बुधवार, १३ जानेवारी, २०२१

लेडी बॉस 2021 !




झी मराठीवर 'अगं बाई सासूबाई' या सिरीयल मध्ये मी निवेदिता जोशी सराफ यांचा  डायलॉग मी ऐकला,प्रत्येक स्त्रीमध्ये एक उद्योजिका असतेच तिला फक्त बाहेर काढण्याची गरज आहे,योग्य मार्गदर्शन देण्याची गरज आहे.


तुमच्यामध्ये देखील एक उद्योजिका दडलेली आहे का ? 

नमस्कार माझं नाव केतन गावंड!

2008 पासून मी ट्रेनिंग क्षेत्रात काम करतो. 

मी मॅक्स न्यूयॉर्क लाइफ इन्शुरन्स (MNYL)  कंपनी मध्ये असताना माझ्याकडे अनेक महिला इन्शुरन्स ॲडव्हायझर यायच्या. वय साधारणतः 35 ते 45 वर्ष. 

महत्त्वाकांक्षी, सुशिक्षित,उच्चशिक्षित,अनुभवी,कार्यक्षम,तल्लख, संवाद कुशल आणि संवेदनशील. 




मला त्यांच्याबरोबर काम करताना नेहमीच आश्चर्य वाटायचं की इतके वर्ष ह्या फक्त गृहिणी म्हणून कशा जगत होत्या. 

त्यांच्याशी बोलताना मला जाणवायचं की कुटुंबासाठी आणि इतरांसाठी त्यांनी जबरदस्त त्याग केलेला आहे. 

स्वतःच्या आशा-आकांक्षा कौशल्य यांना बाजूला सारून त्या फक्त कुटुंबासाठी जगत आलेल्या आहेत. 

एक पर्व नवऱ्यासाठी आणि दुसरं पर्व मुलांसाठी खर्ची घातलेलं आहे आणि त्याना  ह्याबद्दल कधीच वाईट वाटलेलं नाही. 

आता नवरा आपल्या व्यवसायात आणि कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यात खूप जास्त व्यस्त झालाय त्यामुळे ,बायकोसाठी इच्छा असूनही तो वेळ काढू शकत नाही. 


मुलं अशा वयात येऊन पोहोचली आहेत की त्यांना आता आईच्या पंखा खालून बाहेर पडून स्वतःचे विश्व निर्माण करण्याची इच्छा सतावू लागली आहेत. 

या अशा विचित्र परिस्थितीमध्ये या महत्त्वाकांक्षी स्त्रियांना आयडेंटिटी क्रायसिस (Identity Crisis) निर्माण होऊ लागतो. 

स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी त्या धडपडू लागतात. 


काही, त्यांचे विसरलेले छंद जसं गाणं, फोटोग्राफी ,पेंटिंग ,शिवणकाम अशा वेगवेगळ्या छंदांना पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न करतात तर काही आपलं मन,किती पार्टी आणि मैत्रिणींमध्ये रमवतात. 

काही स्वावलंबी होण्यासाठी इन्शुरन्स किंवा नेटवर्क मार्केटिंग सारखं क्षेत्र निवडतात. 

काही छोटा-मोठा जॉब करायला सुरुवात करतात. 

पण या सगळ्या मागे फक्त स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याची सुप्त इच्छा असते,स्वतःला सिद्ध करून काहीतरी करून दाखवण्याची तळमळ असते. 

काहीना योग्य मार्ग सापडतो तर काहींच्या आत तेवणारा तो दिवा, काही दिवसातच सांसारिक जबाबदाऱ्या, ठरलेलं रुटीन आणि योग्य मार्गदर्शनाच्या अभावी विजून जातो.

प्लस या वयात येणाऱ्या हॉर्मोनल चेंजेस मुळे त्या जास्त चीडचिड्या , असुरक्षित आणि एकाकी व्हायला लागतात . 

तुम्ही देखील असाच काही अनुभवलय का ?  

मिशन ऑनलाइन स्वराज्य या प्लॅटफॉर्मची निर्मिती केल्यानंतर अशा अनेक महत्त्वाकांक्षी गृहिणी कम उद्योजकांच्या मी संपर्कात आलो. 

त्यांनी केलेली प्रगती पाहून मी थक्क झालोय. 

