2021 ची नुकतीच सुरुवात झालेली आहे
आपण सगळे प्रचंड उत्साह,आकांक्षा आणि अपेक्षेने 2021 कडे बघत आहोत.
दरवर्षी आपण असाच उत्साह अनुभवतो, पण जानेवारी संपेपर्यंत हा सगळा उत्साह हरपून जातो आणि आपण पुन्हा आपल्या रेग्युलर रुटीनमध्ये बिझी होतो.
रिसर्च सांगतो की 98 टक्के संकल्प हे 8 जानेवारीपर्यंत कचऱ्याच्या डब्यात गेलेले असतात.
हे असं का होतं? कारण आपण नव्याचे नऊ दिवस (इथे खरंतर आठच दिवस) आपला उत्साह टिकून ठेवू शकतो.
दुसरं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आपण आत्मपरीक्षण करायला विसरतो.
तुम्ही जे करताय तेच करत आलात तर तुम्हाला तेच मिळेल जे आजपर्यंत मिळालं आहे, तुम्हाला असं काहीतरी हवं असेल ते आजपर्यंत मिळालं नाही तर असं काहीतरी करावं लागेल ते आजपर्यंत केलेलं नाही.
सॉक्रेटिस जगातला एक महान तत्ववेत्ता सांगून गेलाय जर तुम्ही तुमच्या अनुभवांचं पृथक्करण करून आयुष्य तुम्हाला काय शिकवतं आहे हे समजून घेत नसाल तर तुम्ही तुमचे आयुष्य व्यर्थ घालवताय.
कदाचित ह्याच कारणामुळे आपण दिवसांमागुन आठवडे, आठवड्या मागून महिने आणि महिन्या मागून वर्ष व्यर्थ घालवत आलो आहोत.
ह्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला असे पाच प्रश्न सांगणार आहे जे जर तुम्ही स्वतःला आत्ता आणि दर महिन्याच्या सुरुवातीला परत परत विचारले तर कदाचित तुमच्या ध्येयाची गाडी तुम्ही योग्य रुळावर ठेवू शकाल.
नमस्कार! माझं नाव केतन गावंड, ऑनलाइन स्वराज्यसारथी, येत्या तीन वर्षांमध्ये एक लाख उद्योजकांना त्यांचं ऑनलाइन स्वराज्य उभं करायला मदत करणे हा माझा ध्यास.
चला तर मग सुरुवात करूया.
१) मी माझ्या ध्येयाच्या दिशेने खरंच पुढे जातोय का?
- गेल्यावर्षी मला वजन कमी करायचं होतं
- मला बरीच पुस्तकं वाचायची होती
- माझे नाते संबंध सुधारायचे होते
- करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी काही नवीन स्किल्स शिकायच्या होत्या
- माझ्या तब्येतीवर आणि मानसिकतेवर जाणीवपूर्वक काम करायचं होतं
अशा बर्याच गोष्टी मला करायच्या होत्या.
वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात मी माझ्या संकल्पाची भलीमोठी यादी बनवली आणि पंधरा दिवसातच एक ना धड भाराभर चिंध्या अशी अवस्था झाली होती.
रॉबर्ट कोच यांनी लिहिलेलं एक उत्कृष्ट पुस्तक - 80-20 Principle
यात रॉबर्ट कोच म्हणतात की 20 टक्के गोष्टींवर 80 टक्के परिणाम अवलंबून असतात.
मग अशा कोणत्या 20% गोष्टी आहेत ज्या जर मी रोज सातत्याने करायला सुरुवात केली तर त्याचे 80 टक्के परिणाम माझ्या आयुष्यात मिळतील हे यावेळी ठरवणे अतिशय गरजेचे आहे
फार जास्त गोष्टींवर फोकस न करता महत्वाच्या निवडक अशा काही गोष्टींवर तुमचं संपूर्ण लक्ष केंद्रित करा ,कमीत कमी 66 दिवस त्या सवयींवर काम करा आणि एकदा त्या तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग झाला की मग पुढच्या गोष्टींचा विचार करा.
