फायनली , २०२१ साठी २१ आयडिया ह्या ब्लॉग चा ३ रा भाग मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे पहिल्या २ भागांना तुम्ही खूप सुंदर प्रतिसाद दिलात , मला खात्री आहे ह्या तिसऱ्या आणि शेवटच्या भागातून देखील तुम्हाला नक्की प्रेरणा मिळेल चला तर मग , सुरुवात करूया
झोपण्याची वेळ पाळा
तुम्ही कधी सर्कॅडियन रिदम ( Circadian rhythm )हा शब्द ऐकला आहे का ?
आपल्या शरीराचं स्वतःचं असं एक घड्याळ असतं व ठरलेल्या वेळेला ठरलेल्या गोष्टी त्याला करायला आवडतात,म्हणूनच परदेशात गेलेल्या व्यक्तींना ऍडजस्ट व्हायला थोडासा वेळ लागतो.
लवकर झोपे लवकर ऊठे त्याच्या घरी आरोग्य वसे ही म्हण आपण ऐकलीच असेल.
- मग मला सांगा तुम्ही किती वाजता झोपता?
- तुम्हाला किती वाजता झोपायची इच्छा आहे?
- दहाच्या आत टीव्ही बंद करा.
- मोबाईल सायलेंटवर करून लवकर झोपायची सवय लावा.
जर सकाळी उठण्यासाठी तुम्ही अलार्म वापरत असाल तर रात्री झोपण्यासाठी देखील अलार्म लावा.
माझ्या मोबाईलवर 9:45 पासूनच टाईम टू स्लीप, टाईम टू स्लीप असा गजर सुरु होतो आणि मग माझे शरीर झोपण्यासाठी तयारी करु लागतं.
2021 मध्ये हा प्रयत्न नक्की करून बघा. तुमच्या क्वालिटी ऑफ लाईफ मध्ये प्रचंड फरक पडलेला तुम्हाला नक्की जाणवेल.
इमर्जन्सी फंड बनवा
कोरोनाने आपल्याला एक गोष्ट नक्की शिकवली,
- उद्याचं काही खरं नाही
- प्लॅन बी(Plan B) नेहमीच तयार हवा
- आवश्यक तेवढे हेल्थ इन्शुरन्स आणि लाइफ इन्शुरन्स प्रत्येकाजवळ असायलाच हवेत
मंथली बजेट बनवा ह्या टीप मध्ये मी आपल्याला उत्पन्नाचे नियोजन कसं करायचं त्याबद्दल बोललो होतो
आता कोण कोणत्या इमर्जन्सी उद्भवू शकतात याचा विचार करूया
- Worst come worst परिस्थितीमध्ये काय होऊ शकतं याची कल्पना करून बघा.
- अजून वर्षभर जर ही परिस्थिती अशीच राहिली तर काय?
- काय वेगळं नियोजन किंवा प्रयत्न करण्याची गरज आहे?
- ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर द्या आणि त्यानुसार तयारीला लागा.
पूर्ण उन्हाळ्यात मुंगी पावसाळ्याची तयारी करते
पावसाळ्यात थांबला कि पहिल्या संधीला बाहेर ती पडते आणि पुन्हा भविष्याची तजवीज सुरू करते.
गेल्या वर्षभरात केलेल्या चुकीच्या आर्थिक नियोजनाचा विचार करा आणि 2021 च्या प्लॅन B च्या तयारीला लागा.
जुन्या मित्रांशी पुन्हा कनेक्ट व्हा
आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर असे काही मित्र अशा काही मैत्रिणी असतात ज्यांच्या शिवाय आपण जगूच शकत नाही.
पण कालांतराने संसारीक व व्यावसायिक जबाबदाऱ्यांमुळे आपण प्रत्येक जण एकमेकांपासून दूर होऊ लागतो.
आउट ऑफ साईट आउट ऑफ माईंड (out of sight out of mind) हा जगाचा नियम आहे.
व्यक्ती डोळ्यासमोरुन गेली की आयुष्यातून आपोआप दूर होऊ लागते आणि मग पुलाखालून बरंच पाणी निघून जातं.
