लाखो लोकांप्रमाणे तुमच्यासाठी देखील ही दिवाळी वेगळी आहे का?
अचानक बदललेल्या परिस्थितीने भविष्य अनिश्चित झाल्याची चिंता तुम्हाला भेडसावत आहे का?
वरीलपैकी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर जर हो असं असेल तर हा ब्लॉग तुमच्यासाठीच आहे.
नमस्कार माझं नाव केतन गावंड!
ऑनलाइन स्वराज्यसारथी!
येत्या तीन वर्षात 100000 ऑनलाइन स्वराद्योजक घडवणे हा माझा ध्यास आहे.
चला तर मग सुरुवात करुया
अचानक कोरोना आला, लॉकडाऊन सुरू झालं, अर्थव्यवस्था कोलमडली आणि त्याबरोबर कित्येकांचा आत्मविश्वास देखील कोलमडला.
अनेक वर्षे ज्या कामामध्ये आपण स्वतःला झोकून दिलं, त्यातून पैसे मिळणं बंद झालं, घर चालवणे कठीण होऊन बसलं
2010 पासून मी ट्रेनिंग क्षेत्रात आहे.
महिन्यातून पंधरा ते वीस दिवस, वेगवेगळ्या उद्योजकांना,शासकीय अधिकाऱ्यांना ट्रेनिंग देणं हे माझं रोजचं काम, त्यात कधी खंड पडेल असं देवाच्या दयेने वाटलंच नाही आणि अचानक ही परिस्थिती उद्भवली.
माझी संपूर्ण काम ठप्प झालं.
पण आज साधारणतः अडीचशे दिवसानंतर एका वेगळ्याच आत्मविश्वासाने मी पुन्हा उभा राहतो आहे.
गेल्या आठ महिन्याचा काळ जरी संघर्षात्मक असला, तरी ह्यातून मला अशा काही गोष्टी शिकायला मिळाल्या आहेत ज्याच्या मदतीने कोणतीही व्यक्ती जीला
- आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे आहे
- स्वतःचा ठसा उमटवायचा आहे
- वेळेचं पैशाचं आणि निवडीचं स्वातत्र्य मिळवायचे आहे
- स्वतःचं स्वराज्य निर्माण करायचे आहे , ती प्रत्येक व्यक्ती यशस्वी ऑनलाइन स्वराद्योजक बनू शकते
चला तर मग बघुया पुढच्या दिवाळीपर्यंत तुमचं भविष्य कोरोना प्रूफ (Corona -Proof ) करण्याच्या नऊ मूलभूत टिप्स
१) स्वतःच्या आवडत्या क्षेत्रात सतत प्रगती करत राहून टॉप दहा टक्क्यांमध्ये स्वतःची जागा निर्माण करा
तुम्हाला हे नक्कीच माहिती असेल की कुठल्याही क्षेत्रातले टॉप 10 टक्के लोक हे त्या क्षेत्रातला 90 टक्के पैसा कमवतात आणि उरलेले 90 टक्के फक्त दहा टक्के साठी झगडत राहतात.
आज तुम्ही कुठेही उभे असाल, सगळ्यात पहिली गोष्ट जी तुम्हाला स्वतःला ठामपणे सांगायची आहे ती म्हणजे, मी माझ्या क्षेत्रातल्या टॉप-10 टक्क्यांमध्ये जागा बनवणार.
कदाचित तुम्हाला हे अशक्य वाटेल पण , आज जे त्या दहा टक्क्यात जाऊन बसले आहेत ते काही महिन्यांपूर्वी किंवा वर्षांपूर्वी तिकडे नव्हते. त्यांनी काही गोष्टी सातत्याने केल्या आणि त्यामुळे ते तिथे पोहोचू शकले आहेत.
सातत्य चिकाटी आणि ध्यास यांच्या जोरावर तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये पॅशनेट (passionate ) आहात त्या क्षेत्रात असामान्य उंची गाठू शकता.
२) योग्य वातावरणात राहणे
आजपासून पाच वर्षानंतर तुम्ही कुठे असाल हे दोनच गोष्टींवर अवलंबून आहे, तुम्ही कोणती पुस्तके वाचता आणि कोणाबरोबर राहता.
वातावरणाचा आपल्या प्रॉडक्टिविटीवर, मानसिकतेवर व सकारात्मकतेवर सातत्याने प्रचंड परिणाम होत असतो.
