सोमवार, ८ फेब्रुवारी, २०२१

आयडियाची कल्पना ,कल्पनेतून आयडिया-तुमची कल्पकता वापरून भविष्य बदलण्याच्या तीन सोप्या युक्त्या.



प्रत्येक गोष्ट दोनदा होते , अगोदर कल्पनेत आणि मग अस्तित्वात.

 जाणीवपूर्वक कल्पनाशक्तीचा योग्य वापर करून आपण आयुष्यातल्या बऱ्याच गोष्टींना वेगळी कलाटणी देऊ शकतो.

कल्पनाशक्तीचा वापर करून स्वतःचे भविष्य बदलण्याच्या तीन सोप्या युक्त्या समजून घेण्यासाठी हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की वाचा.

नमस्कार! माझं नाव केतन गावंड ,ऑनलाइन स्वराज्यसारथी, मिशन ऑनलाईन स्वराज्य ह्या प्लॅटफॉर्मचा संस्थापक. 


 येत्या तीन वर्षात एक लाख ऑनलाईन स्वराज्य उभारायला मदत करणे हा माझा ध्यास. 

चला तर मग सुरुवात करूया. 

आपल्याकडे एक म्हण खूप प्रचलित आहे 'मन चिंती ते वैरी न चिंती'

 आपण स्वतःबद्दल जितका वाईट विचार करतो तितका कदाचित आपले वैरी देखील आपल्याबाबत करत नाहीत. 

अनादिकालापासून आपल्या अंतर्मनाला, अस्तित्व ( जीव )  वाचवण्यासाठी सगळ्यात वाईट गोष्टीची चिंता आधी करण्याची  सवय लागलेली आहे. 



सत्य परिस्थिती ही आहे की ,स्त्रियांना नकारात्मक विचार करण्याची मूलभूत प्रेरणा पुरुषांपेक्षा थोडी जास्तच असते. 

कळत नकळत आपण वाईटाची संभावना सगळ्यात आधी व्यक्त करतो आणि आकर्षणाच्या सिद्धांताने  त्यालाच आपल्या आयुष्यात आकर्षित करतो. 

हे जर टाळायचे असेल तर सजगतेने काही गोष्टी जाणीवपूर्वक कराव्या लागतील  आणि मगच आपण आपल्या अंतर्मनाला ऑटोमॅटिक निगेटिव्ह थिंकिंग पासून परावृत्त करू शकू. 


फळं बदलण्यासाठी मुळं  बदला. 


मी माझ्या ट्रेनिंग मध्ये नेहमी सांगतो, 

  • तुमच्या विचारांतून शब्द, 
  • शब्दातून कृती, 
  • कृतीतून सवयी, 
  • सवयीतून व्यक्तिमत्व आणि 
  • व्यक्तिमत्त्वातून भविष्य घडत असते. 

मग जर आपल्याला भविष्य बदलायचं असेल तर जाणीवपूर्वक विचार बदलण्याची गरज आहे. 

ऑटो सजेशनने  जाणीवपूर्वक आपल्या अंतर्मनाला काही चांगल्या सकारात्मक शब्दांची परत परत आठवण करून देणे ,आपल्या ध्येयाची सातत्याने चर्चा करणे हे अतिशय महत्त्वाचे आहे. 

विचार रुपी मुळं बदलली की परिणाम रुपी फळं आपोआप बदलतील . 

वातावरण बदला


आजपासून पाच वर्षानंतर तुम्ही कुठे असणार हे दोनच गोष्टींवर अवलंबून आहे, तुम्ही कोणती पुस्तके वाचता आणि कोणाबरोबर राहता. 

तुम्हाला जे हवे तिथे पोहोचण्यासाठी मदत करणाऱ्या लोकांच्या सतत संपर्कात राहून तुम्ही तुमची विचारधारा बदलू शकता. 

वैचारिक वातावरण बदलून तुम्ही तुमची विचारधारा बदलू शकता. 

तुमच्या आयुष्यात जे काही प्रॉब्लेम आहेत ते एका विशिष्ट प्रकारच्या विचारसरणीमुळे निर्माण झालेले आहेत  आणि बरेच वेळा ही विचारसरणी आपण कोणत्या व्यक्तीच्या आजू बाजूला राहतो त्यावर प्रामुख्याने अवलंबून असते. 

आपल्याला कोणताही महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असेल ,कोणतीही जास्त किमतीची वस्तू विकत घ्यायची असेल तर आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांशी चर्चा केल्याशिवाय तो निर्णय घेत नाही. बहुतांशी हे लोक बदलले की निर्णयदेखील बदलतात. 

