पहिल्या ब्लॉग मध्ये आपण ७ जबरदस्त आयडिया बघितल्या , मला माहीत आहे तुमच्या डोक्यातली चक्र फिरायला लागली असतील आणि २०२१ ची तयारी सुरु झाली असेल
आता पुढच्या 6 टिप्स आपण बघणार आहोत
पोषक व पौष्टिक खाण्यावर भर द्या
प्रत्येकाच्या संकल्प यादी ही एक गोष्ट आवर्जून असते आणि मी देखील त्यात तुमच्या बरोबर आहे.
माझ्या गुरुजींनी कित्येक वर्षांपूर्वी मला सांगितलेला एक साधा नियम, जे जिभेला रुचकर वाटतं ते पोटाला आवडत नाही आणि जे पोटाला आवडतं ते जिभेला रुचत नाही.
मग यात सुवर्णमध्य कसा साधायचा?
गेल्या कित्येक वर्षात माझा सकस आणि पोषक आहार बऱ्यापैकी वाढला आहे पण अजून पण बराच लांबचा टप्पा गाठायचा आहे.
मुलांच्या आणि मित्रांच्या नादाने काही न काही खाल्लं जातच, पण 2021 मध्ये नक्कीच जास्त सतर्कतेने जिभेचे चोचले कमी पुरवत पौष्टिक खाण्याकडे भर द्यायचा आहे.
याबाबतीत माझ्या लक्षात आलेल्या आणि मला उपयोगी पडलेल्या काही टिप्स
- अचानक एखादा पदार्थ पूर्णपणे वर्ज्य करू नका, हळूहळू कमी करा.
अचानक एखादी प्रतिज्ञा केलीत तर तुमचं अंतर्मन बंड करून उठेल आणि पहिल्यापेक्षा जास्त तुम्ही त्या वस्तूकडे आकर्षित व्हाल. जसं चहा सोडणं , दहा दिवस आपण मनावर दगड ठेवतो आणि ११व्या दिवशी १० दिवसाचा चहा पिऊन टाकतो . जाऊ तिकडे लोक चहाच ऑफर करतात , बरोबर ना ?
- जेवणात योग्य प्रमाणात विटामिन्स आणि मिनरल्स आहेत की नाहीत याची खबरदारी घ्या.
मी कुठेतरी वाचलेलं 1960 मध्ये एका संत्र्यामध्ये आपल्याला जेवढं विटामिन सी मिळायचं तेवढं विटामिन सी मिळण्यासाठी आज आपल्याला बारा संत्री खाण्याची गरज आहे.
जमिनीचा कस, पेस्टिसाइड्सचा आणि खतांचा अतिरिक्त वापर आणि वातावरणातील बदल या सगळ्याचा हा परिणाम आहे . म्हणूनच आपल्याला जाणीवपूर्वक ह्या जीवनसत्वांचा समावेश आपल्या जेवणात करण्याची खूप गरज आहे.
काही गोष्टी शरीरावर काही क्षण परिणाम करतात , काही ,काही दिवसांसाठी आणि काही जन्मभरासाठी . ह्या कोणत्या गोष्टी आहेत ते समजून घ्या व आपल्या आहारात या प्रकारचे संतुलन आणण्याचा प्रयत्न करा.
व्यायामाचं शेड्युल बनवा
आज तुम्ही जास्त फिट आहात की पाच वर्षांपूर्वी जास्त फिट होता?
नक्कीच पाच वर्षापूर्वी तुम्ही जास्त फिट होता?
जर असंच चालत राहिलं तर आणखी पाच वर्षांनी तुमच्या फिटनेसची लेव्हल कशी असेल?
मला वाटते तुम्हाला तुमचे उत्तर मिळाले असेल .
तुम्ही जर शरीरासाठी काहीतरी जाणीवपूर्वक करत असाल तर ते कंटिन्यू करा किंवा २०२१ मध्ये नवीन फिटनेस रेजिम अवलंबायला सुरुवात करा.
काही दिवसांपूर्वी मी डॉक्टर श्रीधर अर्चिक अस्थिरोग तज्ञ, यांचा इंटरव्यू पाहिला. त्यांनी सांगितलं की आपल्या शरीरातील कित्येक स्नायू हे साठ वर्षानंतर अचानक गायब होतात किंवा निकामी होतात कारण त्यांचा योग्य वापरच केलाच जात नाही.
मग स्वतःला प्रश्न विचारा की तुम्ही असं काय कराल त्याच्यामुळे तुमच्या शरीरातल्या दिसणाऱ्या आणि न दिसणाऱ्या प्रत्येक स्नायूला तुम्ही काम द्याल कारण कामाशिवाय माकडाच्या शेपटासारखे हे स्नायू गायब व्हायला लागतील.
