तुमच्याबरोबर पण असं होतंय का?
प्रत्येक पाच मिनिटाला व्हाट्सअप किंवा फेसबुक चेक करण्याची इच्छा तुमच्या मनात उत्पन्न होते का?
असं होत असेल तर हा Blog तुमच्यासाठीच आहे.
संकष्टीचा उपवास, एकादशीचा उपवास, नवरात्रीचा उपवास ह्याने आपण शरीराला शुद्ध करण्याचा प्रयत्न करतो,पण आज वैचारिक शुद्धीसाठी आपल्याला डिजिटल डिटॉक्स (Digital Detox) फार जास्त महत्त्वाचं झालेले आहे.
असं होत असेल तर हा Blog तुमच्यासाठीच आहे.
संकष्टीचा उपवास, एकादशीचा उपवास, नवरात्रीचा उपवास ह्याने आपण शरीराला शुद्ध करण्याचा प्रयत्न करतो,पण आज वैचारिक शुद्धीसाठी आपल्याला डिजिटल डिटॉक्स (Digital Detox) फार जास्त महत्त्वाचं झालेले आहे.
जाणीवपूर्वक सोशल मीडिया आणि मोबाईल पासून स्वतःला दूर ठेवणं हेच आपल्या कार्यक्षमतेला आणि एकाग्रतेला वाढवण्याचे सगळ्यात सोप्पं साधन आहे आणि तेच करण्याच्या दहा टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे.
नमस्कार माझं नाव केतन गावंड, ऑनलाइन स्वराज्यसारथी आणि येत्या तीन वर्षात एक लाख ऑनलाईन स्वराज्य निर्माण करणे हा माझा ध्यास आहे .
चला मग सुरुवात करूया.
सोशल मीडियाच्या सुरुवातीला सगळ्यांना असं वाटलं की हे लोकांना एकमेकांच्या जवळ आणणार आहे पण सत्य हे आहे की आज लोक सगळ्यात जास्त एकाकी फिल करत आहेत.
सतर्क राहून जाणीवपूर्वक आपण सोशल मिडीयाचा वापर करायला शिकलो नाही तर फायद्यापेक्षा दुष्परिणामच जास्त होण्याची संभावना जास्त आहे.
अग्नीचा वापर योग्य प्रमाणात केला तर त्याचे कित्येक फायदे होऊ शकतात पण जर ती आवाक्याच्या बाहेर गेली तर सगळच भस्मसात होऊ शकतं.
सोशल मीडियावर कंट्रोल मिळवण्याच्या ह्या पुढील टिप्स नक्कीच प्रभावी ठरू शकतील.
1) शक्य तेवढी ॲप मोबाईल मधून डिलीट करून टाका
बराच वेळा कळत-नकळत आपण एवढी App डाऊनलोड करून ठेवतो की फोनची मेमरी त्यांनीच फुल होऊन जाते.
त्या क्षणाला आपल्याला ती फार महत्त्वाची वाटतात पण पुढे जाऊन कदाचित आपण त्याचा वापरच करत नाही.
मग हा प्रश्न स्वतःला विचारा, गेल्या सहा महिन्यापासून अशी कोणती ॲप आहे जी तुम्ही वापरलीच नाहीत पण तरी देखील तुमच्या मोबाईल मध्ये ते घर करून आहेत.
जेवढी मोकळी जागा तुमच्या मोबाईल मध्ये असेल तेवढीच मोकळी जागा तुमच्या विचारांमध्ये देखील असेल हे कधीच विसरू नका.
तुमच्यापैकी किती जणांना हे पटण्यासारखं नाही तरीही मी तुम्हाला ही दुसरी टीप देतो
2) सगळ्या ॲप ची नोटिफिकेशन बंद करून टाका
मी साधारणतः साडे चारशे ते पाचशे व्हाट्सअप ग्रुप मध्ये आहे. प्रत्येक दुसऱ्या मिनिटाला फेसबुक मला कोणतं कोणतं नोटिफिकेशन पाठवतं .