माझ्या ध्येयाच्या दिशेने कमीतकमी कोणत्या गोष्टी करण्याची गरज आहे ज्या मला माझ्या ध्येयापर्यंत पोहोचवतील ?
जेव्हा पोहोचायचे कुठे हे स्पष्ट असतं, तेव्हा रस्ता आपोआप दिसायला लागतो.
तुमची ध्येय स्पष्ट असतील तर त्यांच्या पर्यंत पोहोचण्यासाठी सातत्याने कोणत्या गोष्टी करायला पाहिजे याचा आराखडा मनात स्पष्ट करा.
- नऊ महिन्यात कुठे?
- सहा महिन्यात कुठे?
- तीन महिन्यात कुठे?
- महिन्याभरात कुठे?
हा जर roadmap' तुम्हाला स्पष्टपणे दिसत असेल तर तुम्ही ध्येयापर्यंत पोहोचण्याची संभावना शक्यता खूप जास्त असते.
२)मी योग्य दिशेने आणि एकाच देशाने चाललोय का?
परस्पर विरोधी ध्येयांमुळे माझी ओढाताण होते आहे का ?
कळत-नकळत आपण वेगवेगळ्या ध्येयांना एकाच वेळेला पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो.
कल्पना करा एक गाडी उभी आहे आणि तुम्ही तिला मागून धक्का मारत आहात , समोरून कोणीतरी दुसरा धक्का मारतोय आणि बाजूच्या दोन्ही दिशेने इतर दोन जण धक्का मारत आहेत.
मला सांगा ती कार जागेवरून हालेल का?
शक्यच नाही, कळत-नकळत आपण हेच करत असतो.
- आपल्याला करिअरमध्ये काहीतरी मोठं साध्य करायचं असतं आणि त्याच वेळी आपण करमणुकीची देखील बरीच ध्येय लिहून ठेवलेली असतात .
- आपल्याला तब्येत खूप चांगली करायची असते आणि त्याच बरोबर आपण पार्ट्यांचं आणि गेट-टूगेदर मनोमन प्लॅनिंग करून ठेवलेलं असतं आणि ह्यामुळे आपल्या ध्येयांची गाडी जागेवरून हलतच नाही.
यावर्षी हा प्रयत्न नक्की करा की तुमची ध्येय ही एकाच दिशेमध्ये आहेत, परस्परविरोधी ध्येय शक्यतो टाळण्याचा प्रयत्न करा.
३)मी जे करतोय त्यातून मला निखळ आनंद मिळतोय का?
माझ्या ध्येयांच्या ध्यासापायी मी आनंदाची गळचेपी करतोय का?
आपली विल पावर फार कमकुवत असते.
वर्षाच्या सुरुवातीला आठ दहा दिवस आपण तिच्या जोरावर काही गोष्टींना नकार देऊ शकतो पण त्यानंतर स्वतःवरचा ताबा सुटायला वेळ लागत नाही.
बऱ्याच वेळेला आपण प्रगतीसाठी अशी ध्येय निवडतो ज्यासाठी आपण आपल्या आनंदाचा त्याग करतो.
माझ्या आतापर्यंतच्या अनुभवातून मी तुम्हाला सांगतो की तुम्ही जे करताय त्यातून जर तुम्हाला आनंद मिळत नसेल तर दीर्घकाळ तुम्ही ती गोष्ट करू शकणार नाही.
कदाचित ते काम करण्याचं कौशल्य तुमच्याकडे असेल पण जर ते करताना आनंदाची अनुभूती नसेल तर फार काळ ते तुम्ही करू शकणार नाही.
४) माझ्या कामाचे चक्रवाढ परिणाम मिळतील का?
2+2+2+2+2+2+2+2+2+2=20
2X2X2X2X2X2X2X2X2X2=1024
गणित असे दिसायला सोपे पण परिणाम फार वेगळे आहेत.
