रविवार, २० डिसेंबर, २०२०

21 आयडिया 2021 साठी , तुम्ही तयार आहात का? Part 1


 2020 चे शेवटचे काही दिवस बाकी आहेत आणि आपण सगळेच मनात एक नवं चैतन्य घेऊन 2021 ची आतुरतेने वाट बघत आहोत.

माझे गुरुजी नेहमी म्हणतात,कोणीही व्यक्ती फेल होण्याचं प्लॅनिंग करत नाही पण प्लॅनिंग करत नाही म्हणून फेल होतात आणि वर्षाच्या शेवटच्या पंधरा दिवसांपेक्षा नववर्षाच्या नियोजनाचा चांगला वेळ असू शकत नाही.

म्हणूनच मी तुमच्यासाठी घेऊन आलोय 2021 मध्ये सुरुवात करायच्या 21 गोष्टी.

नमस्कार , माझं नाव केतन गावंड ,ऑनलाईन स्वराज्य सारथी.

एकाच ब्लॉगमध्ये एवढं सगळं मांडणे जरा जास्तच होईल म्हणून मी या ब्लॉगला तीन भागांमध्ये विभागलेलं आहे.

चला तर मग सुरुवात करूया.

नवीन स्किल शिका


तुम्ही जे करताय तेच करत आलात तर तुम्हाला तेच मिळेल जे आजपर्यंत मिळाले आहे . तुम्हाला जर असं काहीतरी हवं असेल ते आजपर्यंत मिळालेले नाही तर असं काहीतरी करायला शिका जे तुम्ही आजपर्यंत केलेलं नाही.

थोडसं आत्मपरीक्षण करा सध्याच्या बदललेल्या परिस्थितीमध्ये कोणती नवीन स्किल मला शिकणं अनिवार्य झालं आहे.
  • तुमचं कुठे अडतंय?
  • तुमचं स्वप्न पूर्ण करायला कोणते कौशल्य मदत करेल?
  • तुमच्या प्रगतीसाठी कोणत्या कौशल्याची आता नितांत गरज आहे? या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करा.
20 टक्के कौशल्यांवर 80 टक्के प्रगती अवलंबून असते आणि 2021 चा फोकस त्या एका कौशल्यावर अस
ला तर अभूतपूर्व असं 2021 तुम्ही निर्माण करू शकता.

आज-काल ऑनलाईन इन्फॉर्मेशन आणि रिसोर्सेस मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत आणि तुम्ही ठरवलं तर एखाद्या कौशल्यात नक्कीच प्राविण्य मिळवू शकता.

मंथली बजेट बनवा


कित्येक यशस्वी व्यक्ती रसातळाला जाण्याचं कारण म्हणजे दर महिन्याला पैशाचं पूर्वनियोजन न करण्याची सवय.
  • 10% पैसा रिटायरमेंटसाठी
  • 10% मोठी ध्येय पूर्ण करण्यासाठी
  • 10% इमर्जन्सीसाठी
  • 10% सेल्फ डेव्हलपमेंट साठी
  • काही % दान करण्यासाठी
अशाप्रकारे उत्पन्नाचं नियोजन करणं ही 2021 मधील एक उत्तम सवय असू शकेल.
तुमची प्रगती तुम्ही किती कमवता त्यावर कधीच टिकून रहात नाही पण तुम्ही किती पैसा टिकवता त्यावर तुमची प्रगती टिकते.
कित्येकांना लाखो कमावून कर्जबाजारी जगताना आणि कित्येकांना तुंटपुज्या उत्पन्नातून वैभव उभारताना आपण बघितलेले आहे.

एकदा हे नियोजन झाले कि मग उरलेल्या पैशातून तुम्ही तुमची मौजमस्ती, प्राथमिक गरजा व बाकीचे खर्च यांचे नियोजन करू शकता.

ही खरंच आश्चर्याची गोष्ट आहे की एकदा सुरुवातीलाच महत्त्वाच्या गोष्टींसाठी पैसा बाजूला निघाला की उरलेल्या पैशात गोष्टी आपोआप ॲडजस्ट होतात व नको त्या गोष्टींवर अमाप खर्च टाळला जातो.

वर्षभरात बारा पुस्तक वाचा


सर्वसाधारणपणे एक अमेरिकन व्यक्ती महिन्याला एक पुस्तक वाचतो व भारतीय माणूस वाचनाच्या बाबतीत त्यांच्या खिजगणतीतही नाही .