तुमच्या क्षेत्रातल्या अनुभवी, यशस्वी आणि मार्गदर्शन देणाऱ्या लोकांबरोबर तुम्ही जास्तीत जास्त वेळ घालवला तर तुम्ही टॉप टेन मध्ये पोहोचण्याची शक्यता खूप जास्त वाढते.
३) योग्य मार्गदर्शन घेणे
एखादी व्यक्ती दहा वर्षाच्या अथक परिश्रमांने व संघर्षाने ज्या गोष्टी शिकते, त्या गोष्टी दहा तासात शिकवून तुम्हाला त्यामध्ये तज्ञ बनवू शकते.
आज इंटरनेटवर कितीतरी माहिती मोफत उपलब्ध आहे आहे, पण दुर्दैवाने त्यांने परिणाम कधीच मिळत नाहीत.
ज्या मार्गदर्शनासाठी आपण पैसे मोजतो तेच मार्गदर्शन आपण सिरियसली घेतो. मी जे बोलतोय ते पटतंय ना ?
People who pay money, pay attention, people who pay attention, take action, people who take action get results
वरील वाक्य 100% खरं आहे. जे पैसे देतात, तेच लक्ष देतात ,जे लक्ष देतात ,ते कृती करतात आणि जे कृती करतात ,त्यांनाच रिझल्ट मिळतात.
तुमच्या क्षेत्रातला योग्य गुरु कोण आणि तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचायला तुम्हाला योग्य मार्गदर्शन कोण करू शकतो ह्याचा शोध घ्या आणि गरज पडली तर त्यासाठी खर्च करायला देखील तयार राहा.
४) ऑनलाइन जगतात स्वतःची छाप निर्माण करा
कोरोनाने एक गोष्ट तर आपल्याला नक्की शिकवली आहे की जर आपण घरातून बाहेर पडू शकत नसू तर घरात बसून आपल्याला इतरांपर्यंत पोहोचता आलं पाहिजे.
आज जर इतरांच्या आयुष्यात बदल घडवणारी
- अशी एखादी माहिती
- असा एखादा प्रॉडक्ट
- अशी एखादी सर्विस
पण लाखो-करोडो मॅसेजच्या गदारोळात तुमचा मॅसेज हरवून जाण्याची शक्यता फार जास्त आहे.
म्हणूनच सातत्याने इतरांना व्हॅल्यू (Value ) देणारे लेख लिहिणे, व्हिडिओ बनवणे ,प्रश्नांची उत्तरे देणे , हे करत राहून तुम्ही तुमच्या संभाव्य ग्राहकांची एक जबरदस्त कम्युनिटी बनवू शकता आणि मग त्यांच्या मार्फत तुमचं ऑनलाईन स्वराज्य उभं करू शकता.
हे तुम्हाला दोन प्रकारे करता येईल
- एक तर खर्च करून advertise करा किंवा
- वेळ देऊन advertise करा
सुरूवातीला जर तुमच्याकडे advertise वर खर्च करण्यासाठी पैसे नसतील तर स्वतःच्या ज्ञानाच्या मदतीने तुम्ही थोडासा वेळ खर्च करून स्वतःसाठी वातावरण निर्मिती करू शकता.
आज माझ्या ऑनलाईन स्वराज्य ह्या ग्रुप मध्ये पाच हजार शंभर समविचारी लोक आहेत आणि सातत्याने एकमेकांना मदत करणारी आणि एकमेकांबरोबर मोठी होणारी एक जबरदस्त कम्युनिटी निर्माण होत आहे.
५) सातत्याने मूलभूत गोष्टींवर काम करा
माझ्या सगळ्यात पहिल्या बॉसने मला शिकवलेलं कदाचित सगळ्यात महत्त्वाचं वाक्य,When you're in doubt go back to basics.
पुढे करायचं काय हे कळत नसेल तर मूलभूत गोष्टींवर काम करायला सुरुवात करा.
स्वतःला पुढील सहा प्रश्न विचारून बघा
तुम्ही स्वतःची तब्येत चांगली ठेवण्यासाठी रोज काय करताय?
तुमचे विचार आणि मन सशक्त बनवण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करताय?
तुम्ही सातत्याने ध्यान करून ह्या अनिश्चित परिस्थितीत स्वतःला शांत ठेवत आहे का?
गेल्या पंधरा दिवसात स्वतःच्या क्षेत्राबद्दल तुम्ही काही नवीन शिकलात का?