तुम्हाला 2021 मध्ये जुन्या नातेसंबंधांना पुनर्जीवित करण्यासाठी दोन टीप देतो
- पाच जवळच्या मित्रांची/ मैत्रिणींची नावं एका डायरीत लिहा (जी तुमच्या मनात कोरलेली आहेत)
- आठवड्यातले दोन दिवस ठरवा ज्या दिवशी तुम्ही थोडेसे कमी बिझी असता.
- या दिवशी दर आठवड्याला ठरलेल्या वेळेला ( जसं ७.३० to ८.३०) ह्या मित्र मैत्रिणींना फोन करून कनेक्ट करायला सुरुवात करा.
- यासाठी तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये विकली रिमाइंडर लावू शकता.
दर आठवड्याला ठरलेल्या वेळी तुमचा मोबाईल त्या मित्र-मैत्रिणीला फोन करण्याची तुम्हाला आठवण करून देईल आणि सातत्याने ते नाव डोळ्यासमोर येऊ लागलं की पुन्हा आयुष्यात त्यांची जागा निर्माण व्हायला सुरुवात होईल.
तुमची महत्त्वाची ध्येय पुनर्जीवित करा
जसं मित्रांबरोबर होतं तसंच आपल्या बऱ्याचशा धेयांबरोबरदेखील होतं.
जोपर्यंत ध्येय आपल्या डोळ्यासमोर असतात, तोपर्यंत आपण त्यांना पूर्ण करण्यासाठी काहीना काही ऍक्शन घेत असतो, नियोजन करत असतो.
पण जसं ते आपल्या डोळ्यासमोरून निघून जातात, आपल्या डोक्यातून यांच्या संबंध संबंधातले विचार देखील हळूहळू कमी होऊ लागतात.
2021 सुरुवात होण्याआधी एक गोष्ट नक्की करा
- तुमच्या जुन्या डायरीमध्ये लिहून ठेवलेली महत्त्वाची ध्येय एका कागदावर लिहून काढा.
- गुगल वर जाऊन त्यांच्या संदर्भातली चित्र शोधा व त्यांची प्रिंटआऊट काढा.
- त्या चित्रांवर तुमची ध्येय लिहून तुम्हाला ती नेहमी दिसतील, जसं बेडरूम डोअरची मागची बाजू किंवा फ्रिजवर चिकटवून ठेवा.
- जसं तुम्ही सातत्याने ही चित्र बघत राहाल तसं तुमच्या डोक्यात ही ध्येय जिवंत राहतील.
जिथे तुमचं लक्ष जातं तिकडेच तुमची उर्जा जाते आणि तिकडे तुमची उर्जा जाते तिकडेच तुम्हाला परिणाम मिळतात (whereever your focus goes , energy flows and result shows)
2021 मध्ये हे नक्की करून पहा
तुमची ध्येय जवळच्या व्यक्तीबरोबर शेअर करा
माझ्या ट्रेनिंगमध्ये मी नेहमी विचारतो, कोणाकोणाला वजन कमी करायचा आहे ?
बरेचजण हात उंचावतात.
मग मी त्यांना त्यांचे ध्येय घोषित करायला सांगतो. एक मे 2021 पर्यंत माझं वजन 75 किलो असेल.
जे प्रशिक्षणार्थी त्यांचे ध्येय घोषित करतात ते त्यांच्या ध्येयाशी जास्त प्रामाणिक असल्याचं माझ्या लक्षात आलं आहे.त्यांना माहित असतं की ३० एप्रिल पर्यंत त्यांना कोणीही विचारणार नाहीत, पण १ मे ला त्या रूम मधील कोणीतरी त्यांना फोन करून ध्येय पूर्ण झालं कि नाही याची नक्की विचारणा करणार.
मानवी स्वभावच असा आहे ,आपण स्वतःला दिलेल्या वचनाशी कमी प्रामाणिक असतो आणि इतरांना दिलेली वचने आपण पाळण्याचा जास्त प्रयत्न करतो, म्हणून तुमच्या जवळच्या एखाद्या मित्राशी किंवा नातेवाईकांशी तुमच्या ध्येयांची चर्चा करा आणि जमेल तेव्हा तुमच्या प्रगतीचा आलेख त्यांच्या बरोबर डिस्कस करा.
