स्वतः वर प्रभुत्व मिळवा - ह्या मूलभूत गोष्टींवर काम करा

आयुष्य हातातून चाललंय असं तुम्हाला वाटतं का ? तुमच्या सवयींवर तुमचा ताबा नाही असं तुम्हाला वाटतं का? सतत चिडचिड होते का ? तुमची करिअर कुठेत...