तुमचे नातेसंबंध सुदृढ करण्यासाठी गेल्या महिन्याभरात तुम्ही जाणीवपूर्वक कोणते प्रयत्न केलेत ?
तुमच्या लॉंग-टर्म ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी गेल्या महिन्याभरात तुम्ही जाणीवपूर्वक एखादी गोष्ट केली का?
गोष्टी सामान्य असतील आणि आयुष्य नॉर्मल असेल तेंव्हा, आपण आपल्या रोजच्या कामात एवढे व्यस्त असतो की या सगळ्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी आपल्याकडे वेळच नसतो, आज जर देवाच्या दयेने ती वेळ तुमच्यासाठी उपलब्ध आहे तर रोज ह्या सहा प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करा
६) व्यक्त व्हायला शिका
बोलणाऱ्याची माती देखील विकते आणि न बोलणार्यांच सोनं देखील पडून राहतं.
मी अशा कित्येक लोकांना ओळखतो,ज्यांच्याकडे इतरांना शिकण्यासारखं , समाजाला देण्यासारखं भरपूर काही आहे पण दुर्दैवाने लेखणीच्या स्वरूपातून, त्यांच्या आवाजाच्या स्वरूपातून किंवा व्हिडिओ मार्फत व्यक्त होणे हे ते शिकलेले नाहीत.
कदाचित कालपर्यंत त्यांनी केलेल्या कामांमध्ये ह्या कशाचीच गरज नव्हती पण आत्ता उद्भवलेल्या या परिस्थितीमध्ये आपल्याला व्यक्त होता येणं हे खूप जास्त महत्वाचं झालेलं आहे
आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात 95 टक्के लोकांचं दुःख हेच असतं की ते बरंच काही करू शकत होते पण त्याना व्यक्त होता आलं नाही आणि म्हणून त्या गोष्टी राहून गेल्या . कोरोनाच्या निमित्ताने का होईना , जबरदस्तीने का होईना आज आपल्यावर व्यक्त होण्याची वेळ आलेली आहे , त्यामुळे आपण सगळ्यांनीच ते शिकणं खूप महत्त्वाचं आहे.
मी माझ्या Online स्वराज्य Blueprint ह्या कोर्स मध्ये एका होतकरू उद्योजकाला ब्लॉगर , पॉडकास्टर आणि युटूबर बनायला शिकवतो .
७) वायफळ खर्च कमी करा
आपल्या अतिशय चांगल्या काळात जेव्हा पैसा भरपूर येत असतो ,कुठलाही प्रॉब्लेम नसतो ,त्यावेळी कळत नकळत कितीतरी वायफळ खर्च करण्याच्या सवयी आपल्याला लागून जातात आणि मग त्या सवयींपासून स्वतःला लांब करणं कठीण होऊन बसतं.
- दर आठवड्यातून एकदा तरी पिक्चरला जायलाच हवं
- एकदा तरी बाहेर हॉटेलमध्ये खायलाच हवं
- महिन्यातून एकदा आउटडोर झालीच पाहिजे
- जवळच्या मित्रांबरोबर पंधरा दिवसात ना एखादी पार्टी झालीच पाहिजे, ह्या कळत-नकळत लागलेल्या वायफळ सवयी आहेत .
ह्या काळात आत्मपरीक्षण करण्याचा खूप चांगला मौका आपल्या सगळ्यांना मिळालेला आहे त्याचा वापर करा आणि ज्या ज्या सवयींवर कायमची काट मारता येईल त्यांच्यावर आत्ताच काट मारून टाका.
८) सुदृढ आर्थिक नियोजन करणे
उन्हाळ्यात मुंगी गरजेपेक्षा जास्त साखर जमून ठेवते कारण तिला नक्की माहिती असतं की पावसाळा येणारच आहे.
दिवसानंतर रात्र येतेच , चांगल्या काळानंतर वाईट काळ येतोच.
हे सगळं आपल्याला माहीत जरी असलं तरी आपल्या वागणुकीतून ते जाणवत नाही .
गेल्या आठ महिन्यात तेच लोक तरून निघाले किंवा त्यांचाच निभाव लागला आहे , ज्यांनी सुरुवातीपासूनच स्वतःला योग्य आर्थिक गुंतवणुकीची सवय लावली आहे.