व्यायाम आणि चालना मिळाली की शरीरातील प्रत्येक स्नायू आणि जिवंत राहतो.
- सूर्यनमस्कार
- वक्रासन
- अर्धमच्छेंद्रासन
अशी कितीतरी उत्तम योगासने भारतीयांना माहिती आहेत ज्याच्यामुळे आपण शरीरातील सर्व स्नायूंना बळकटी देऊन ऍक्टिव्ह ठेवू शकतो.
पुढील कित्येक दशके आपल्याला याच शरीरात राहायचं आहे आणि त्यासाठी त्याचा मेंटेनन्स टॅक्स आणि मेन्टेनन्स टाईम देणे गरजेचे आहे.
माझं सगळ्यात आवडतं फिटनेस रुटीन म्हणजे सकाळचा ब्रिस्क वॉक ,त्याचबरोबर कानात हेडफोन आणि ऐकायला एखादं सुंदर प्रेरणादायी ऑडिओ बुक.
याच्या मदतीने शरीराला आणि मनाला नखशिखांत चार्ज करणं ... 2021 मध्ये नक्की करून बघा.
घर नीट नेटकं ठेवा
कल्पना करा तुमच्या कपाटात किंवा वॉर्डरोबमध्ये खूप जास्त कपडे दाबून भरले आहेत , आणि मॉलमध्ये तुम्हाला एखादा ड्रेस किंवा शर्ट आवडला, तुम्ही तो देऊ शकाल का?
तुमचे आंतर्मन म्हणेल, आधीच एवढे जास्त कपडे आहेत याला कुठे ठेवणार ? (अंतर्मन नाही म्हणालं तर नवरा किंवा बायको नक्की म्हणेल 😃 )
कळत नकळत आपल्या घरात आपण अशा कित्येक अनावश्यक गोष्टी कोंबून ठेवतो ज्याच्यामुळे नवीन चांगल्या आणि उपयोगाच्या गोष्टी आपल्या घरात आणि आयुष्यात येत नाहीत.
हे जितकं घराबद्दल आणि कपटाबद्दल लागू पडतं तितकंच ते आपल्या
- मोबाईल
- लॅपटॉप
- पाकीट
- आणि मन यांना देखील लागू पडतं
नववर्षाच्या सुरुवातीला या सगळ्यांना नीट करूया , नको ते बाहेर काढून हवं त्याच्यासाठी जागा करूया , हा २०२१ साठी एक उत्तम संकल्प असू शकेल
भरपूर पाणी प्या
- जगात 70 टक्के पाणी
- आपल्या शरीरात 70 टक्के पाणी
- सगळ साफ करायला आपण वापरतो , पाणी
पाणी एवढं महत्वाचं असेल तर मग आपल्या शरीरातून टॉक्सिंस (TOXINS) बाहेर काढण्यासाठी आपण गरजेपुरतं पाणी पितोय का?
रिसर्च सांगतो की आपल्यापैकी 75 टक्के लोक हे क्रॉनिक डीहायड्रेशनचे (Chronic Dehydration) शिकार आहेत.
माझ्या कित्येक शारीरिक समस्या ह्या केवळ कमी पाणी पाण्यामुळेच आहेत याची आता मला जाणीव झाली आहे आणि भरपूर पाणी पिणे हे 2021 चं माझं एक महत्त्वाचं ध्येय आहे.
आता प्रश्न आहे की किती पाणी प्यायचं?
प्रत्येक वीस किलोला एक लिटर, जर तुम्ही ६० किलो असाल तर ३ लिटर .
आता तुमच्या वजनावरून ठरवा की नक्की किती पाणी प्यायचे ते.
आज-काल बरेचसे अँप तुम्हाला पाणी पिण्याची आठवण करून देतात.
बघा या वर्षी तुमच्या शरीरातील प्रत्येक पेशीला तुम्ही पाण्याच्या दुष्काळापासून वाचू शकता का ते.
रोज डायरी लिहा
महान तत्ववेत्ता सॉक्रेट्स याने लिहून ठेवले एक जबरदस्त वाक्य, An unexamined life is not worth living.
तुम्ही जर तुमच्या अनुभवांचं पृथक्करण करून आयुष्य तुम्हाला काय शिकवण्याचा प्रयत्न करतय हे जर समजून घेत नसाल तर तुम्ही तुमचं आयुष्य फुकट घालवत आहात.
