आयुष्यात तुम्ही सांगण्यासारखं काहीही मिळवलेलं असेल तर नक्कीच तुमच्या मनात एक सुप्त इच्छा असणार ,
इतरांना माझ्याबद्दल कळावं आणि मी ज्या अग्निदिव्यातून गेलो त्यातून इतरांना काही शिकावण मिळावी .
तुम्ही जर व्यवसायात , नोकरीत , कलेत किंवा एखाद्या परीक्षेत उत्तुंग यश मिळवलं असेल तर तुमच्या अनुभवातून तुम्ही इतरांना मार्गदर्शन करून , त्यांना दिशा दाखवण्याची तळमळ तुमच्यात नक्कीच असणार .
कल्पना करा , विश्वास नागरे पाटील सर किंवा प्रकाश बाबा आमटे ह्यांच्या सारखे तुम्हालाही लोक फॉलो करतात आणि तुमच्याकडे एखाद्या रोल मॉडेल प्रमाणे पाहतात .
कदाचित ह्या दिग्गजांएवढे मोठे आपले कार्य नसेल पण कित्येकांना प्रेरणा देणारे नक्कीच असेल.
माझे गुरुजी नेहमी म्हणतात तुम्ही आज जे आयुष्य जगताय ते कित्येकांसाठी फक्त एक दिवास्वप्न आहे.
तुमच्या अनुभवातून जर तुम्ही त्यांना मार्गदर्शन करू शकलात तर कळत नकळत कित्येक आयुष्यांना योग्य दिशा देण्याचे काम तुमच्या हातून होऊ शकतं .
हे करण्याची सगळ्यात सोप्पी पद्धत म्हणजे तुमचा online ब्रँड निर्माण करणे आणि तो कसा करायचा हे जर तुम्हाला जाणून घ्याचे असेल तर हा ब्लॉग शेवट पर्यंत वाचा .
नमस्कार माझं नाव केतन गावंड - ऑनलाइन स्वराज्यसारथी!
मिशन ऑनलाइन स्वराज्य ह्या प्लॅटफॉर्मचा संस्थापक येत्या तीन वर्षांमध्ये एक लाख ऑनलाईन स्वराज्य घडवणे हा माझा ध्यास आहे .
चला तर मग सुरुवात करुया.
1) फोकस ठेवा
बऱ्याच वेळेला लोक सगळेच करण्याचा प्रयत्न करतात.
मी हे देखील करतो, ते देखील करतो आणि मला सगळं येतं .
ब्रँडिंगचा पहिला नियम सांगतो , आपल्या संवादात स्पष्टता असणं खूप महत्त्वाचं clarity of communication is most important.
मी देखील बऱ्याच गोष्टी करतो पण ऑनलाइन स्वराज्याच्या प्लॅटफॉर्मवर मी फक्त सातत्याने एकच गोष्ट बोलतो.
माझं नाव केतन गावंड ऑनलाइन स्वराज्यसारथी आणि येत्या तीन वर्षात एक लाख ऑनलाईन स्वराज्य निर्माण करणे हा माझा ध्यास.
हे जितकं स्पष्टपणे समोरच्याला सांगता येईल, तितकी स्पष्ट त्यांच्या मनात आपल्याबद्दलची प्रतिमा निर्माण करता येईल.
ऑनलाईन स्वराज्य मध्ये माया दणके मॅडम आहेत ज्या 2025 मध्ये होणाऱ्या ऑलिंपिकसाठी महाराष्ट्रातल्या शंभर मुलांना शारीरिक आणि मानसिकरित्या तयार करत आहेत , आणि सध्या त्या सातत्याने याबद्दलच बोलत आहेत.
तुम्ही विचार करून बघा की जर एखादी गोष्ट ज्यासाठी सगळ्यांनी तुम्हाला लक्षात ठेवावं असं वाटत असेल, तर ती गोष्ट कोणती असेल?