आपण बऱ्याच वेळेला बऱ्याच गोष्टींची धरसोड करतो आणि त्यामुळे आपली प्रगती दोन अधिक दोन अशीच होत राहते.
जे लोक सातत्याने दहा हजार तास त्यांच्या आवडत्या क्षेत्रात काम करतात त्यांची प्रगती दोन गुणिले दोन गुणिले दोन अशी होते.
माझ्या या करिअरमध्ये पहिल्या दहा वर्षात मी आठ जॉब बदलले आणि नंतरच्या दहा वर्षात मी ट्रेनिंगला चिकटून राहिलो.
माझ्या शेवटच्या जॉब मध्ये मी वर्षाला जेवढा पगार घ्यायचो तेवढे उत्पन्न मी काही वर्षापूर्वी एका महिन्यात मिळवू शकलो.
आपल्या सातत्याचे चक्रवाढ परिणाम काय असतात हे मी ट्रेनिंग मध्ये आल्यावर अनुभवले.
आता मी ऑनलाइन मध्ये काम करायला सुरुवात केली आहे आणि मला खात्री आहे की जर मी दहा हजार तास ऑनलाईन क्षेत्रात देखील काम केलं तर हे चक्रवाढ परिणाम मी माझ्या कामात लवकरच अनुभवेन.
५) गेल्या वर्षी मला कुठे पोहोचायचं होतं?
मी तिथे पोहोचलो/ नाही पोहोचलो? आणि नाही तर का नाही?
हे प्रश्न खरंच आपल्याला खूप काही शिकवून जातात
इंग्लिश मध्ये खूप सुंदर म्हण आहे , Strengthen your strength and weaken your weakness.
- ज्या गोष्टी केल्यामुळे तुम्हाला चांगले परिणाम मिळाले ते जास्तीत जास्त करण्याचा निश्चय करा.
- ज्या गोष्टींमुळे तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकला नाही त्या कटाक्षाने टाळण्याचा प्रयत्न करा.
स्टीव्ह जॉब्स एक सुंदर वाक्य,तो म्हणतो की यशस्वी लोकच यशस्वी होण्याचं सगळ्यात मोठं कारण हे ते काय करतात हे नसून कोणत्या हजार गोष्टींना नाही बोलण्याची ताकद ते ठेवतात ते आहे.
कदाचित ह्या एका उत्तरातून तुम्ही 2021 मध्ये कित्येक गोष्टी टाळण्याची यादी बनवू शकाल आणि ज्या गोष्टींमुळे तुम्हाला चांगले रिझल्ट मिळाले त्या जास्तीत जास्त करू शकाल.
तात्पर्य 2021 मध्ये आपण ठरवलेली ध्येय जर साध्य करायची असतील तर नियमित आत्मपरीक्षण करून आपल्या ध्येयाला चिकटून राहण्याची गरज आहे. परस्पर विरोधी गोष्टी टाळून, स्पष्ट विचारांनी, योग्य दिशेने पुढे जाण्याची गरज आहे.
हा ब्लॉग शेवटपर्यंत वाचल्याबद्दल धन्यवाद!
मला पूर्ण विश्वास आहे की या पाच प्रश्नांच्या मदतीने तुम्ही 2021 ला एक जबरदस्त वर्ष नक्कीच बनवू शकाल.
तुम्हाला ह्या विषयी जर काही प्रश्न असतील तर कमेंट मध्ये नक्की विचारा.
तुमच्या ध्येयपूर्तीसाठी योग्य वातावरणात राहण्यासाठी आमची मिशन ऑनलाइन स्वराज्य ही कम्युनिटी नक्की जॉईन करा.
ऑनलाईन स्वराज्य हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे आणि आपण तो मिळवणारच!