पुस्तकांबरोबर माझं एक वेगळंच नातं आहे


गेल्या वीस वर्षात कदाचित असा एकही दिवस असा नसेल की मी कमीत कमी एक तास काहीतरी नवीन वाचलं  नाही. 

ह्या वाचनाच्या सवयीमुळे माझ्या विचारांवर  प्रचंड परिणाम झाल्याचा मला अनुभव सातत्याने येत राहतो. 

 तुम्ही देखील सकारात्मक विचारसरणीसाठी self-development ची पुस्तकं वाचून तुमच्या वैचारिक पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल घडवू शकता. 

मिशन ऑनलाइन स्वराज्य ह्या आमच्या कम्युनिटीमध्ये दर मंगळवारी आणि गुरुवारी जगद्विख्यात पुस्तकं समजून घेऊया मराठीतून ही सिरीज आम्ही गेले चार महिने चालवत आहोत आणि त्या माध्यमातून 25 पेक्षा जास्त पुस्तकांची चर्चा आम्ही केलेली आहे. 


2021 या वर्षात कमीत कमी शंभर व्यक्तिमत्व विकासाची पुस्तकं चर्चिली जाणार आहेत. 

तुम्हाला देखील यात सहभागी होऊन स्वतःला अपग्रेड करायचं असेल तर मिशन ऑनलाइन स्वराज्य हा ६००० समविचारी व्यक्तींचा समूह तुम्ही नक्की जॉईन करू शकता

ध्यानानंतर सकारात्मक परिणामांचा विचार करा.


स्वामी विवेकानंद म्हणतात, 'जेव्हा आपण प्रार्थना करतो, तेव्हा आपण देवाशी बोलतो, पण जेव्हा आपण ध्यान करतो तेव्हा आपण देवाचं ऐकतो'. 

ध्यान करताना ज्यावेळी आपलं सगळं लक्ष श्वासावर केंद्रित करतो त्यावेळी अचानक आपलं मन शांत झाल्याचा अनुभव आपल्याला येतो. 

मनातले सगळे विचार निवळू  लागतात आणि आपल्या अंतर्मनाचा तळ आपल्याला दिसू लागतो. 

आपलं मन एखाद्या कोऱ्या कॅनव्हास पेपर सारखं होतं आणि मग त्यावर तुम्हाला जे रंग हवे ते तुम्ही जाणीवपूर्वक भरू शकता. 


साधारणतः दहा ते बारा मिनिटं ध्यान केल्यानंतर जेव्हा ही अनुभूती तुम्हाला येईल तेव्हा तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टींचा जाणीवपूर्वक विचार करायला सुरुवात करा म्हणजे त्याचे पडसाद तुमच्या मनावर उमटलेले तुम्हाला येत्या काळात दिसून येतील. 

तात्पर्य आपल्या कल्पनाशक्तीला जाणून-बुजून सकारात्मक विचार करण्याची सवय लावणे अत्यंत आवश्यक आहे. 

आयुष्याचे अवलोकन केल्यानंतर लक्षात येते की आपल्या 99% चिंता कधीच अस्तित्वात येत नाहीत. 

योग्य लोकं, योग्य पुस्तकं , योग्य सवयी व सकारात्मक ध्यानाच्या  मदतीने आपण आपल्या कल्पनाशक्तीला सकारात्मक सृजनशील बनवून तिला आपली सगळ्यात मोठी ताकद बनवू शकतो. 

तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट द्वारे नक्की कळवा. 

तुमच्या सारख्या असंख्य महिलांना ह्या नकारात्मकतेच्या  वेढ्यातून बाहेर काढून आनंदी ,सकारात्मक व अर्थपुर्ण आयुष्य जगण्यास मदत करण्यासाठी मी लेडी बॉस 2021 या लाईव्ह वर्कशॉप ची सुरुवात केली आहे. 


तुम्हाला यामध्ये सहभागी व्हायचे असेल तर इमेज वर क्लिक करा आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. 

ऑनलाईन स्वराज्य हा आपल्या सगळ्यांचा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि आपण तो मिळवणारच!



४७ टिप्पण्या:

  1. वा सर, अतिशय सुंदर ब्लॉग
    आणि thank you, तुम्हीं कितीतरी दिशाहीन महिलांना जीवनाकडे बघण्याची नवीन दृष्टी देताय.
    God bless💐🙏💝

    उत्तर द्याहटवा
  2. खुपच छान ब्लॉग सर

    नेहमी मी ऐकायचे की आपले भविष्य आपण रचू शकतो...
    आपली स्वप्न आपण पुर्ण करू शकतो...

    पण त्या साठी काय करावे लागते हे खरच माहित नव्हते...