काही वर्षांपूर्वी प्रत्येक लाईकला, प्रत्येक कमेंटला , प्रत्येक मेसेजला माझी प्रतिक्रिया गेली पाहिजे असा माझा विश्वास होता पण जसं माझा जनसंपर्क वाढत गेला माझ्या लक्षात आलं हे अशक्य आहे आणि मग मी सगळ्यांची सगळी नोटिफिकेशन बंद करून टाकली.
सुरुवातीला तुम्हाला हे थोडंसं जड जाईल कारण आपण सवयीचे गुलाम आहोत, पण विश्वास ठेवा एकदा तुम्हाला याची सवय झाली की तुमच्या विचारातला 90% कोलाहल फक्त ह्या एका गोष्टीमुळे नाहीसा होईल.
एखादं काम करताना 100% एकाग्र होण्याची आवश्यकता असते आणि एक नोटिफिकेशन तुमच्या एकाग्रतेचा भंग करू शकतो ही नोटिफिकेशनची टीप नक्की वापरून बघा.
There is no emergency in life.
अगदी त्याच क्षणाला जर तुम्ही एखाद्या मेसेजला किंवा फोनला प्रतिक्रिया दिली नाही तर जगबुडी येणार नाही हा विश्वास तुमच्या मनात हवा.
खूप लोकांना हे अशक्य वाटतं पण मी तुम्हाला माझ्या अनुभवातून सांगतो गेले दहा वर्ष माझा मोबाईल सायलेंटवर आहे, हो दहा वर्ष.
फक्त माझ्या मुलांचा, वडिलांचा ,बायकोचा आणि माझ्या तीन सगळ्यात महत्त्वाच्या क्लाईन्टचा ( ज्यांच्याकडून मला90% बिझनेस मिळतो ) त्यांचाच रिंगटोन ठेवलेला आहे.
फक्त माझ्या मुलांचा, वडिलांचा ,बायकोचा आणि माझ्या तीन सगळ्यात महत्त्वाच्या क्लाईन्टचा ( ज्यांच्याकडून मला90% बिझनेस मिळतो ) त्यांचाच रिंगटोन ठेवलेला आहे.
बरेच जण या महत्त्वाच्या व्यक्तींसाठी एक छोटासा चपटा फोन ठेवतात त्याचा नंबर फक्त या महत्त्वाच्या व्यक्तींकडेच असतो.
तुम्हाला कल्पना नाही की ही गोष्ट तुम्हाला किती मोठं स्वातंत्र्य मिळवून देईल.
एक आठवडा करून बघा आणि मग मला तुमचा अनुभव सांगा.
4) झोपताना मोबाईल फोन जवळ ठेवू नका
ह्याची दोन महत्त्वाचे कारण आहेत
पहिलं तर त्या फोन मधला निघणारी रेडिएशन्स आणि दुसरे म्हणजे तुम्हाला हवी असलेली शांतता.
बरेच जण म्हणतील की आमचा अलार्म आमच्या फोनमध्ये असतो, कृपा करून एखादं दोनशे रुपयांचा जुन्या पद्धतीचा अलार्म आणून तो वापरायला सुरुवात करा.
मी गेल्या चार वर्षापासून ऑटोमॅटिक मोबाईल ऑफ आणी मोबाईल ऑनची सिस्टीम वापरतो. बरोबर ठरलेल्या वेळी मोबाईल बंद होतो आणि ठरलेल्या वेळेत तो चालू होतो.
खरच, माझ्या झोपेमध्ये आणि Quality of sleep मध्ये ह्या एका सवयीने आमूलाग्र फरक पडलेला आहे.
५) तुमचा स्क्रीन टाइम मॉनिटर करा
तुम्हाला कल्पना नाही की ही गोष्ट तुम्हाला किती मोठं स्वातंत्र्य मिळवून देईल.