Classic
उत्तर द्याहटवाThank you
हटवामस्त
उत्तर द्याहटवावा, नवीन वर्षातला पाहिला ब्लॉग
उत्तर द्याहटवाखूपच छान आहे
Chan
उत्तर द्याहटवाखूपच छान सर ! विचार करायला लावणारे प्रश्न !
उत्तर द्याहटवाThank you
हटवासर खूपच मस्त मार्गदर्शन हा ब्लॉग नक्कीच आम्हाला यशाच्या दिशेने घेऊन जाईल. धन्यवाद
उत्तर द्याहटवासर खूपच मस्त ब्लॉग आम्हाला ध्येयाच्या दिशेने मार्गदर्शक आहे. धन्यवाद
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर!! स्फूर्तिदायक !!🙏🙏🙏
उत्तर द्याहटवाखूप छान लिहिला सर ब्लॉग सुंदर मार्गदर्शन
उत्तर द्याहटवाPowerful.अगदी सोपी आणि सुटसुटीत ओघवती भाषेत explation.
उत्तर द्याहटवाखूप छान ब्लॉग... विचार करायला लावणारा आहे... यामध्ये दिलेल्या गोष्टींवर विचार करून काम करत राहिले तर नक्कीच फायदा होईल...👍👌👌
उत्तर द्याहटवाPowerful. अगदी सहज आणि सुंदर भाषेत समजावून सांगितलेत. धन्यवाद केतन सर
उत्तर द्याहटवाखूप छान लिहिले आहे केतनसर. खूप खूप धन्यवाद🙏🙏
उत्तर द्याहटवाखूप छान पद्धतीने तुम्ही समजून सांगितले आहे.
उत्तर द्याहटवाHelped to introduction. Thank you sir
उत्तर द्याहटवाSunder blog
उत्तर द्याहटवाखुप सुंदर blog आहे सर
उत्तर द्याहटवाआत्मपरीक्षण करणे खुप मह्त्वाचे आहे...
ही सवय online स्वराज्य मधे आल्या पासुन लागली
रोज च्या दिवसाचे मग आठवड्या चे मग महिन्याचे आणी आता पूर्ण वर्षा चे जेव्हा आपण परिक्षण करतो तेव्हा नविन वर्षा चे नियोजन करण्यास खुप मदत होतेय...
Thank you so much sir
खुपच प्रेरणादायी आहेत हे तुमचे विचार सर!!
उत्तर द्याहटवालै भारी
उत्तर द्याहटवाखूप छान ब्लॉग,👍🏻 प्रत्येका व्यक्तीस आत्मपरीक्षण करण्यास उद्युक्त करणारा ब्लॉग आहे.
उत्तर द्याहटवायोग्य दिशेने मार्गक्रमण करणे खूप गरजेचे आहे आत्मपरिक्षण करणे हे सांगणारा हा ब्लॉग आहे
उत्तर द्याहटवाNakkich fayada hoil hya blog cha.. thank you so much sir 🙏🙏
उत्तर द्याहटवाआत्मपरीक्षण, ध्येय निश्चित करणे, योग्य दिशा ठरवणे आणि कामांमध्ये मिळणारा आनंद हे सर्व मुद्दे खूप जबरदस्त आहेत. सर याचा नक्कीच फायदा होईल. 2021 सुरुवातीच्या या सुंदर ब्लॉक साठी खूप खूप धन्यवाद सर. 🙏🙏
उत्तर द्याहटवाJabardast blog I hope these five questions can change our destiny.
उत्तर द्याहटवाYes These Five Tips change myself
उत्तर द्याहटवा80-20 principles Jabardasta
This is give me clearly picture of my future life thanku sir. very helpfull.😇❤🙏
उत्तर द्याहटवाअतिशय मार्गदर्शक Blog
उत्तर द्याहटवाआपण नेहमीच खूप गोष्टी plan करतो पण यशाच्या दिशेने मोजमाप करणे विसरतो.
या ब्लॉक मध्ये ते उत्तम रित्या explain केलेले आहे.
Thank you.
Looking forward to some more informative blogs like this...