इतक्या साऱ्या जबाबदाऱ्या सांभाळून त्यांच्या पॅशनला न्याय देत, स्वतः ऑनलाइन स्वराज्य निर्माण करायला त्यांनी सुरुवात केली आहे. 

महत्त्वाचं म्हणजे 

  • त्यांचा दृष्टिकोन बदलला आहे
  • त्यांच्यात जास्त सकारात्मकता आलेली आहे
  • त्या स्वतःची जास्त काळजी घ्यायला लागल्या आहेत. 
  • स्वतःला व्यक्त करायला शिकल्या आहेत
  • व्हिडिओ बनवून युट्युबर बनल्या आहेत
  • ब्लॉग लिहून ब्लॉगर झाल्या  आहेत  
  • इतरांचे मनापासून कौतुक करायला शिकल्या आहेत
  • स्वतःच्या प्रायॉरिटी व्यवस्थित मॅनेज करायला लागल्या आहेत

त्यांच्या प्रगतीला मी जेव्हा समजून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा माझ्या लक्षात आलं की या वैश्विक महामारीत,लॉकडाऊन मध्ये आणि प्रचंड नकारात्मकता असताना देखील ह्या सगळ्यांनी आऊटस्टँडिंग रिझल्ट मिळवले आहेत. 

माझ्या लक्षात आलं की या आधीपासूनच सुपरस्टार आहेत,कित्येक जबाबदाऱ्या एकाच वेळी या लीलया पेलू  शकतात

योग्य टाईम मॅनेजमेंट करू शकतात

फक्त गरज होती ती 

  • योग्य मार्गदर्शनाची 
  • योग्य वातावरणाची आणि 
  • सातत्याने योग्य कृती करण्याची



ह्या तीन गोष्टी मिळाल्या की सामान्य वाटणारी गृहिणी देखील असामान्य गोष्टी करायला तयार होते. 

तुम्ही असं काहीतरी करण्याचा विचार करताय का ? 

कारण सध्याच्या बदलणाऱ्या वातावरणात आपल्या जबाबदार्‍यादेखील झपाट्याने बदलत आहेत. 

कदाचित आत्तापर्यंत प्रामुख्याने तुम्ही कुटुंबाची आणि मुलांची जबाबदारी घेतलीत , आता तुम्हाला स्वतःची जबाबदारी घ्यावी लागणार आहे, स्वतःला भविष्यासाठी तयार करावं लागणार आहे

कदाचित कुटुंबाची थोडीफार आर्थिक जबाबदारी देखील तुम्हाला उचलावी लागणार आहे. 

तुम्ही जे करताय तेच करत राहिलात तर तुम्हाला तेच मिळेल जे आत्तापर्यंत मिळाला आहे तुम्हाला असं काहीतरी हवं असेल जे आजपर्यंत मिळालं नाही तर तुम्हाला असं काहीतरी करावं लागेल जे तुम्ही आजपर्यंत केलेला नाही

  • सध्याच्या अनिश्चित परिस्थितीमध्ये तुमच्यासारख्या अनेक महिलांना मी, 
  • स्वतःचा आवाज ओळखून
  • योग्य ध्येय ठरवून 
  • टेक्नॉलॉजी हाताळायला तयार करून 
  • व्यक्त व्हायला मार्गदर्शन केलं  आहे आणि त्यांचे संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं आहे. 

त्या आता स्वतःच्या आयुष्याच्या लेडी बॉस झाल्या आहेत. 

श्रद्धा पाटील, माया दणके, अक्षदा विचारे,स्वाती अभंग,हर्षाली एडणकर ,प्रणोती शितोळे ह्या अशाच काही ऑनलाईन स्वराज्यातल्या रणरागिणी आहेत. 

यांना बघून तुमच्या मनात देखील जर काहीतरी करण्याची इच्छा जर बळावून आली तर मला नक्की कळवा. 

एका नवीन आयुष्याची सुरुवात करून करण्यासाठी जर तुम्हाला मार्गदर्शन हवे असेल,

आनंदी, संयमी आणि भक्कम आयुष्य जगायचं असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून लेडी बॉस 2021 तीन तासाच्या वर्कशॉपसाठी रजिस्टर करा व माझं ऑनलाइन स्वराज्यनिर्मीतीच्या सहा पायऱ्या हे पुस्तक मोफत मिळवा. 