मी कित्येक महान व्यक्तींची आत्मचरित्र अभ्यासली आहेत आणि त्यात सापडलेला एक महत्त्वाचा कॉमन दुवा म्हणजे
त्यांच्याकडे जग बदलण्याची स्वप्न होती आणि ते डायरी लिहित, आत्मपरीक्षण करत होते .
मग डायरीत नक्की काय लिहायचं?
तुमचे अनुभव ,महत्त्वाच्या लर्निंग आणि बरच काही.
रोज रात्री झोपण्याआधी काही सेकंद शांत बसा.
सकाळपासून रात्रीपर्यंत घडलेल्या विविध ठळक घडामोडींवरून मनातल्या मनात नजर फिरवा
आणि मग या दोन प्रश्नांची उत्तरं एका वेगळ्या डायरीमध्ये लिहून ठेवावा
- आज असं काय झालं ज्यामुळे मला सगळ्यात जास्त आनंद मिळाला आणि शिकायला मिळालं?
- आज असं काय झालं जे आज झालं आजनंतर मी होऊ देणार नाही?
हे लिहून ठेवण्यासाठी तुम्ही डायरी एखादं अँप किंवा व्हॉइस रेकॉर्डिंग चा वापर करू शकता.
माझी फेवरेट टेक्निक डायरी लिहून ठेवणे हीच आहे. यात काहीतरी वेगळीच जादू आहे.
हे अनुभव लिहिताना मन शांत होतं, आत्मविश्वास वाढतो आणि प्रेरणा मिळते.
January 2021 चे 31 दिवस हे करून बघायला काहीच हरकत नाही आणि जर अनुभव चांगला आला तर 2021 मध्ये आपण ह्याला कंटिन्यू करू शकता.
रोज ध्यान करा
स्वामी विवेकानंद म्हणतात जेव्हा आपण प्रार्थना करतो तेव्हा आपण देवाशी बोलतो पण जेव्हा आपण ध्यान करतो त्यावेळी आपण देवाचं ऐकतो.
मी 2010 मध्ये माझे गुरुजी मनोज लेखी यांनी SSY (Siddha Samadhi Yoga) मार्फत मला ह्या मेडिटेशनची शिकवण दिली आणि गेल्या दहा वर्षात कदाचित एकही दिवस असा नसेल ज्या दिवशी मी ह्या ध्यानाचा आनंद घेतलेला नाही.
एवढंच नाही तर ही Technique मी दोन लाखापेक्षा जास्त व्यक्तींना शिकवलेली आहे.
एका वाक्यात सांगायचं म्हणजे ध्यान करून आपण स्वतःला वर्तमानात घेऊन येतो. भविष्याची चिंता आणि भूतकाळातल्या चुका यापासून काही क्षण का होईना आपण स्वतःला अलिप्त करतो आणि एक वेगळीच शांतता व आनंद अनुभवतो.
तुम्हाला जर मेडिटेशन शिकायचं असेल आणि त्याला आपल्या दैनंदिन जीवनाचा हिस्सा करायचा असेल तर आमची मिशन ऑनलाइन स्वराज्य ही कम्युनिटी नक्की जॉईन करा.
मेडिटेशनचे इतर फायदे
- कॉन्सन्ट्रेशन वाढतं
- फोकस सुधारतो
- क्रिएटिव्हिटी वाढते
- ज्यांना एन्झाईटी(Anxiety), स्ट्रेस, डिप्रेशन व अनिद्रा सारख्या व्याधी आहेत त्यांना मानसिक शांतता मिळते व त्रास कमी होतो.
आजच्या धकाधकीच्या आणि तणावपूर्ण आयुष्यात ध्यानाला आपल्या आयुष्याचा अविभाज्य अंग करण्याची नितांत गरज आहे.
To be continued ......








दोन्हीं ब्लॉग मध्ये अतिशय सुंदर मार्गदर्शन केलंत सर
उत्तर द्याहटवाThank you so much
Thank you UC
उत्तर द्याहटवाखुप सुंदर व महत्वाच्या गोष्टीनं वर प्रकाश टाकला आहे. खूप खूप धन्यवाद सर
उत्तर द्याहटवाखूप छान मार्गदर्शन सर . आरोग्यदायी अन्न , पाणी , व्यायाम खूप आवश्यक फिट ठेवण्यासाठी . पुन्हा एकदा डायरी लिहिणे संकल्पना आवडली .