2) जसे आहात तसे व्यक्त व्हा
तुमच्यासारखं काम करणारे कित्येक असतील पण तुमचं व्यक्तिमत्त्व असणारे तुम्ही आणि फक्त तुम्हीच आहात,
आणि जेव्हा तुम्ही आहात तसे व्यक्त व्हायला शिकता, त्यावेळी कळत नकळत तुमचा एक वेगळा ब्रॅण्ड लोकांच्या मनात घर करायला लागतो.
आपण जर दुसऱ्या कोणाला तरी कॉपी करून यशस्वी होण्याचा विचार करत असू तर ते बऱ्याच वेळेला शक्य होत नाही.
- मग तुमचं वेगळेपण कशात आहे?
- तुमच्याकडे असं काय आहे जे इतरांकडे नाही?
हे करण्याची सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे तुमच्या आयुष्यात सातत्याने घडणाऱ्या घटना इतरांसमोर मांडणं.
- तुम्ही एखादं पुस्तक वाचलं
- तुमच्या आयुष्यात एखादी महत्त्वाची गोष्ट घडली
- तुम्हाला एखादा पुरस्कार मिळाला
- तुम्हाला एखादी गोष्ट खटकली
ह्या गोष्टी जितक्या प्रामाणिक आणि प्रांजळपणे तुम्ही इतरांसमोर मांडू शकाल तितका तुमचा ब्रँड बनायला मदत होईल.
इंग्लिश मध्ये खूप सुंदर म्हण आहे - Document your journey genuinely and regularly
3) गोष्टी सांगा
तुम्ही जेव्हा ही गोष्ट वाचाल तेव्हा तुम्ही अजयला थोडं जास्त चांगलं ओळखू लागाल आणि नकळतच अजय बरोबर एक वेगळं नातं निर्माण होईल.
तुम्हाला तुमच्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्या आणि तुमच्या क्षेत्रात यशस्वी बनवणाऱ्या गोष्टी मांडता येणं खूप महत्त्वाचं. गोष्टी सांगता येणं ही एक कला आहे आणि बहुतेक सगळ्या प्रभावी लोकांकडे ती नक्की असते.
गोष्टी सांगताना त्याचे चित्र इतरांच्या डोळ्यासमोर जितकं परिपूर्ण उभ राहील तितकी ती गोष्ट समोरच्या मनात घर करेल.
4) सातत्य ठेवा
माझं खूप आवडत वाक्य , पाण्याच्या आणि दगडाच्या युद्धात नेहमी पाणी जिंकतं, ताकदीवर नाही तर सातत्यावर.
लॉक डाऊनच्या काळात मी जवळजवळ 200 व्हिडीओ सातत्याने माझ्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आणि त्याचा प्रचंड फायदा माझ्या ब्रँड बिल्डिंग मध्ये झालेला मी अनुभवत आहे.
एकदा तुम्हाला विषय सापडला, स्वतःचा ब्रँड कोणत्या क्षेत्रात निर्माण करायचं हे पक्क झालं की त्यानंतर सातत्याने त्या विषयाबद्दल बोलत राहणं खूप महत्त्वाचं.
आज टेक्नॉलॉजीच्या मदतीने तुमच्या विषयाच्या संदर्भातला ज्ञानाचा अमर्याद साठा कसा शोधून काढायचा आणि त्याच्या मदतीने आपला ब्रँड कसा बनवायचा हे मी माझ्या ऑनलाईन स्वराज्य ब्लूप्रिंट ह्या कोर्समध्ये शिकवतो.
5) अपयशाची मानसिक तयारी ठेवा
बऱ्याच वेळेला यशस्वी लोक अपयशासाठी अजिबात तयार नसतात.