एक आठवडा करून बघा आणि मग मला तुमचा अनुभव सांगा.
4) झोपताना मोबाईल फोन जवळ ठेवू नका
ह्याची दोन महत्त्वाचे कारण आहेत
पहिलं तर त्या फोन मधला निघणारी रेडिएशन्स आणि दुसरे म्हणजे तुम्हाला हवी असलेली शांतता.
बरेच जण म्हणतील की आमचा अलार्म आमच्या फोनमध्ये असतो, कृपा करून एखादं दोनशे रुपयांचा जुन्या पद्धतीचा अलार्म आणून तो वापरायला सुरुवात करा.
मी गेल्या चार वर्षापासून ऑटोमॅटिक मोबाईल ऑफ आणी मोबाईल ऑनची सिस्टीम वापरतो. बरोबर ठरलेल्या वेळी मोबाईल बंद होतो आणि ठरलेल्या वेळेत तो चालू होतो.
खरच, माझ्या झोपेमध्ये आणि Quality of sleep मध्ये ह्या एका सवयीने आमूलाग्र फरक पडलेला आहे.
५) तुमचा स्क्रीन टाइम मॉनिटर करा
हल्ली प्रत्येक मोबाईल मध्ये स्क्रीन टाईम मॉनिटरिंग उपलब्ध आहे
आठवड्याभरात तुम्ही कोणत्या ॲपवर किती वेळ घालवता ह्याची जाणीव तुम्हाला तुमचा मोबाईल करून देतो.
बरेच जण हा डेटा बघितल्यावर थक्क होतात. व्हाट्सअप आणि फेसबुकसारखे App आपला किती वेळ आठवड्याभरात खातात याची कल्पना देखील तुम्हाला सध्या नसेल .
एकदा हा डेटा तुमच्या हातात आला कि कोणता वेळ कमी करायचा हे तुम्ही ठरवू शकता.
६) फेसबूक न्यूज फीड वर जाणे टाळा
तुमच्या आत्तापर्यंतच्या आवडीनिवडींनुसार फेसबूक ऑटोमॅटिकली तुमच्यासाठी बराचसा कॉन्टॅक्ट आणून देतो.
एक मेसेज बघितला की कळत नकळत आपण अर्धा तास, एक तास, दीड तास त्या न्यूजच्या मागे घालवतो.
सगळ्यात महत्त्वाचा सल्ला म्हणजे तुम्हाला जिथे जायचे तिथे फेसबुक उघडण्याआधीच ठरवून ठेवा . फेसबूक तुम्हाला न्हेण्याचा प्रयत्न करतोय तिकडे वाहत जाऊ नका.
हे खूप भयानक व्यसन आहे आणि खूप महत्त्वाचा क्वालिटी टाइम (Quality Time ) तुमच्याकडून हिरावून घेत आहे.
अधूनमधून न्युजफीड मधले तुम्हाला नको वाटणारे किंवा सतत नकारात्मक माहिती देणारे व्हिडिओ तुम्हाला दिसत असतील तर त्यांना अनफॉलो ( Unfollow) करा किंवा म्युट (Mute) करून ठेवा काही दिवसांनी तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला जे हवय तेच व्हिडिओ तोच कन्टेन्ट (Content) जास्तीत जास्त फेसबुक तुम्हाला दाखवत आहे.
७) जेवताना शक्यतो सोशल मीडिया टाळा
बऱ्याच वेळेला घरातली सगळी माणसं एकत्र जेवायला बसलेली असतात पण प्रत्येकाचे लक्ष हे आपल्या मोबाईल मध्येच असते.
आपण सगळे शरीराने एकत्र असतो पण मनाने प्रत्येकजण आपल्याला जे पाहिजे त्यातच गुंतलेले असतो.