कल्पना करा की तुम्ही जर महिन्याला तुमच्या आवडत्या क्षेत्रातली ,वर्षाला 12 पुस्तक वाचलीत तर तुमच्या क्षेत्रातल्या 10% नॉलेजेबल व्यक्तींमध्ये पोहोचायला तुम्हाला वेळ लागणार नाही.

ह्या ज्ञानाचा वापर करून स्वतःला ऑनलाइन एक्सपर्ट बनवण्यासाठी कसा करायचा याचं डिटेल ट्रेनिंग मी ऑनलाईन स्वराज्य ह्या कोर्स मध्ये देतो.

आजपासून रोज 30 मिनिटं वाचन करण्याचा प्रयत्न करा, असं जर तुम्ही करायला सुरुवात केली तर वर्षाला बारा पुस्तकाचं पारायण हे ध्येय सहज साध्य होईल .

काहीतरी जोड उद्योग सुरू करा


भविष्याची चाहूल ओळखून तुम्हाला ज्यामध्ये खूप इंटरेस्ट आहे आणि गती आहे त्या विषयात स्वतःचं अस्तित्व निर्माण करायला सुरुवात करा.

मला असे कितीतरी शासकीय अधिकारी आणि नोकरी करणारे मित्र माहित आहेत जे गरज म्हणून एखाद्या क्षेत्रात उतरले, पण मनापासून ते त्यात कधीच काम करू शकले नाही.

कदाचित आत्ता ती वेळ आहे ज्यावेळी तुम्ही आत्मपरीक्षण करून काहीतरी नवीन सुरुवात करण्याचा विचार करू शकता.

कोरोनाने आपल्याला दाखवून दिले की कित्येक बलाढ्य उद्योग, कितीतरी व्यवसाय व कित्येकांच्या नोकऱ्या या पत्त्याच्या बंगल्यासारख्या ढासळू शकतात .

सातत्याने स्वतःचा पाच टक्के वेळ काहीतरी आवडीचं, भविष्य असलेलं आणि एक्स्ट्रा सिक्युरिटी देणारं सुरुवात करण्याचा अभ्यास सुरू करा.

या संदर्भात माझ्या वाचनात आलेलं एक जबरदस्त पुस्तक म्हणजे IKIGAI.



कदाचित हीच ती वेळ आहे जेव्हा तुम्ही ह्या प्रश्नांची उत्तरे देऊन योग्य मार्गक्रमण सुरू करू शकाल. 2021 मध्ये सु
खाचा व दीर्घायुष्याचा पाया रचाल.

सकाळची दिनचर्या ठरवा व तिला चिकटून राहा


सुरुवात चांगली तर दिवस उत्तम!

नवीन वर्षाच्या सुरुवातीला हा संकल्प सगळ्यांच्या लिस्टमध्ये असतो पण जसा वेळ पुढे पुढे जातो या संकल्पाला तिलांजली दिली जाते.

जग उठण्याआधी जर आपण दोन तास लवकर उठलो आणि त्याचा सदुपयोग केला तर आपण जबरदस्त गोष्टी साध्य करू शकतो.

  • कृतज्ञता व्यक्त करणे
  • ध्येय वाचणे
  • शरीराचा व मनाचा व्यायाम करणे
  • ध्यान करणे
  • (To-Do) टुडू लिस्ट बनवणे
  • स्वतःचं कौतुक करणे
अशा छोट्या छोट्या पण अत्यंत प्रभावी गोष्टींचा समावेश तुम्ही तुमच्या दिनचर्येत करू शकता

या दिनचर्येने असंख्य आयुष्य बदलली आहेत व मी ठामपणे सांगू शकतो की तुम्हाला देखील त्याचा शारीरिक,मानसिक,भावनिक व आध्यात्मिक पातळीवर प्रचंड फायदा मिळणार आहे.


कृतज्ञतेची डायरी लिहायला सुरुवात करा


गौतम बुद्धाने म्हंटलं आहे की हे जग तुमच्या विचारांचं प्रतिबिंब आहे.

तुम्ही जे आत अनुभवता ,बाहेर देखील तुम्हाला त्याचीच प्रचिती येते आणि आंतर मनातली भावना बदलण्याचा कृतज्ञतेपेक्षा जास्त प्रभावी उपाय मला तरी माहीत नाही.

सकाळी दिवसाची सुरुवात करताना तुमच्याकडे असलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रयत्न करा.