तुमच्यामध्ये दडलेल्या स्वतःचं अस्तित्व सिद्ध करू पाहणाऱ्या त्या लेडी बॉसला माझा सलाम, सदैव तुमच्या सेवेत तत्पर . 

ऑनलाईन स्वराज्य हा आपल्या सगळ्यांचा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि आपण तो मिळवणारच. 





३४ टिप्पण्या:

  1. अप्रतिम सर, खरंच मिशन ऑनलाईन स्वराज्य मधून खूप साऱ्या उद्योजिका आपलं आस्तित्व निर्माण करत आहेत. योग्य वातावरण आणि योग्य मार्गदर्शन यामुळे हे सहज साध्य होत आहे.
    तुमच्या कार्यास सलाम आणि खूप खूप शुभेच्छा 🙏
    धन्यवाद

    उत्तर द्याहटवा
  2. खुप छान सर
    अगदी खरे आहे....
    योग्य मार्ग दर्शन, योग्य वातावरण, आणी सातत्याने केलेल्या योग्य कृती..आयुष्यात कितितरी आमुलाग्र बदल घडवून आणतात...

    आणि हे बदल तुमच्या मार्गादशना मधून आमच्या मधे होत आहेत,
    Online स्वराज्य उभारण्यासाठी लागणारी सर्व technical skill पासुन आपले स्वतहाचा व्यक्तिमत्व विकासा साठी आवश्यक चांगल्या सवयी,
    त्याच बरोबर एक उद्योजीका घडण्यासाठी लागणारे मार्गदर्शन ...सर्व काही तुमच्या कडुन मिळतेय आणी आमचे खर्या अर्थाने स्वराज्य उभे राहतेय व अस्तीव निर्माण होतय

    आज प्रभावी संभाषण कौश्यल्य जमतेय, चांगले वीडियो बनवता येऊ लागले आहेत, चांगले ब्लॉग लिहता येऊ लागले ...आणी माझ्या क्षेत्रात त्यामूळे 10 पटीने प्रगती होते आहे.
    आणि त्याच बरोबर वेळचे, निवडीचे व त्याच बरोबर आर्थिक स्वातंत्र मिळतेय

    Thank you so much sir

    उत्तर द्याहटवा
  3. अगदी अप्रतिम ब्लॉग लिहिला आहे सर, खूप छान मार्गदर्शन केले आहे, त्यामुळेच आम्ही Lady Boss झालो आहे

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. नमस्कार केतन सर...
      तुम्ही मला गुरू मिळाले आणि माझ्या आयुष्यात कायापालट झाला...!
      मी एक खेडेगावातली आणि चाळिशीनंतर ची महिला..
      फेसबुक कसं हॅण्डल करायचं हे मला माहिती नव्हतं...
      टेक्नॉलॉजीमध्ये मला काहीच कळत नव्हतं...
      काहीतरी करायचं आहे... पण नेमकं काय करायचं हेच कळत नव्हतं.
      केतन सर... तुम्ही माझं शून्यातून विश्व निर्माण केलं
      तुमच्या कम्युनिटीमध्ये मला असंख्य मित्र-मैत्रिणी मिळाले
      सकारात्मक वातावरण मिळालं
      सकारात्मक दृष्टिकोन मिळाला
      माझं योग्य ध्येय निश्चित झालं
      आणि मला त्याच्या दिशेने तुम्ही मार्गदर्शन केलं आणि करत आहात मी खूप काही शिकले आणि शिकत आहे मला माझ्या गावातील महिला मैत्रिणी नातेवाईक हे सर्व आश्चर्यचकीत होऊन विचारतात की तुझ्यामध्ये एवढा बदल कसा झाला तर मी त्यांना अभिमानाने सांगते की मला मिशण online स्वराज्याने घडवले...
      धन्यवाद केतन सर..
      मी तुमचे खूप खूप आभारी आहे...!