मला असे कितीतरी लॉटरी विनर ,जॅकपोट विनर माहिती आहेत जे लॉटरी लागल्यावर सहा महिन्यापेक्षा कमी काळात अतिशय दरिद्री अवस्थेत येऊन पोहोचले आहेत.
असे कितीतरी कलाकार, खेळाडू माहिती आहेत , ज्यांनी प्रचंड पैसा कमावला पण आर्थिक नियोजन न केल्यामुळे पुढे जाऊन फार वाईट परिस्थिती त्यांच्यावर येऊन ठेपली आहे.
एका जगद्विख्यात लेखकाने सांगितलेली आर्थिक नियोजनाची खूप महत्त्वाची टीप मी तुम्हाला देतो आहे.
तुमच्याकडे आलेल्या प्रत्येक शंभर रुपयाचे नियोजन पुढील प्रमाणे करण्याचा प्रयत्न करा ( टॅक्स नंतर )
- दहा टक्के स्वतःच्या शिक्षणावर ( Self -Education)
- दहा टक्के रिटायरमेंटसाठी ( Retirment fund )
- दहा टक्के भविष्यात उत्पन्न होणाऱ्या महत्त्वाच्या ध्येयांसाठी , मुलांचे शिक्षण, मुलांचं लग्न, मोठं घर आणि बरच काही ( Long Term Golas )
- दहा टक्के धमाल करण्यासाठी ( Enjoyment )
- तीन ते सात टक्के दान देण्यासाठी (Charity)
- उरलेले पैसे घर आणि बिझनेस चालवण्यासाठी ( Operational Expenses )
पैसा हातात आल्याआल्या जर अशा प्रकारचे नियोजन सुरू केल्याने त्याचे भन्नाट परिणाम जगातल्या करोडो लोकांनी अनुभवले आहेत आणि फार लवकर त्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळालेलं आहे.
कदाचित ह्या आधी आपण अशा प्रकारे पैसा वाचवण्याचा आणि वापरण्याचा विचार केला नसेल पण सध्या ते करणं अपरिहार्य झालेलं आहे.
९) सातत्याने प्लॅन बी (Plan B ) साठी तयार रहा
दरवेळी वाईट परिस्थिती आली की आपण स्वतःला एक प्रॉमिस देतो, पुन्हा ह्या चुका करणार नाही.
- मग आजारी पडलो तर तब्येतीबाबत
- नाते संबंध खराब झाले तर आपल्या जवळच्या व्यक्तीबरोबर नीट वागण्याबाबत
- आणि जर आर्थिक परिस्थिती बिघडली तर भविष्यात आर्थिक चुका न करण्याबाबत
पण काही काळाने सगळं व्यवस्थित होतं आणि आपण स्वतःलाच दिलेलं प्रॉमिस अगदी सराईतरित्या विसरून जातो
बऱ्याच वेळेला आपल्या व्यवसायातदेखील असंच होतं.
ज्यांचे उद्योग फार चांगले चाललेले आहेत त्यांना नेहमी असं वाटत राहतं की ही परिस्थिती कधीच बदलणार नाही.
मध्ये-मध्ये छोटे-मोठे काही झटके ,धक्के त्यांना लागतात पण त्यातून सावरताना स्वतःला त्यांनी जी वचनं दिलेली असतात , की मी भविष्यात काहीतरी वेगळं, काहीतरी चांगलं तयार करीन, ते परिस्थिती नॉर्मल झाल्यानंतर लगेच विसरून जातात.
तुम्हाला वेगळा व्यवसाय करण्याची गरज नाही पण तुमचा व्यवसाय वेगळेपणाने करण्याची गरज आहे.
तुम्ही आता जर सगळं ऑफलाइन (offline) करत असाल तर येत्या वर्षभरात माझा जबरदस्त ऑनलाइन (Online)बिजनेस निर्माण करण्यासाठी मला काय करायला लागेल हा प्रश्न सातत्याने स्वतःला विचारा.
तुमच्या व्यवसायात जर तुम्ही टॉप-10 टक्क्यांमध्ये नसाल तर तिकडे पोहोचण्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल हा प्रश्न सातत्याने स्वतःला विचारा.
अशा कोणत्या सवयी आहेत अशी कोणती कौशल्ये आहेत जी जर तुम्ही स्वतःमध्ये निर्माण केलीत तर तुमच्या प्रगतीला कोणीच रोखू शकत नाही ती शोधून काढा आणि सातत्याने त्यावर काम करायला सुरुवात करा.