मी तुम्हाला खात्री देऊन सांगतो की 2021 मध्ये तुमच्या धेयांच्या दिशेने तुम्हाला नक्की प्रगती झालेली आढळेल.
नवीन छंद जोपासा
बरीच वर्ष एकाच प्रकारच्या गोष्टी केल्यामुळे आयुष्य रटाळ होऊ लागतं आणि मग स्वतःला आनंदी उत्साही आणि सकारात्मक ठेवण्यासाठी एखाद्या नवीन छंदापेक्षा जास्त सोपं आणि जास्त चांगलं काहीच नाही.
विचार करून बघा कित्येक वर्षापासून तुमच्या अंतर्मनात दडलेल्या सुप्त इच्छा कोणत्या आहे?
- तुम्हाला गिटार शिकायचंय?
- तबला वाजवायला शिकायचंय?
- पेंटिंगमध्ये रस आहे का?
- बुलेट घेऊन तिच्यावरून रुबाबाने फिरायचंय?
- नवीन भाषा शिकायची आहे?
असा कोणता छंद आहे ज्याच्यासाठी तुम्ही आठवड्यातून एक तास जरी गुंतवला तरी एक वेगळाच आनंद तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे ?
तिहार जेलमध्ये मी घेतलेल्या एका ट्रेनिंगनंतर तिथल्या एका उच्च अधिकाऱ्याने कीबोर्ड (Keyboard) शिकायला सुरुवात केली. आज ह्या गोष्टीला साधारणतः सात वर्षे झाली असतील. आम्ही जेव्हापण बोलतो तेव्हा फक्त संगीत आणि की-बोर्ड त्याच्याबद्दलच बोलतो आणि त्यांच्या पंचवीस वर्षाच्या करियरमध्ये आलेला क्षण ह्या कीबोर्डने पूर्णपणे काढलेला मला जाणवतो.
सेवेकरी (Volunteer) व्हा
आपण सगळेच समाजाचे काहीतरी देणे लागतो आणि खरा आनंद हा इतरांची सेवा केल्यानंतरच मिळतो, हे कळायला बरीच वर्ष निघून जातात.
तुम्ही जेव्हा द्यायला सुरुवात करता तेव्हा निसर्गाला तुम्ही एक संदेश देता, 'माझ्याकडे गरजेपेक्षा जास्त आहे आणि माझी देण्याची कुवत आहे' आणि जे द्यायला लागतात निसर्ग त्यांना भरभरून देणे सुरुवात करतो.
तन, मन किंवा धन कोणत्याही रूपात तुम्ही तुमची सेवा देऊ शकता.
समाजाच्या कोणत्या क्षेत्रात बदल घडवून येणं तुम्हाला अपेक्षित आहे त्या क्षेत्रात तुमची सेवा देण्यास सुरुवात करा.
- स्वतः जाऊन काम करा.
- शक्य नसेल तर मार्गदर्शन करा.
- आणि तेही शक्य नसेल तर आर्थिक मदत करण्याचा प्रयत्न करा.
आठवड्यातून एखाद तास केलेली अशी सेवा तुम्हाला वेगळीच तृप्ती मिळवून देईल.
स्वतःचं कौतुक करा
ह्या जगात तुमच्यासाठी असलेलं सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे तुम्ही केलेल्या चांगल्या गोष्टींसाठी स्वतःचं कौतुक करणं.
मी जेव्हा ट्रेनिंगमध्ये हा प्रश्न विचारतो की, तुम्ही गेल्या सहा महिन्यात स्वतःचं कितीवेळा मन भरून कौतुक केलेलं आहे,तेव्हा कित्येक जण एकमेकांचे चेहरे बघत असतात.
आपण एवढ्या सगळ्या ताणतणावात आणि जबाबदार्यात जगत असतो की स्वतःकडे बघायला आपल्याला वेळच नसतो.
माझे गुरुजी नेहमी म्हणतात की तुमची प्रगती ही तुमच्या आत्म-प्रतिमेवर अवलंबून असते आणि तुमची आत्मप्रतिमा उंचावायची असेल तर जाणीवपूर्वक स्वतःचं कौतुक करणं खूप महत्त्वाचं आहे.