यामुळे संवाद तर साधला जात नाहीच पण जेवणातही लक्ष नसल्यामुळे पचनाचे विविध आजार होतात. शक्य असेल तर हा नियमच करून टाका की जेवताना मोबाईल टीव्ही आणि सोशल मीडिया डिनर टेबल वर अलाऊड नाही .
८) नको त्या ग्रुप मधून एक्झिट घ्या
बऱ्याच रिक्वेस्ट, बरेच ग्रुप यामध्ये कळत-नकळत आपण शिरतो आणि मग काही वेळानंतर आपल्या लक्षात येतं की इकडं ठोस असं काहीच मिळत नाहीये आणि वेळ मात्र वाया चाललाय .
काही राजकीय भक्त त्यांचा ऑटोमॅटिक अजेन्डा चालवण्यात एवढे गर्क असतात कि इतरांचा विचार करण्यास त्यांच्याकडे अजिबात वेळ नसतो.
आठवड्यातून, पंधरा दिवसातून एकदा तरी शांतपणे विचार करा की कोणत्या कोणत्या ग्रुप मध्ये तुम्ही बाहेर पडलात तर फार मोठा फरक पडणार नाही.
मी एकच गोष्ट स्वतःला विचारतो , माझ्या ध्येयापर्यंत पोहोचायला जे जे ग्रुप मला मदत करतात मी त्या सगळ्या ठिकाणी राहतो बाकी सगळ्या ठिकाणाहून एक्झिट होतो.
९) समविचारी मित्र शोधा आणि एकमेकांना मदत करा
सुदैवाने सोशल मीडियाचं वाढतं थैमान हा फक्त तुमच्या एकट्याचाच प्रॉब्लेम नाहीये ,तुमच्या आजूबाजूचे बरेच मित्र असे आहेत त्यांना देखील ह्या आपल्या सवयीवर नियंत्रण आणायचे आहे.
मग तुमच्या चांगल्या मित्राला ह्याबद्दल सांगा आणि दिवसात ना एकदा तरी आपण ट्रॅक वर आहोत की नाही हे एकमेकांना सांगायला सुरुवात करा.
मानवी मनाची ही जादू आहे की आपण स्वतः ठरवलेल्या गोष्टींसाठी फार जास्त सिरियस नसतो पण जर आपल्याला दुसऱ्या कोणाला त्याबद्दल सांगायचं असेल तर आपण ती गोष्ट फार सिरिअसली करतो.
ही गोष्ट फक्त सोशल मीडियासाठी महत्वाचे नाही तर व्यायाम करण्यासाठी ,पुस्तक वाचण्यासाठी आणि एकंदरीतच चांगल्या सवयी लावण्यासाठी खूप महत्त्वाची आहे.
चला तर मग कमेंटमध्ये तुमच्या अकाउंटेबिलिटी पार्टनरचं नाव कमेंट करा.
मी तुमच्यासाठी जबाबदार तुम्ही माझ्यासाठी जबाबदार.
१०) झोपण्याआधी कमीत कमी एक तास मोबाईल हाताळणे टाळा
१०) झोपण्याआधी कमीत कमी एक तास मोबाईल हाताळणे टाळा
आधी आपण म्हणायचं कराग्रे वसते लक्ष्मी.
हल्ली लोक दिवसाचा शेवटचा मेसेज हा व्हाट्सअपवरचा बघून झोपतात आणि सकाळी उठल्यावर कराग्रे वसते व्हाट्सअप पहिला मेसेज देखील व्हाट्सअप वरच बघतात.
दुर्दैवाने मोबाईलमधून बाहेर पडणाऱ्या या रेडिएशन आपल्या स्लीपिंग पॅटर्नवर फारच विपरीत परिणाम करत आहेत.