      हटवा
  4. अप्रतिम सर thanku thanku so much sir जबरदस्त transformation घडवून आणत आहात आमच्यामध्ये
    अभि तो नापी है मूठठीभर जमीन अभी तो सारा आसमान बाकी है🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍

    उत्तर द्याहटवा
  5. सर माझ्यासारख्या अशा कितीतरी महिला घरी आहेत त्या महत्त्वकांक्षी आहे त्यांना खूप काहीतरी करायचं आहे तुम्ही हा ब्लॉग लिहिला आहे तो महिलांसाठी अतिशय उपयुक्त आहे हा ब्लॉग वाचून महिलांनी खरंच निर्णय घेतला तर त्यांच्या आयुष्यात नक्कीच बदल होईल हे माझ्या अनुभवाचे बोल आहेत केतन सरांसारखे गुरु मिळणे म्हणजे आपलं भाग्य...
    असे गुरु मिळणे फार दुर्मिळ आहे सर...!
    धन्यवाद...!!

    उत्तर द्याहटवा
  6. खूप जबरदस्त ब्लॉग लिहिला आहे सर... खरच जबरदस्त results येत आहेत....

    उत्तर द्याहटवा
  7. नमस्कार सर अप्रतिम ब्लॉग लिहिला आहे खरंच सर मिशन ऑनलाइन स्वराज्य मध्ये आल्यापासून माझ्यामध्ये खूपच चांगले बदल झाले. अनेक टेक्नॉलॉजी शिकले या जगाची नव्याने ओळख झाली. तुम्ही म्हणता ते खरं आहे होळीचे धक्का मारण्याची गरज असते तसं तुमच्या मार्गदर्शनामुळे आमचे आयुष्य उजळत निघाले तुमचा हा ब्लॉग अनेक उद्योजकांना मार्गदर्शक ठरेल. सर्व इमेजेस खूप सुंदर आहेत. धन्यवाद सर 🙏🙏👍👏👏

    उत्तर द्याहटवा
  8. वा सर,
    खूपच मार्मिक लिहिलंत.
    प्रत्येक सखीच्या मनातल्या अव्यक्त भावना आहेत या.
    आम्हीं खरंच खूप नशिबवान आहोत, तुमच्यासारखे गुरू आम्हांला मिळाले. माझ्या सारख्या कितीतरी जणींच्या आयुष्यात तुम्हीं आकांक्षेची नवी ज्योत पेटवलीत. ज्यामुळे आमचं जीवन प्रकाशमान झालंच, पण आम्हीं ही इतरांना जगायला बळ द्यायला शिकलो.
    तुम्हीं जो हा वसा घेतला आहे, तो पूर्ण करण्यासाठी आम्हीं सगळ्या लेडी बॉस तुमच्या सोबत कायम राहू.
    God bless sir

    उत्तर द्याहटवा
  9. अप्रतिम ब्लॉग लिहिला आहे.तुमच्या योग्य मार्गदर्शनामुळे आमच्या आयुष्यात झालेले बदल हे आम्ही आणि आमचे सहकारी आमचे नातेवाईक बघत आहेत.प्रत्येकाला पडलेला प्रश्न की इतका बदल कसा काय होऊ शकतो पण हे खर आहे ऑनलाइन स्वराज्य मध्ये आल्यामुळे आमच्या आयुष्यामध्ये बरेच काही बदल झालेले आहेत आम्ही टेक्नॉलॉजीचे एक्सपर्ट झालेलो आहोत आम्ही ब्लॉगर झालेलो आहोत आम्ही युट्युब वर आहोत आणि आम्ही एक गृहिणी सुद्धा आहोत.. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्ही एक यशस्वी उद्योजिका सुद्धा आहोत.. ऑनलाईन स्वराज्य मध्ये आल्यापासून आमच्या पंखात बळ आले आहे आम्ही आता गरुड झेप घेतली आहे.. आणि हा सकारात्मक विचार फक्त केतन सरांमुळे आलेला आहे. यासाठी मी केतन सरांचे खूप खूप धन्यवाद मानते..🙏🙏

    उत्तर द्याहटवा
  10. खूप धन्यवाद सर. तुमच्यामुळेच ऑनलाइन स्वराज्य मध्ये आल्यापासून स्वताची एक नवीन ओळख निर्माण करू शकले. खूप प्रचंड आत्मविश्वास आला आहे मी आता एक ब्लॉगर पॉडकास्ट आणि युट्युब व्हिडीओ बनवते. नवनवीन व्यक्तींच्या मुलाखती घेत आहे. खूप अमुलाग्र बदल माझ्यामध्ये घडलेला आहे. आणि याचा उपयोग इतरही महिलांना नक्कीच झाला पाहिजे. प्रत्येक स्त्रीमध्ये एक लेडी बोस दडलेली असते. तिच्या क्षमता आणि कौशल्य ओळखून तुम्ही ते बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. तुमच्या कार्याला खूप सलाम. ब्लॉग अतिशय सुंदर.