बऱ्याच वेळेला ते कृती टाळण्यासाठी कित्येक कारणे देतात,
- मला अजून कॅमेरा समोर जाता येत नाही
- मला सोशल मीडिया जमत नाही
- मला ब्लॉग लिहिता येत नाही
- मला हवा तेवढा आत्मविश्वास आलेला नाही
- माझ्याकडे आवश्यक ती उपकरणं नाहीत
ही कारणे देण्यामागे एकच खरं कारण असतं आणि ते म्हणजे त्यांना अपयशाला सामोरे जायचं नसतं.
पण जोपर्यंत तुम्ही सुरुवात करून त्या अपयशाला कवटाळत नाही, तोपर्यंत पुढचा रस्ता तुम्हाला दिसतच नाही.
मी लॉकडाऊनमध्ये सुरुवात केलेल्या चला व्हिडिओ बनवायला शिकूया ह्या सीरिजमध्ये कित्येकांनी लगेच ऍक्शन घेतली आणि आज ते उत्कृष्ट व्हिडिओ बनवत आहेत आणि कित्येक टॅलेंटेड मित्र आजही मला फक्त कारणंच देत आहेत.
बऱ्याच वेळा इतरांच्या आयुष्यात काय फायदा होणार आहे याचा विचार करण्यापेक्षा मला लोक काय म्हणतील हा विचार करण्यातच लोक बराच वेळ फुकट घालवतात.
तुम्ही तसं करू नका ,ॲक्शन घ्या , तुमचा ब्रँड बनवायला सुरुवात करा.
6)सकारात्मक प्रभाव
तुमचा ब्रँड यशस्वी करण्यासाठी सगळ्यात मोठं मोटिवेशन असणार आहे, तुमच्या कामामुळे इतरांच्या आयुष्यात पडणारा सकारात्मक प्रभाव.
सातत्याने डोळे बंद करून ही कल्पना करा की तुम्ही जे करण्याचा प्रयत्न करत आहात, ते जर तुम्ही नीट करू शकलात तर किती हजारो ,लाखो लोकांच्या आयुष्यात तुम्ही जबरदस्त सकारात्मक प्रभाव पाडू शकाल.
एकदा हा विचार तुमच्या मनात रुजला की बाकी सगळ्या चिंता , काळजी गळून पडतात आणि तुम्ही जबरदस्त काम करायला तयार होता.
7)यशस्वी व्यक्तींच्या पाऊलखुणांवर चाला
आज आपण ज्या वाटेवर चालण्याचा प्रयत्न करतोय त्या वाटेवर कित्येक दिग्गजांच्या पाऊलखुणा आहेत.
आपण जर थोडासा अभ्यास केला आणि ते कोणत्या कोणत्या गोष्टी सातत्याने करत आहेत हे समजून घेऊन जर त्या मार्गावर चालायला लागलो तर आपला देखील पर्सनल ब्रँड बनायला वेळ लागणार नाही.
याआधी ऑनलाईन पर्सनल ब्रँडला जास्त महत्त्व दिलं जात नव्हतं, पण लॉकडाऊन आणि कोरोनानंतरच्या परिस्थितीमध्ये प्रत्येकालाच याची जाणीव झाली आहे की जर आपण घरातून बाहेर पडू शकत नसू तर अश्या परिस्थितीत आपला ऑनलाइन ब्रँड असणं किती महत्वाचं आहे.
कित्येक कवी, लेखक, शासकीय अधिकारी, खेळाडू , ट्रेनर आणि उद्योजक हे आता सातत्याने ऑनलाईन येऊन स्वतःचे विचार मांडत आहेत ,इतरांचे प्रॉब्लेम सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत.
डोळे उघडे ठेवा तुम्हाला आजूबाजूला बरीच प्रेरणा मिळेल. तुम्ही जे करण्याचा प्रयत्न करत आहेत ते करणारे बरेच तुम्हाला online गवसतील .
8)तुमचा ब्रँड प्रत्येक क्षणी जगा
तुम्ही काम करायला लागल्यावर, हळूहळू इतरांच्या डोक्यामध्ये तुमच्याबद्दल एक विशिष्ट प्रकारची प्रतिमा निर्माण व्हायला सुरुवात होते आणि तोच तुमचा ब्रांड असतो.