हल्ली बरेच मोबाईल डिव्हाइसेस नाईट मोड ऑटोमॅटिक संध्याकाळी सूर्यास्तानंतर सुरुवात करतात. याचं कारण म्हणजे सात नंतर ही व्हाईट रेडिएशन जर तुमच्या डोळ्यांमध्ये गेले नाही तर तुम्हाला झोप चांगली येण्याची शक्यता असते.
पण कितीही झालं तरी दगडापेक्षा वीट मऊ नाईट मोडची रेडिएशन्स देखील आपला स्लीप पॅटर्न डिस्टर्ब करतात.
म्हणून जाणीवपूर्वक नियम करा की जेवल्यानंतर मोबाईल ला हात लावायचा नाही.
आठवड्याभरात तुम्हाला तुमची झोप सुधारून आणि एक वेगळी आंतरिक शांतता आयुष्यात आल्याची जाणीव झाल्याशिवाय राहणार नाही.
तात्पर्य : आपण सोशल मीडियाचे गुलाम व्हायचं की आपण आपल्या प्रगतीसाठी त्याचा वापर करायचा ते ठरवा आणी ह्या टिप्स चा वापर करून कंट्रोल तुमच्या हातात घ्यायला सुरुवात करा.
ब्लॉग शेवटपर्यंत वाचल्याबद्दल धन्यवाद!तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा.
तुमचे प्रश्न असतील तर ते मला माझ्या फेसबुक ग्रुपमध्ये येऊन तुम्ही नक्की विचारू शकता.
तुम्हाला जर सकारात्मक उद्योजकांची एक जबरदस्त कम्युनिटी जॉईन करायची असेल तर माझा ऑनलाईन स्वराज्य हा ग्रुप नक्की जॉईन करा.
ऑनलाईन स्वराज्य हा आपल्या सगळ्यांचा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि आपण तो मिळवणारच!













खूपच छान
उत्तर द्याहटवाThanks UC
हटवाखूप छान!
हटवाखूपच छान सांगितलत सर
उत्तर द्याहटवाखुपच छान blog लिहलाय सर
उत्तर द्याहटवाअतिशय उपयुक्त...
अगदी खरे social media च योग्य आणि आवश्यक तेवढा वापर केल्यास कार्यक्षमता खुप वाढते..
आणि आरोग्य ही जपले जाते
Thank you for nice information 💐
Thank you for the feedback 👍
हटवाखूप महत्त्वाचा विषय निवडला आहे... आणि खूप उपयुक्त टिप्स दिल्या आहेत.... या माहितीचा नक्कीच सगळ्यांना उपयोग होईल....Thank you sir 🙏
उत्तर द्याहटवाThank u Amruta
हटवाखूप छान संदेश आहे.
उत्तर द्याहटवाकाय बोलू, खरंच आहे हे. कळत नकळत आपण करतोय. Powerful.
उत्तर द्याहटवाHmm
हटवाखूप उपयुक्त लेख आहे thank you
उत्तर द्याहटवा🙏🙏
हटवाखूप छान टिप्स सर. जनजागृतीसाठी अतिशय गरजेचा विषय.
उत्तर द्याहटवाअतिशय उपयुक्त सल्ला दिलात आपण सर
उत्तर द्याहटवाधन्यवाद.
मस्त ब्लॉग लिहिलात सर, उपयुक्त माहिती शेअर केलीत, धन्यवाद
उत्तर द्याहटवाThank you sir
हटवाThanks for valuable information
उत्तर द्याहटवाडोळे उघडणारा विषय... अत्यंत सोप्या भाषेत समजावून सांगितला सर आपण.. यातून नक्कीच बोध घेवून आयुष्य सुंदर करण्याचा प्रयत्न करणार 🙏🙏🙏🙏
उत्तर द्याहटवाYess
हटवाSir kharch ya gostinchi savay lavnyachi khup lokana garaj ahe mi pan ahe ya mdhe
उत्तर द्याहटवाKalate pan valat nahi....ase zale...tari ya tips strictly follow kelya gelyach pahije..,Nice imfo
उत्तर द्याहटवासर खूप उपयुक्त माहिती. महत्त्वाचे पॉईंट आणि त्यावर सोल्युशन देखील धन्यवाद.