हुशार मुलं परीक्षेच्या दिवशी जास्त अभ्यास करत नाहीत कारण त्यांचा अभ्यास वर्षभर चाललेला असतो आणि जी व्यक्तिमत्व वर्षभर विपरीत परिस्थितीसाठी स्वतःला तयार करत असते तिचं विपरीत परिस्थिती काहीच वाईट करू शकत नाही.
तात्पर्य,भविष्यासाठी स्वतःला तयार करायचं असेल तर आत्तापासून काही लॉंग-टर्म (long-Term Goals) ध्येय ठरवून त्यासाठी स्वतःला तयार करायला सुरुवात करा, खर्चांवर आणि वायफळ गोष्टींवर नियंत्रण ठेवा,योग्य वातावरणात रहा आणि योग्य लोकांकडून शिकायला सुरुवात करा जेणेकरून येती दिवाळी ही आपल्या सगळ्यांसाठीच कोरोना प्रूफ (Corona -Proof ) असेल.
हा लेख पूर्णपणे वाचल्याबद्दल तुमचे मनापासून आभार!
लेख कसा वाटला त्याबद्दल तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा.
तुम्हाला देखील भविष्यासाठी कोरोना प्रूफ (Corona -Proof ) व्हायचं असेल तर माझा मिशन ऑनलाइन स्वराज्य हा ग्रुप नक्की जॉईन करा
ऑनलाईन स्वराज्य हा आपल्या सगळ्यांचा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि आपण तो मिळवणारच!












खूपच छान ब्लॉग आहे सर
उत्तर द्याहटवाखूप चॅन मार्गदर्शन केले आहे सर . खास करून आर्थिक नियोजनावर छान सल्ला दिला आहे. 👏👏
उत्तर द्याहटवाGood Information,
उत्तर द्याहटवाअप्रतिम ब्लॉग...जबरदस्त सर..
उत्तर द्याहटवाLife changing...and Motivation blog...
उत्तर द्याहटवाKhup mast
उत्तर द्याहटवाSuperb
उत्तर द्याहटवाखुप छान माहिती दिली सर
उत्तर द्याहटवाखुप छान
उत्तर द्याहटवाVery vety realistic and powerful
उत्तर द्याहटवाखूप छान उपयुक्त माहीती
उत्तर द्याहटवाधन्यवाद सर🙏🙏
Far far chan blog sir
उत्तर द्याहटवाKiti chan explain kartat sagle. मुद्धे.
Great sir.����
Fantastic and Powerful. सगळा जीवनप्रवास, जीवनाचे सार सांगीतलेत. धन्यवाद केतन सर
उत्तर द्याहटवाKhup chan🙏🙏
उत्तर द्याहटवाखूप छान लेख आहे सर
उत्तर द्याहटवाKhup powerful blog sir
उत्तर द्याहटवाTumchya mule online Swarajchyai gurukilli milali
You are great sir 🙏🏻
Khoop chan तुमच्या या मार्गदर्शना मुळे आमच्या आयुष्यात बदल झाले आहे.. खुप खुप धन्यवाद सर 🙏🙏💐
उत्तर द्याहटवाखुपच छान सर्व टिप्स आहेत सर
उत्तर द्याहटवाखुप सुन्दर blog लिहले आहे
कोरोनोच्या या विपरीत परिस्थीत ओनलाईन स्वराज्य मधे आल्या पासुन खुप self development होत आहे
आणि खर्या अर्थाने आवडीचे निवडीचे व पैशाचे स्वतंत्र मिळत आहे.
Thak you so much sir
अप्रतिम ब्लॉग
उत्तर द्याहटवाखूपच छान, Great सर
उत्तर द्याहटवाVery Useful, informative & business oriented BLOG- AWESOME
उत्तर द्याहटवाखूपच छान मार्गदर्शन आणि मार्मिक लेखन सुद्धा अगदी मुद्देसूद मांडणी....��������
उत्तर द्याहटवाआत्तापर्यंत तुमच्याकडून शिकलेल्या चि उजळणी झाली. We अरे indebted to you for the learnings you gave us so far and I am sure our whole group will grow to a height under your able guidance.
उत्तर द्याहटवाJabardast
उत्तर द्याहटवाSir nehmi tumche shabdh prerna dayi astat
उत्तर द्याहटवाVery informative and powerful tips...👍👌
उत्तर द्याहटवाGood guidance
उत्तर द्याहटवा