मग उद्यापासून एक गोष्ट नक्की करा.
सकाळी तुम्ही बाहेर जाण्यासाठी पूर्णपणे तयार झालात की आरशात बघा ,स्वतःलाच एक सुंदर स्माईल द्या, 'तू बेस्ट आहेस'(You are the best ) असं स्वतःलाच म्हणा आणि काल दिवसभरात केलेल्या महत्वाच्या गोष्टींसाठी मनातल्या मनात स्वतःचं कौतुक करा स्वतःचीच पाठ थोपटा.
आनंदी आणि आत्मविश्वासपूर्ण आयुष्य जगण्यासाठी याच्यापेक्षा स्वस्त आणि पावरफुल औषध तुम्हाला मिळणारच नाही आजपासून न चुकता या औषधाचा डोस दिवसातना कमीत कमी एकदा घ्यायला सुरुवात करा.
चला वर्ष संपायच्या आधी मी तुमच्यासाठी 21 अशा गोष्टी घेऊन आलो आहे ज्या नक्कीच 2021 ची धमाकेदार सकारात्मक सुरुवात करण्यासाठी तुमच्या उपयोगात येतील.
आधीच्या दोन ब्लॉगमध्ये मी आणखीन काही टिप्स दिलेल्या आहेत या लिंकवर क्लिक करून त्या देखील नक्की वाचून घ्या.
ह्या 21 आयडिया मधल्या कोणकोणत्या आयडिया तुम्ही तुमच्या आयुष्यात 2021 मध्ये अमलात आणणार आहात ते मला कमेंट मध्ये नक्की कळवा.
365 कोऱ्या पानांचा पुस्तक लवकरच आपल्या हातात येणार आहे आणि नव्या उमेदीने नव्या आशेने आपण त्यावर आपलं भविष्य लिहायला सुरुवात करणार आहोत.
2021 हे तुमच्या आयुष्यातलं सर्वोत्तम वर्ष व्हावं ह्या प्रार्थनेने मी माझा हा ब्लॉग पूर्ण करतो.
तुम्हाला जर समविचारी लोकांची एक जबरदस्त कम्युनिटी जॉईन करायची असेल तर ह्या लिंकवर क्लिक करून आमची मिशन ऑनलाइन स्वराज्य ही कम्युनिटी नक्की जॉईन करा आणि 2021 मध्ये प्रचंड सकारात्मकता अनुभवा
हा ब्लॉग पूर्ण वाचल्याबद्दल धन्यवाद!
ऑनलाईन स्वराज्य हा आपल्या सगळ्यांचा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि आपण तो मिळवणारच!











वा सर
उत्तर द्याहटवातिसरा भाग ही अप्रतिम.
सगळ्या टिप्स जबरदस्त👍👍🙏💐
Thank you UC
उत्तर द्याहटवाThird part तर एकदम भारी. Thank you सर
उत्तर द्याहटवाThank you Mam
हटवाखुप सुंदर ब्लॉग सर...फारच छान टिप्स
उत्तर द्याहटवालवकर झोपण्यासाठी अलार्म हवा....खुप छान सन्कल्पना आणी नविन व अतिशय उपयुक्त
सेवे करी व्हा ....खुप छान संदेश
खरच नविन कोरे वर्ष आपल्या हाती येतोय आणी आपण हे ते लिहू शकतो आणी मिळवू शकतो...
Thank you so much sir for all 3 nice blog for 2021
God bless you 💐
Superb sir... Eye opening blog
उत्तर द्याहटवाThank you so much
हटवाही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवाSuperb 21 ideas to conquer ourself and be ready to make a super duper year of sucess
हटवाGreat ideas for the new year Sir
उत्तर द्याहटवाThank you
उत्तर द्याहटवाक्या बात हैं सर, जबरदस्त. 💐💐👌👍
उत्तर द्याहटवाThank you
हटवाExcellent sirji
उत्तर द्याहटवासर्व कल्पना छान आहेत, आवश्यक्ता आहे ती अंगीकरण करुन आपले ध्येय साध्य करण्याची.
