मंगळवार, २ फेब्रुवारी, २०२१

आपण खरंच रिटायर व्हायचं का?


 आपण खरंच रिटायर व्हायचं का?


आज सकाळी मी माझा रोजचा मॉर्निंग वॉक करण्यासाठी दादरच्या नारळी बागेत गेलो होतो.

साधारणतः पाच सहा वर्षापासून मी तिकडे वॉकसाठी जातो.

सकाळी लवकर येणाऱ्यांसाठी नारळीबाग म्हणजे आमची प्रायव्हेट प्रॉपर्टीच.

सकाळी सहा सातच्या दरम्यान ह्या तीन एकरच्या बागेत आम्ही ठरलेले दहा-बारा लोकच असायचो.

मी सोडून सगळे सीनियर सिटीजन.

प्रचंड शांतता,सुंदर वातावरण,भरपूर हिरवळ आणि नारळाची झाडं.

आमच्या पाळीव खारी आणि समोर अथांग अरबी समुद्र...... कोणत्याही व्यत्ययाशिवाय मेडिटेशन व्हायचं.

करोनानंतर मात्र परिस्थिती खूप बदलली आहे.

COVID 19 ने सगळ्यांनाच खूप जास्त हेल्थ कॉन्शस बनवलय.

कित्तेक होतकरू फिटनेस ट्रेनर आणि योगा शिक्षक हे सकाळी त्यांच्या बॅचेस घेण्यासाठी हल्ली नारळीबागेत येऊ लागले आहेत.

कोलंबसला अमेरिका सापडल्यावर युरोपियन लोकांनी अमेरिकेवर आक्रमण केले तसेच शेकडो लोक सकाळी नारळीबागेत येऊ लागले आहेत आणि आम्ही बारा जण त्या रेड इंडियन्सना काय वाटलं असेल, याचा अनुभव घेत आहोत.
गंमत खूप झाली आता मूळ मुद्द्यावर येतो.

आज मला बऱ्याच दिवसांनी आमच्या एक रेग्युलर वाकिंग मेंबर नयना पटेल ( नाव काल्पनिक) भेटल्या.

वय सत्तावन्न वर्षे, उत्तम फिटनेस , सतत हसतमुख चेहरा आणि आर्थिक सुबत्ता उच्च मध्यमवर्गीयांपेक्षा चांगली.

मी त्यांना विचारलं 'बेन हल्ली दिसत नाही तुम्ही?'

त्यावर त्यांनी मला सांगितलं 'अरे मी संध्याकाळी माझ्या टेरेस वरच वॉल्क करते ,सकाळी थोडा योगा वगैरे करते आणि हल्ली सगळं वाइंड अप करायला घेतलय ना.

त्यांच्या त्या वाक्याने मी थोडा दचकलो आणि विचारलं, 'का बरं?'

त्यावर त्या म्हणाल्या, आता मी ५७, मिस्टर ६० प्लस, मुलगा अमेरिकेत असतो , सून सिंगापूरला , दोघंही बक्कळ पैसे कमावतात आणि आम्हांला आता काही करण्याची गरज नाही, त्यामुळे हळूहळू सगळं आवरतं घेतोय.

माझं त्यांनी बिझनेस वाईंड अप करण्याबद्दल काहीच ऑब्जेक्शन नव्हतं, पण त्यांचा सूर हा आयुष्यातूनच वाईंड अप करण्यासारखा जाणवत होता.

मी त्यांना माझ्या बाजूला बसायला सांगितलं आणि त्यांना पहिला प्रश्न विचारला,

'तुम्ही IKIGAI पुस्तक वाचले आहे का?'

त्यांनी उत्तर 'नाही' असं दिलं.

मग मी त्यांना इकिगाई समजावलं आणि त्यांच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला.

आमच्या संवादातून त्यांना फायनान्समध्ये काम करायला आणि भावी पिढीला आर्थिक नियोजन करायला मदत करणं आवडतं हे लक्षात आलं.

मग मी त्यांना सिक्रेट्स ऑफ द मिल्यनेअर माईन्ड या पुस्तकाबद्दल सांगितलं आणि त्या किती जबरदस्त कॉन्ट्रीब्युशन करू शकतात याची जाणीव करून दिली.


त्या क्षणाला मला त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक जाणवली.

आता त्यांच्या बोलण्यात मला आत्मविश्वास जाणवत होता.

मग माझ्याकडे बघत त्या म्हणाल्या ' तू खूप छान काम करत आहेस, कीप इट अप बेटा'

मी ती कौतुकाची थाप स्वीकारत त्यांना 'आज माझ्या उर्वरित आयुष्याचा पहिला दिवस आहे, या आत्मविश्वासाने जगा, तुम्हाला अजून पन्नास वर्ष जगायचं आहे , जग बदलायचं आहे ' हा डायलॉग मारला आणि स्टाइल मारत तिथून निघालो.



आणखीन एका लेडी बॉसच्या मावळणाऱ्या दिव्यामध्ये आशेच्या तेलाचं आंदण घालत मी समाधानाने पुढे निघालो .

देवाने मला दिलेल्या कामाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आनंदाने बाईकला किक मारली.

कळत नकळत आपण आपलं पॅशन २४ तास जगत असतो, याची मला जाणीव झाली.

नयना पटेल आणि तुमच्यासारख्या सगळ्या लेडी बॉसना माझा मानाचा मुजरा.