प्रत्येक जवळच्या व्यक्तीच्या दहा गोष्टी लिहून काढा ज्यासाठी तुम्हाला त्यांना कृतज्ञता द्यावीशी वाटते.

शरीराचे असंख्य अवयव, जे जन्माला आल्यापासून आजपर्यंत अहोरात्र तुम्हाला सुदृढ ठेवण्यासाठी झटत आहे त्यात प्रत्येक अवयवा
चे मनापासून आभार माना.

आजूबाजूची प्रत्येक गोष्ट ,कदाचित तिची जाणीवच आपल्याला होत नाही तिचा शांतपणे विचार करून धन्यवाद द्यायला सुरुवात करा आणि हो हे सगळं एका डायरीत नमूद करायला सुरुवात करा.

21 दिवसात तुम्हाला तुमच्या आयुष्यात जादू झाल्याचा अनुभव येईल

त्याबद्दल जास्त जाणून घेण्यासाठी मी तुम्हाला द मॅजिक (The Magic) या पुस्तकाच्या बुक समरी ची लिंक देतो आहे ती नक्की बघा आणि तुमची कृतज्ञतेची डायरी बनवायला सुरुवात करा.

अचानक ह्या जगातले सगळ्यात श्रीमंत व्यक्ती तुम्ही असल्याची भावना ह्या कृतज्ञता डायरी मुळे तुमच्या मनात निर्माण होईल.

कमीत कमी वेळ ऑनलाइन रहा



मी लॉकडाऊनपासून माझा सगळा कारभार ऑनलाइन हवला आहे.
  • रोज सकाळी व्हिडिओ बनवणे
  • आठवड्यातून तीनदा फेसबुक लाईव्ह
  • ब्लॉग लिहिणे व त्यासाठी रिसर्च करणे
  • माझ्या टीमसाठी विकली सेशन्स घेणे
  • गव्हर्नमेंट अधिकाऱ्यांसाठी ट्रेनिंग घेणे
नाही नाही म्हणता खूप जास्त वेळ ऑनलाईन जातोय
याचा विपरीत परिणाम शरीरावर, झोपेवर आणि मग नात्यांवर होतोय हे जाणवत.

2021 साठी आपल्या सगळ्यांसाठी जाणीवपूर्वक करण्याची ही एक गोष्ट नक्कीच असू शकेल.

मी यासंदर्भात एक संपूर्ण ब्लॉग लिहिला आहे तो वाचा आणि शक्य तेवढा ऑनलाइन प्रेझेन्स कमी करण्याचा प्रयत्न करा.

To Be continued .....


७० टिप्पण्या:

  1. वा सर, खूपच छान मार्गदर्शन केलंत
    आता उत्सुकता पुढील भागाची

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. खुप आश्वासक आहे सर....!! या वर्षी जानेवारीत 3 L स्टेप्स ची सुरवात भन्नाट होती.आत्ता पण आपण 10 दिवस अगोदर जागं केलय.खुप आभार,स्वराज साठी आभाळभर शुभेच्छा......💐👍🙏😊

      हटवा
    2. सर अतिशय प्रेरणादायी आहे आपले हे लिखाण!ऑगस्ट 2019 मधे जेव्हा पहिल्यांदा मी आपल्याला ऐकले तेव्हा पासुन आपल्या विचारानी प्रभावित होऊन,मी माझ्या आयुष्यात खुप सकारात्मक बदल जाणिवपूर्वक घडवले आहेत,ज्याचा परिणाम म्हणुन मी आज खुप आनंदी जीवन जगत आहे!यातील मला अत्यंत आवडलेली आपली एक संकल्पना म्हणजे 'कृतज्ञते ची डायरी'!सर,2021 या नवीन वर्षात आपण दाखवलेल्या या मार्गाने मी नक्की जाईन आणि माझं आयुष्य आणखी सुंदर बनवेन!
      श्रीमती उज्ज्वल अरुण वैद्य,
      पोलिस निरीक्षक,मुंबई शहर

      हटवा
  2. खुपच छान येणाऱ्या नवीन वर्षासाठी आम्हाला तुम्ही खूप चांगल्या प्रकारे तयार केला आहे त्याबद्दल आम्ही तुमचे खूप खूप धन्यवाद मानतो सर 🙏💐🙏👏