उत्तर द्याहटवाखूप छान ब्लॉग लिहिला आहे, बहुतेक आताच्या युगात हाच प्रश्न निर्माण झाला आहे.
उत्तर द्याहटवासर,अतिशय सुंदर लेख! आभारी आहे!!
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर आणि खरच अत्यंत आवश्यक टिप्स आहेत या सर. आजच्या या स्पर्धेच्या आणि इर्षे च्या जगात आपले मानसिक स्वास्थ्य बिघडवणारया अनेक गोष्टी आपल्या सभोवताली असुन मोबाईल ही ही त्यातीलच एक आहे पण त्याचा नियंत्रीत वापर आपल्या साठी लाभदायक आहे हे आपण पटवून दिले आहे या ब्लॉग द्वारे...धन्यवाद!!
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर लेख आहे सर.
हटवाधन्यवाद
हटवाखूपच छान माहिती ज्यामुळे mind detox व्हायला मदत होईल
उत्तर द्याहटवाKhup chan maahiti. Hya mule kharach mind detox honya sathi madat hoil 👍👍
उत्तर द्याहटवाखूप उपयुक्त माहिती सर दिली 👍👏🙏🙏
उत्तर द्याहटवाखूप आवश्यक टीप सांगितल्या आहे.
उत्तर द्याहटवाखूप सुंदर आणि व्यवस्थितपणे समजावून सांगितले आहे.
उत्तर द्याहटवाडिजिटल डेटॉक्स हि आजच्या युगातील नितांत गरज झाली आहे..
खूप धन्यवाद ! !
जबरदस्त! खूप चांगल्या व व्यावहारिक टिप्स आहेत. Gratitude 💐 👌👍👍💐
उत्तर द्याहटवाVery nice Sir
उत्तर द्याहटवाखूपच उपयुक्त माहिती दिली आहे आणि आता अगदी काळाची गरज झाली आहे, त्यातुन बाहेर कसे पडावे, जाणीवपूर्वक.
उत्तर द्याहटवाIdeal blog..sequence Subject,introduction,Preface,problem ,why ,effects,strategy to overcome,&call for action with conclusion..मस्त झालाय..कन्टेनट सगळ्यांच्याच जाग आणणारा..u r our conscience keeper,Sir!
उत्तर द्याहटवामस्त critical analysis.
हटवाThx
So true..
उत्तर द्याहटवाUse mobile for good
Dont overuse..
Nice example
शाळेत आपण सायन्स शाप की वरदान असा निबंध .
उत्तर द्याहटवाआता सोशल मीडिया बाबत असेच आहे.
सारासार विचार करून वेळ देने महत्वाचे.
करमणुकीसाठी इतर बरीच साधने व उपाय आहेत, त्याचा वापर करावयास हवा.
अतिशय योग्य आणि उपयुक्त माहिती sir Thank you
उत्तर द्याहटवाखूप सुंदर अतिशय महत्वपूर्ण ब्लॉग सर
उत्तर द्याहटवाग्रेट इन्फॉर्मेशन...
धन्यवाद सर🙏🙏🙏
वास्तव आहे. खूप चांगल्या पद्धतीने मुद्दे विशद केलेत.सर आपले मानावे तितके आभार कमीच आहेत. धन्यवाद सर!
उत्तर द्याहटवाNice.Thank You sir
उत्तर द्याहटवाछान blog आहे. तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा !!
उत्तर द्याहटवाखूप छान लेख sir. We are loosing lot of time in social media. As you correctly said we should learn to use it for our benefit and not for wasting time. Thank you sir for nice tips.
उत्तर द्याहटवाही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवाYes very nice
उत्तर द्याहटवा