    ओनलाईन स्वराज्य मधे आल्या नंतर...खरच स्वप्नांच रूपांतर धेयात झाले....
    ती धेय मिळवण्यासाठी..तुमचे मार्गदर्शन मिळाले..
    चांगले विचार , योग्य कृती आणि अतिशय सकारात्म वातावरण मिळाले.

    Nothing is impossible...हे आपण ऐकतोच...
    But what is possible for me हे फक्त तुमच्या मुळे कळाले सर..
    आयुष्या कडे बघण्याचा नव सकारात्म दृष्टीकोन मिळाला.
    आणी आहे त्या परिस्थीत किती नविन संधी आपल्या साठी आहेत
    ते पाहू शकले...
    आणि त्यातूनच सुंदर भविष्य घडवण्या ची वाटचाल करत आहे..

    Thank you so much sir
    Thank you so much mission online स्वराज्य

    अतिशय प्रेरणादायी blog


    उत्तर द्याहटवा
  3. खुप सुरेख लेख लिहिला आहे ... thank you very much...नक्की share करते

    उत्तर द्याहटवा
  4. Waa sir खूप सुंदर blog. आपल्या मनावर जमलेली धूळ आपणच झटकून टाकू शकतो. योग्य विचार आणि निर्णय घेण्या ची क्षमता तुमच्या मध्ये आली की अर्धे यश तिथेच मिळते. तुमचे blogs वाचून मनाला एक वेगळी energy मिळते हे नक्की.

    उत्तर द्याहटवा
  5. खूप सुंदर ब्लॉग सर, अगदी सत्य आहे. मनात जसे विचार असतात तसेच घडते. It's a law of attraction. आपल्या सोबत जे काही घडत त्याला कारणीभूत आपण असतो आपले विचार असतात. आपल्याच मनात चांगल्या विचारांचा चष्मा लावला की जग सुंदर दिसत आणि छानच घडत. Thank you so much sir🙏, तुमचे ब्लॉग वाचून powerful आणि energetic वाटतं.

    उत्तर द्याहटवा
  6. एखाद्या भरकटलेल्या व्यक्तिमत्त्वाच्या जीवनाला कलाटणी देणारा हा लेख

    उत्तर द्याहटवा
  7. Blog खूप छान सर गेल्या 10 महिन्यात आमच्यामध्ये जी सकारात्मकता आणून आम्हाला अंतर्बाह्य बदलून टाकलात त्याप्रमाणेच भविष्यात आणखी हजारो स्त्रियांच्या आयुष्यात सकारात्मकता आणण्यासाठी आणि त्यांचे ऑनलाईन स्वराज्य मिळविण्यासाठी तुमची खूप मोठी मदत होणार आहे याची आम्हाला खात्री आहे खूप खूप धन्यवाद सर 🙏🙏

    उत्तर द्याहटवा
  8. अप्रतिम sir आपल्याला आपल्याला जीवनाकडे सकारात्मक कसे बघायचे तेच तुम्ही perfect मांडले आहे धन्यवाद 🙏🙏👍👍

    उत्तर द्याहटवा
  9. अतिशय माहितीपूर्ण लेख वाचून खूप बरं वाटलं सर

    उत्तर द्याहटवा
  10. आयडियाची कल्पना.फार सुदंर रित्या तुम्ही वातावरण, ध्यान आणि पुस्तकाचं वाचन ह्या उपायांनी आपली विचार कसे बदलता येईल हे सांगितलं आहे. अप्रतिम

    उत्तर द्याहटवा
  11. फारच सुंदर लेखन.. अंतर मनाला सकारात्मकतेकडे घेऊन जाण्याची ऊर्जा स्वतः मध्ये तयार करता आली पाहिजे त्यासाठी सतत स्वतःला सकारात्मक लोकांच्या सानिध्यात ठेवण्याची कल्पना इथे सरांनी मांडली आहे..त्याच बरोबर सेल्फ डेव्हलपमेंट वर जास्तीत जास्त पुस्तकांचे वाचन केले पाहिजे..

    उत्तर द्याहटवा
  12. खरंच आहे सर . आयडियाची कल्पना . या डोक्यातील कल्पना प्रत्यक्षात राबविण्यासाठी योग्य वेळी कृती , योग्य वातावरण , योग्य संगती खूप आवश्यक ठरतात .

    उत्तर द्याहटवा

आयुष्यावर प्रभुत्व मिळवण्यासाठी स्वतः वर प्रभुत्व मिळवा - ह्या मूलभूत गोष्टींवर काम करा

आयुष्य हातातून चाललंय असं तुम्हाला वाटतं का ? तुमच्या सवयींवर तुमचा ताबा नाही असं तुम्हाला वाटतं का? सतत चिडचिड होते का ? तुमची करिअर कुठेत...