आता तुमचं काम आहे इतरांकडून ते समजून घेणं की नक्की ते तुमच्याबद्दल काय विचार करतात .
मी जेव्हा पण माझ्या कम्युनिटीतील लोकांना विचारतो की ऑनलाईन स्वराज्य किंवा केतन गावंड म्हटल्यावर तुमच्या डोक्यात काय येतं?
दरवेळी मला पुढील काही उत्तर मिळतात
- सातत्य
- ऊर्जा
- देण्याची भावना
- मोटिवेशन
- स्पष्टता
- कॉन्फिडन्स
आता मी रोज जे काही करतो त्यातुन ह्याच भावना जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि जोपर्यंत मी हे करत राहील तोपर्यंत माझा ब्रॅण्ड जास्तीत जास्त स्ट्रॉंग होत राहील.
9) इतरांना तुमची गोष्ट सांगण्यास प्रवृत्त करा
तुम्ही तुमच्याबद्दल सांगणे ही एक गोष्ट,पण ज्यावेळी इतर तुमच्याबद्दल त्यांच्या मित्र- मैत्रिणींकडे ,सहकार्यांकडे बोलायला सुरुवात करतात तेव्हा तुमचा ब्रँड खरंच वायरल होण्यास सुरुवात होतो.
वर्ड ऑफ माऊथ (Word of mouth ) पब्लिसिटी हे ब्रँड बनवण्याचं आज कालचं सगळ्यात मोठे हत्यार आहे.
आज आपल्याला दिसत असलेले कित्येक मोठे ब्रँड हे जाहिरातीच्या जीवावर नाही तर फक्त वर्ड ऑफ माऊथ (Word of mouth ) मुळे मोठे झालेले आहेत .
10) तुम्ही नसतानाही इतरांना कामी पडतील अश्या गोष्टी करून ठेवा
आजच्या अनिश्चित परिस्थितीत काहीच सांगता येत नाही , बऱ्याच महारथींच्या इच्छांना केवळ दिवास्वप्नांमध्ये रूपांतरित करण्याची ताकद या काळात आहे , मग द्यायचं मनातच राहून जातं आणि आधी केलं असतं तर बरं झालं असतं असा म्हणण्याची वेळ आपल्या सगळ्यांवर येऊ शकते.
वर्तमानात जगा , जे शक्य आहे ते करून मोकळे व्हा.
तुमचे अनुभव
- कागदावर उतरवा
- व्हॉइस रेकॉर्डिंग करून ठेवा
- व्हिडिओरूपात संग्रही करा .
तुमचे अनुभव तुमच्यासाठी फारच सामान्य वाटणारी आणि रोजचीच गोष्ट असू शकते, पण कोणासाठी तरी ती आयुष्य बदलणारी संकल्पना असू शकते.
ज्यांचं आयुष्य तुम्ही बदलणार आहात त्यांच्यासाठी तुम्ही अमिताभ बच्चनपेक्षा मोठा स्टार बनू शकता.
हा ब्लॉग शेवटपर्यंत वाचल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे कमेंटद्वारे मला नक्की कळवा.
तुम्हालादेखील तुमचा ऑनलाईन ब्रँड निर्माण करून स्वतःचं ऑनलाईन स्वराज्य निर्माण करायचं असेल तर माझा फेसबुक ग्रुप नक्की जॉईन करा.
तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही मला नक्की विचारू शकता.
ऑनलाईन स्वराज्य हा आपल्या सगळ्यांचा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि आपण तो मिळवणारच.
धन्यवाद!