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. सर अतिशय प्रेरणादायी आहे आपले हे लिखाण!ऑगस्ट 2019 मधे जेव्हा पहिल्यांदा मी आपल्याला ऐकले तेव्हा पासुन आपल्या विचारानी प्रभावित होऊन,मी माझ्या आयुष्यात खुप सकारात्मक बदल जाणिवपूर्वक घडवले आहेत,ज्याचा परिणाम म्हणुन मी आज खुप आनंदी जीवन जगत आहे!यातील मला अत्यंत आवडलेली आपली एक संकल्पना म्हणजे 'कृतज्ञते ची डायरी'!सर,2021 या नवीन वर्षात आपण दाखवलेल्या या मार्गाने मी नक्की जाईन आणि माझं आयुष्य आणखी सुंदर बनवेन!
      श्रीमती उज्ज्वल अरुण वैद्य,
      पोलिस निरीक्षक,मुंबई शहर

      हटवा
  3. खूप छान. पुढच्या वर्षाच्या प्लॅनिंग साठी अत्यंत उपयुक्त.

    उत्तर द्याहटवा
  4. Very Useful guidance Sir.तुमच्या टिप्स वापरल्यामुळे आमचं 2021 जबरदस्त बनणार आहे.

    उत्तर द्याहटवा
  5. वा सर खूप छान मार्गदर्शन 2021 साठी उत्सुकता आहे पुढील ब्लॉग ची

    उत्तर द्याहटवा
  6. खुपच छान
    या सर्व गोष्टींचे संस्कार online स्वराज्य मधे आल्या पासुन होत आहेत.
    Thank you so much sir 🙏

    उत्तर द्याहटवा
  7. प्रत्युत्तरे
    1. निश्चितच खूप प्रेरणादायी आहे. सी पी आर ट्रेनिंग मध्ये आम्ही तुम्हाला पहिल्यांदा ऐकले. खूप छान वाटले. परत एकदा आम्हाला जागे केल्याबद्दल मनापासून आभार! आपण दिलेल्या सूचनांचे निश्चित पालन करू. खरेतर जाणीवपूर्वक प्रयत्न करू.

      हटवा
  8. सर तुम्ही जे लिहिता बोलता त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट आमच्या मनावर होतो
    Hats off to you

    उत्तर द्याहटवा
  9. खूपच उपयुक्त आणि 2021 ची अतुरतेने वाट बघत आहोत तुमचे मार्गदर्षन खरच great sir तुम्ही.

    उत्तर द्याहटवा
  10. व्वा सर खुपच सुंदर मार्गदर्शन.... पुढच्या ब्लॉगची आतुरतेने वाट बघत आहोत.... खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏

    उत्तर द्याहटवा
  11. अतिशय सुरेख मार्गदर्शन केल आहे सर.. खुप शुभेच्छ

    उत्तर द्याहटवा
  12. खूपच छान नवीन वर्षाची सुरुवात एकदम उत्साहात होणार

    उत्तर द्याहटवा
  13. खुप जबरदस्त सर...! तुमच्या कडून खुप ऊर्जा मिळते आणि तेच आमचे मन प्रज्वलित आणि प्रफुल्लित होण्यासाठी खुप महत्वाचे इंधन आहे..!

    उत्तर द्याहटवा
  14. खूप छान लिहिले सर तुम्ही तुमच्या संपर्कात राहून सतत मोटिवेशन मिळत राहतो

    उत्तर द्याहटवा
  15. मी खूप आभारी आहे की मला असं मार्गदर्शन मिळत आहे . नक्कीच मी फार भाग्यवान आहे ... धन्यवाद सर.

    उत्तर द्याहटवा
  16. धन्यवाद सर ,नवीन वर्षाची सुरुवात हयाच प्रकारे.
    �� नेहमी खुप मोलाचे मार्गदर्शन मिळत असते.

    उत्तर द्याहटवा
  17. धन्यवाद सर ,नवीन वर्षाची सुरुवात हयाच प्रकारे.
    🙏 नेहमी खुप मोलाचे मार्गदर्शन मिळत असते.

    उत्तर द्याहटवा

आयुष्यावर प्रभुत्व मिळवण्यासाठी स्वतः वर प्रभुत्व मिळवा - ह्या मूलभूत गोष्टींवर काम करा

आयुष्य हातातून चाललंय असं तुम्हाला वाटतं का ? तुमच्या सवयींवर तुमचा ताबा नाही असं तुम्हाला वाटतं का? सतत चिडचिड होते का ? तुमची करिअर कुठेत...