तुम्हाला देखील लेडी बॉस २०२१ व्हायचं असेल तर आमचा टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करा 

३५ टिप्पण्या:

  1. वा सर
    अप्रतिम ब्लॉग
    तुमच्या कार्याला आमचा सलाम

    उत्तर द्याहटवा
  2. Keep going sir...आज तुमच्या सारख्या सराची तरुण
    मंडळीना गरज आहे...

    उत्तर द्याहटवा
  3. अतिशय सुंदर Blog.
    Experience शेअर करून सगळ्यांच्या डोळ्यासमोर चित्र उभे करून वस्तुस्थिती, specifically स्त्रियांच्या मनातले विचारांना नवीन उमेद दिल्याबद्दल Thank you very much🙏

    उत्तर द्याहटवा
  4. She may be retired from earning for life, but not Life...
    She will live her life now.
    Great Service sir.

    उत्तर द्याहटवा
  5. किती छान 👌👌👌

    खुप सुंदर लिहलिय सर...प्रतेक ओळ वाचताना सहज हसू येतेय चेहर्यावर...

    किती मह्त्वाच पण सोप्या आणि सहज शब्दात लिहले आहे...
    मन प्रसन्न झाले....अगदी..

    असे वाटत होते वाचतच रहावे संपूच नये...

    उत्तर द्याहटवा
  6. Very nice blog, aaj k bzy waqt may sir aap hamare liye time nikalty hai. Hame motivate karty hai, it's really appreciated 😊🙏thank u so much sir

    उत्तर द्याहटवा
  7. खूप छान सर ! title खूप प्रभावी . नुसते ते वाचून मला माझ्या ओळखीमधले सगळे रिटायर्ड झालेले काका मावश्या आठवल्या आणि त्या काय करू शकतात हे डोळ्यासमोर चित्र आले . मस्त ! Keep working on this . God bless you!

    उत्तर द्याहटवा
  8. खूप छान सर अगदी चित्र आमच्या डोळ्यासमोर उभा राहिला ते नारळीबाग त्या नयना पाटील आणि तुमच्या दोघां मधला झालेला संवाद असंच काही आमच्या आयुष्यात तुम्ही घडवून आणल्या त्याबद्दल तुमचे खरच खूप खूप मनापासून धन्यवाद💐🙏🙏

    उत्तर द्याहटवा
  9. Sir I am going through the same stage as my husband wants to wind up or go slow on his business and stay out of Mumbai. But I am not ready to leave my established business through which I am enjoying helping people find their dream home. After. Reading your blog I got clarity that I should do what I am enjoying. Thank you sir. Please keep helping us get clarity and showing us a path way forward.

    उत्तर द्याहटवा
  10. खुपच छान. मनात काहीतरी करायचंय अशी उर्मी उर्जा नसेल तर खरच आयुष्य व्यर्थ वाटेल. तुमच्या कार्याला सलाम..

    उत्तर द्याहटवा
  11. अप्रतिम सुंदर सर सलाम आहे तुमच्या या कार्याला.एका मावळत्या विचाराला लख्ख प्रकाशाकडे नेणारा आशेचा किरण दिलात.🙏🙏🙏🙏🙏👏👏

    उत्तर द्याहटवा
  12. अतिशय सुंदर.आपल्यातील ikagai शोधली की आपण 24तास आपल्या passion मध्ये असतो .great and thank you sir

    उत्तर द्याहटवा
  13. Khup chhan aahe...mi pan tase honyacha sankalp kela aahe...te Karen tyaweli tumhala phon karen..

    उत्तर द्याहटवा
  14. खूपच सुंदर अनुभव सर....वाचताना डोळ्यासमोर चित्र उभं राहिलं....खूपच उपयुक्त ब्लॉग....धन्यवाद सर....🙏🙏🙏

    उत्तर द्याहटवा
  15. खूपच सुंदर ब्लॉग लिहिला आहे सर
    खूप खूप धन्यवाद..!

    उत्तर द्याहटवा
  16. खूप सुंदर. तुमचा ब्लॉग वाचून असे वाटते ना की आपण physically कितीही थकलो असलो तरी मनाने नेहमी तरुण राहिलो तर मी आता रिटायर होतोय असे कधीच म्हणु शकणार नाही. आणि त्यातूनही तुम्ही सगळ्यांना इतकी सुंदर प्रेरणा देताय ना की no words to say thank you sir ji

    उत्तर द्याहटवा
  17. खूपच छान माणसाला आयुष्यात प्रेरणा खूप महत्त्वाची असते. त्या प्रेरणेने माणसाच्या आयुष्यात काहीतरी करण्याची ऊर्जा निर्माण होते.
    धन्यवाद सर खुप छान कार्य आपल्या हातून संपन्न होत आहे.

    उत्तर द्याहटवा
  18. Urvarit ayushyacha pahila divas...wah...kharach chhan concept...Mast...feeling refreshed...👍

    उत्तर द्याहटवा
  19. सर खूपच मस्त ब्लॉग सगळ्या लेडी बॉस ना आपली इकिगाई शोधून आपल्या भविष्यातील प्रवास सुकर होण्यासाठी हा ब्लॉग खूपच उपयुक्त आहे धन्यवाद सर

    उत्तर द्याहटवा

आयुष्यावर प्रभुत्व मिळवण्यासाठी स्वतः वर प्रभुत्व मिळवा - ह्या मूलभूत गोष्टींवर काम करा

आयुष्य हातातून चाललंय असं तुम्हाला वाटतं का ? तुमच्या सवयींवर तुमचा ताबा नाही असं तुम्हाला वाटतं का? सतत चिडचिड होते का ? तुमची करिअर कुठेत...