खूप उपयोगी टिप्स दिल्या आहेत.... Real उदाहरणे देऊन छान प्रकारे explain केले आहे...👍👍👌👌
उत्तर द्याहटवाThank you So much Amruta
हटवाखूपच छान blog..अतिशय छान माहिती 🙏
हटवाKhupach chhan blog sarvansathi upayukta ahe
हटवाखूपच छान ब्लॉग सर
उत्तर द्याहटवायाचा नक्कीच सर्वांना उपयोग होईल
Thank you So much UC
हटवाWah khup useful tips
उत्तर द्याहटवाTruth of life
Walk the talk is Branding
Thank you So much Doctor
हटवाखुपच छान ब्लॉग सर
उत्तर द्याहटवाखरच खुप प्रेरणा देणार
वाचता क्षणीच खरच आपण ही काहितरी आहोत अशी आत्म प्रतिमा निर्माण झाली स्वतहाबददल
आणी सर online स्वराज्य या आपल्य cource मधून जाताना आत्मविश्वास पण मिळतोय...
एक प्रेरणादायी व्यक्तिंमत्व आपण ही बनू शकतो हा विश्वास
तुमच्या मार्गदर्शनातून मिळाला सर
खुप धन्यवाद सर
खरच खुप छान लेखन
God bless you
खूपच छान , very informative
हटवाThank you Shraddha
हटवाखूप छान सर...
उत्तर द्याहटवाखूप महत्त्वाचा ब्लॉग लिहिला आहे...
जे अजून झोपेत आहे त्यांच्यासाठी तर उपयोगी आहे परंतु आम्ही अजून शिकत आहे आम्हाला पण रिविजन साठी फार फार याचा उपयोग होत आहे त्यासाठी सर मी तुमची खूप खूप आभारी आहे...
थँक यु थँक यु थँक यु सो मच सर...!
Thank you Alka Tai
हटवासर,खूपच प्रेरणादायी लेख आहे.आणि त्यापासून खूप काही शिकता येईल,धन्यवाद सर.
उत्तर द्याहटवाThank you Sir
हटवासर,खूपच प्रेरणादायी लेख आहे.आणि त्यापासून खूप काही शिकता येईल,धन्यवाद सर.
उत्तर द्याहटवाखूपच मार्गदर्शक
उत्तर द्याहटवामीच माझा अमिताभ बच्चन-स्वतःचा सुपरस्टार ब्रँड निर्माण करण्याच्या १० अफलातून टिप्स...Amezing🙏
Thank you Seema Tai
हटवाही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवाSuperb Article Sir.Got Great insights.
हटवाThank you
हटवाखूपच सुंदर सर ब्लॉग आहे किती छान छान उदाहरणे देऊन स्पष्टता दिली आहे Great
उत्तर द्याहटवाThank you Shweta mam
हटवा👍👍👌
उत्तर द्याहटवाFantastic and Powerful. एक्दम चपलख लिखाण. धन्यवाद. Eye-opener for me.
उत्तर द्याहटवाThank you Nehal mam
हटवाKhupach chhan Tips, Great
उत्तर द्याहटवाThank you
हटवाKhupach Chhan Tips, Useful to us
उत्तर द्याहटवाउत्तम लेख.
उत्तर द्याहटवाह्या ब्रँड building लेखानंतर नंतर पुढील लेखाची वाट बघू ज्यात ब्रॅण्डिंग नंतरच्या स्टेज बद्दल अनुभव कथन असेल.
खुप उपयुकत टिप्स सोप्या शब्दात ,धन्यवाद सर !
उत्तर द्याहटवाखुप उपयुकत टिप्स सोप्या शब्दात ,धन्यवाद सर !