उत्तर द्याहटवाThank you
हटवानवीन वर्षाच्या सुरुवातीसाठी सर तुमचा हा ब्लॉग प्रत्येकालाच खूप खूप मदत करेल.आमच्यासाठी योग्य ते मार्गदर्शन तुम्ही देत आहात त्यासाठी वैवी आपले खूप खूप आभार व्यक्त करते.🙏🙏💐
उत्तर द्याहटवाThank you
हटवासर नमस्कार आपण दिलेल्या टिप्स फारच छान आहे. अमलात आणणे आवश्यक आहे. जिवनात अमुलाग्र बदल घडून येईल.
उत्तर द्याहटवाखूप खूप छान ब्लॉग.....अतिशय प्रेरणादायी....एकदम जबरदस्त टिप्स.....तुमचे मनापासून धन्यवाद सर 🙏🙏🙏🙏🙏
उत्तर द्याहटवाThank you
हटवाखूपच छान
उत्तर द्याहटवाThank you
हटवाAwesome sir...Happy 21 Mitranno
उत्तर द्याहटवासर्वच points एकदम powerful आहेत व आपण जीवनात अमलात आणू शकतो, आणायला पाहिजे, छोट्याशा स्वरूपात का होईना .
उत्तर द्याहटवानव्या वर्षाची नवी सुरूवात . Thanks
२१ आइडिया उत्तम
उत्तर द्याहटवाThank you
हटवाखूप छान सर. दिवसामागून दिवस आणि वर्षा मागून वर्ष गेली, खूप गोष्टी करायच्या राहिल्या. तुम्ही blog लिहून पुन्हा एक नवीन आशा दिलीत. खूप छान टीप्स दिल्या आहेत सर.
उत्तर द्याहटवाखूप खूप धन्यवाद सर
खरंच आपण असे वागलो तर?. IKIGAI and Japan आठवले.Fantastic job Ketan Sir 👏 .एक चांगले Mentorलाभले.🙏Thanks to 2020. Welcome 2021 with this positive Affirmations. God bless you .Thanks to you
उत्तर द्याहटवाThank you
हटवासर खुप छान ,खरेच आपण आम्हास नविन वर्षाचे गिफट दिले आहे. धन्यवाद
उत्तर द्याहटवाअतिशय उपयुक्त मुद्दे मांडले आहेत. सर्वांना वर्ष 2021 उत्तम आरोग्याचे व अर्थपूर्ण असो.
उत्तर द्याहटवाखूप सुंदर टिप्स सर . त्यात पेरलेले तुमचे स्वतःचे अनुभव . Khup छान मांडणी .
उत्तर द्याहटवाThank you
हटवाअश्या Tips खूपच उपयोगी पडतील यशाच्या मार्गावर पुढे जाण्यासाठी..
उत्तर द्याहटवाThank you!!
2021 साठी चे 21 tips खूप छान सर
उत्तर द्याहटवाThank you
हटवाखूप छान सर
उत्तर द्याहटवाMast tips Sir 🙏🙏this is new year gift for us🙏🙏
उत्तर द्याहटवाThank you
हटवाखुप सुंदर ब्लॉग आहे...धन्यवाद🙏
उत्तर द्याहटवाखुप छान सर
उत्तर द्याहटवाKhupach chhan Tips
उत्तर द्याहटवास्वतावर वर खूप प्रेम करा
खुप जबरदस्त सर.. मनापासून धन्यवाद .
उत्तर द्याहटवाखुप सुंदर ब्लॉग आहे...धन्यवाद🙏
उत्तर द्याहटवाअगदी सोप्या आणि प्रभावी टिप्स ... या टिप्स आम्हा सर्वांना आयुष्याच्या सर्व क्षेत्रात अधिक प्रभावी होण्यासाठी नक्कीच मदत करतील.
उत्तर द्याहटवाआम्हाला टिप्स उपलब्ध करून दिल्याबद्दल आपले आभार.
हा ब्लॉग पुन्हा पुन्हा वाचला तरी आजच लिहिला आहे असे वाटते, खूप चांगले मार्गदर्शन आहे. आता ज्या टप्प्यावर पोहोचलो आहे तिथे हेच मार्गदर्शन वळणाचे ठरणारच आहे.
उत्तर द्याहटवाथँक्स स्वराज्य!!!