    उत्तर द्याहटवा
  11. मी एक उद्योजिका आहे करोना या परिस्थितीमध्ये डिस्टर्ब् झाली होती ऑनलाईन स्वराज्य मिळाल्यामुळे जबरदस्त ताकद आली आहे ऑनलाइन व्यवसाय करू शकतो याची जाणीव आपल्या कोर्स मुळे मिळाली आहे, ब्लॉग अतिशय सुंदर लीहीला आहे

    उत्तर द्याहटवा
  12. Khup chaan lihile sir... Sarv goshti paishat nhi milu shakt.. Changle vichar ani vatawaran tumcya kdun milale.. Thank u

    उत्तर द्याहटवा
  13. Sir,
    Really appealing because women are much more multitasking than men inspite of all the sacrifices which they do for the family. They land up with tricky situations after some point and get stuck up with lack of guidance. Online swarajya community and you are doing the same to get the inner qualities out and encourage all of them to build the confidence of all the women. Blog is great and explains the real fact and the way to get out the situation.

    उत्तर द्याहटवा
  14. Sir. We are ladies after 40 are the perfect students for you. After a certain stage we realise that even we can do equally good in professional life in our own way and prove ourselves to boost our confidence. To remove that inferiority complex from our mind. And we can get it only by going out of our comfort zone and doing something of your liking as per our skills. Ladies are always ready to learn from others. They keep their egos aside and follow the path shown by their guru. I have also done the same in my life. At the age of 43 I left my comfortable bank job and started my own real estate. Consultancy just to prove myself. I had to learn everything on my own but of other ladies gets a guidance from guru like you they can succeed faster and their journey will also be smooth. Best of luck to all your lady boss students which I am sure will do wonders under your able guidance. Thank you.

    उत्तर द्याहटवा
  15. Sir, we all all know women are much more multitasking than men. The sacrifices which they do for the family go very much unnoticed as it is taken as responsibility of that housewife and has to do it at any given circumstances. But you have rightly pointed out at one stage she wants to break up out of this whirl but due to lack of guidance cannot move out.Here in the Online swarajya family proper guidelines and the support you render extracts out the inner qualities. Thank you .

    उत्तर द्याहटवा
  16. नमस्कार सर
    अतिशय सुंदर blog 👌
    सर्व स्त्रियांनी वाचावा असाच नव्हे तर पुरुषांनी सुद्धा.. पुष्याच्या यशामागे एक स्त्री जशी खंबीरपणे उभी असते तसेच स्त्री च्या यशामागे पुरुष सुद्धा खंबीर उभे असतात.
    तुम्ही आम्हांला मार्गदर्शन करून आमच्यातील ledy boss बाहेर काढलात.
    असेच हजरो..... लाखो स्त्रियाच्या आयुष्यात बदल
    घडवून त्या सुद्धा ledy boss बनव्यात 🙏🙏🙏🙏🙏
    पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा सर 🙏.

    उत्तर द्याहटवा
  17. सर नमस्कार
    अप्रतिम प्रेझेंटेशन. प्रत्येकाला स्वतःची ओळख करून देऊन त्यांचा कॉन्फिडन्स कसा वाढवावा हे आपल्या कडूनच शिकावे. आपल्याला आपल्या कार्यात भरघोस यश मिळो आणि जास्तीत जास्त लोकांना आपल्या ज्ञानाचा फायदा होवो. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सर.

    उत्तर द्याहटवा

आयुष्यावर प्रभुत्व मिळवण्यासाठी स्वतः वर प्रभुत्व मिळवा - ह्या मूलभूत गोष्टींवर काम करा

आयुष्य हातातून चाललंय असं तुम्हाला वाटतं का ? तुमच्या सवयींवर तुमचा ताबा नाही असं तुम्हाला वाटतं का? सतत चिडचिड होते का ? तुमची करिअर कुठेत...