उत्तर द्याहटवाखुपच छान सर येणाऱ्या पिढीला खूप मोलाचे मार्गदर्शन होत आहे आणि होणार आहे.आपण करत असलेल्या कामाला खूप खूप शुभेच्छा..🙏🙏💐💐
उत्तर द्याहटवासर खूपच सुरेख मार्गदर्शन केले thank you
उत्तर द्याहटवाखूप सुंदर सर 🙏 💐
उत्तर द्याहटवासर नमस्कार खूप खूप धन्यवाद तुम्ही नेहेमीच चांगले मार्गदर्शन करत. आणि आठवण पण करून देता. काळाच्या ओघात विसरू नये म्हणून आठवण करून देता.May God bless you.
उत्तर द्याहटवाखुप सुंदर ब्लॉग सर
उत्तर द्याहटवासहज साध्या गोष्टी पण किती मह्त्वाचे चांगले बदल घडवून आणतात आयुष्यात ,
या नियमीत follow केल्यास खरच खुप छान बदल जीवनात घडून येतिल.
Thank you so much sir🙏💐
तुमच्या ब्लॉग मधून खूप शिकायला मिळते,सगळ्या गोष्टी अगदी भरभरुंन देता.Great Sir
उत्तर द्याहटवाSir kharach khupach important guide lines dilya ahet tumhi .useful to people of all age groups
उत्तर द्याहटवाVery informative blog sir
उत्तर द्याहटवाEvery point Problem with solution very nice
उत्तर द्याहटवाछान.. फक्त sequence and priorities set नाहीत.
उत्तर द्याहटवामहत्वपूर्ण आणि उत्तम मार्गदर्शन सर
उत्तर द्याहटवाखूप सुंदर ब्लॉग लिहिला आहे सर स्वतःच्या उदाहरणाने आणखी effective झाला आहे
उत्तर द्याहटवाअत्यंत महत्वपूर्ण माहिती.As always powerful.
उत्तर द्याहटवाखूप उपयोगी, अतिशय सुंदर शब्दांमध्ये मांडणी....
उत्तर द्याहटवाखूप खूप धन्यवाद सर....पुढील ब्लॉगची आतुरतेने वाट बघत आहोत....🙏🙏🙏🙏
Wa. Planning for 2021 Dairy maintain Good habit.
उत्तर द्याहटवासंभ्रमीत,विस्कळीत आयुष्याला आकार देण्यासाठी,लिहिलेला हा ब्लॉग आहे.तुम्ही उमलत्या वयात असा,तरुण,प्रौढ,अगदी वृद्ध असा,आयुष्य अर्थपूर्ण जगायचं असेल, तर कधीच उशीर झालेला नसतो.ज्या दिवशी, तुम्ही काही ध्येय ऊराशी घेऊन जगायला लागाल,तो दिवस तुमच्या उर्वरित आयुष्याचा पहिला दिवस असतो.माणसाचं शरीर सुदृढ करण्यासाठी सकस आहार,पुरेसे पाणी,नियमित व्यायाम हा नित्यक्रम असला पाहिजे. स्वतः मध्ये डोकावण्यासाठी मन शांत असलं पाहिजे. त्यासाठी काही मिनिट ध्यान करणं,गरजेचे आहे.अनावश्यक विचार किंवा नको ती अडगळ,स्वच्छ करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.नवा विचार किंवा नवीन कृती यासाठी मनात पुरेशी जागा असली पाहिजे. तसंच घर,आजूबाजूचा परिसर यासाठीच्या स्वच्छतेसाठी जागरुक असले पाहिजे.तुमच्या व्यक्तिमत्त्वावर सभोवतालच्या वातावरणाचा परिणाम होत असतो.तुम्ही तुमच्या दिवसभराच्या घडामोडी,आलेले अनुभव यासंबंधी दैनंदिनी लिहिण्याची सवय लावून घेतली पाहिजे.मन रितं होण्यासाठी,भविष्यात संदर्भ म्हणून आणि गतकाळातील स्मृती जागवण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो.या जगातील ध्येयच्युत लोकांना,ध्येयप्राप्तीचा मार्गावर आणणाऱ्या या ब्लॉग साठी,केतन सरांबद्दल कृतज्ञ राहणं व त्यांचा मार्ग अनुसरणं हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.
उत्तर द्याहटवाअतिशय योग्य मार्गदर्शन केले आहे सर
उत्तर द्याहटवाधन्यवाद
Very good information sir. It reminds us again the points learnt from you. Waiting for next blog
उत्तर द्याहटवासर खुप छान व योग्य मार्गदर्शन केले त्याबद्दल मी आपला आभारी आहे.
उत्तर द्याहटवाखूप छान मार्गदर्शन. सुंदर flow आणि connectivity आहे दोन्ही ब्लॉग्समध्ये . इमेजेस मस्तच
उत्तर द्याहटवाKhupach Chan Sir.
उत्तर द्याहटवा