उत्तर द्याहटवाखुप जबरदस्त माहिती Sir, thanks you
उत्तर द्याहटवाखूप कोरीव लिखान sir
उत्तर द्याहटवाआपण खरं सांगितलं सर, आपल्याला स्वतःबद्दल खूप गोष्टी सामान्य वाटतात आणि म्हणून त्या इतरांपुढे आपण व्यक्त करत नाही. स्वतःला व्यक्त करणे ही देखील एक कला आहे. हे मार्गदर्शन दिल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद सर
उत्तर द्याहटवामीनल अग्रवाल
उत्तर द्याहटवानमस्कार मीनल अग्रवाल
उत्तर द्याहटवाआपण खरं सांगितलं सर आपल्या स्वतः बद्दल खूप गोष्टी सामान्य वाटतात आणि म्हणून त्या इतरांपुढे आपण व्यक्त करत नाही. स्वतःला व्यक्त करणे हीदेखील एक कला आहे. हे मार्गदर्शन दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद सर.
थँक्यू सो मच
हटवासर,खूपच प्रेरणादायी लेख आहे.आणि त्यापासून खूप काही शिकता येईल,धन्यवाद सर
उत्तर द्याहटवाखूप छान माहिती दिली सर आणि जर ह्या टिप्स फोलो केल्या तर प्रत्येक जण आपलं ऑनलाईन स्वराज्य निर्माण करण्यात नक्कीच सक्षम होईल.
उत्तर द्याहटवासर एक no. माहिती दिली आहे फार छान टिप्स दिल्या आहेत ह्यात एकदम पॉवरफुल्ल , स्वतःला एक्स्प्रेस करन फार गरजेचे आहे .
उत्तर द्याहटवाVery informative and useful tips to build a Brand.
उत्तर द्याहटवाKhupch Chan ani ekdm sopya shabdat tumhi samjvl ahe khup positive energy yete tumche vichar vachtana aiktana thank you so much sir
उत्तर द्याहटवाKhup sundar blog, zopi gelela jaga hoil sir.
उत्तर द्याहटवाखुपच छान ब्लॉग आहे सर,बऱ्याच जणांचा आयुष्य बदलणारा हा ब्लॉग असणार आहे.
उत्तर द्याहटवाखूपच छान ब्लॉग.. यामुळे नक्कीच आम्हाला मोठा ब्रँड बनायला मदत होईल.
उत्तर द्याहटवाSir best thing about you is you teach what you preach. It is very easy to give gyan but setting an example by doing what you are teaching is a great thing and you have proved that. We all respect you for that. Thank you sir.
उत्तर द्याहटवाThank you so much
हटवाउत्कृष्ट ब्लाॅग केतन सर... प्रत्यक्षातल्या उदाहरणांमुळे मनाला भावला... धन्यवाद सर.
उत्तर द्याहटवाअतिशय पाॅवरफुल हेड लाईन👍
उत्तर द्याहटवात्यामुळे वाचण्यासाठी उत्सुकता निर्माण होते.
स्वतःचे उदाहरण दिल्यामुळे आणखी मनाला भावतो.
स्वतःचा ब्रॅण्ड बनवण्यासाठी अतिशय उपयुक्त टिप्स दिल्या आहेत सर खूप धन्यवाद
Thank you Sunita tai
हटवाअप्रतिम लेख सर ! खूप प्रामाणिक , मनाला भिडणारं ! तुमच्या शेवटच्या पॉईंट वर मी ऍक्शन घेणार aahev👍
उत्तर द्याहटवाकेतन सर खूप जबरदस्त माहिती दिला आहात. आपलं बोलणं लिखाण सर काही उर्जावान आहे. प्रचंड ऊर्जा मिळते तुमच्या व्यक्तिमत्वातून, लिखाण, व्हिडीओ मधून. धन्यवाद सर 💐💐💐💐
उत्तर द्याहटवाThank you Ajay Sir
हटवाKhupach chhan blog sarvansathi upayukta ahe
उत्तर द्याहटवाKhupach chhan blog sarvansathi upayukta ahe
उत्तर द्याहटवासुपर्ब ब्लॉग .खूप clarity मिळाली.अन उधारणे आपल्यातील असल्या मुळे इझी to understand .
उत्तर द्याहटवाPreranadayi likhan....
उत्तर द्याहटवा