रविवार, ४ एप्रिल, २०२१

ध्येय निश्चिती आणि त्याचे चार जबरदस्त फायदे

 


इंग्लिश मध्ये एक खूप सुंदर म्हण आहे

When the destination is clear decisions automatic



जेव्हा जायचं कुठे हे स्पष्टपणे माहिती असतं तेव्हा निर्णय घेताना जास्त विचार करण्याची गरज पडत नाही.

प्रत्येक क्षणी आपल्या सगळ्यांच्या समोर दोन पर्याय असतात ,एक जो आपल्याला आपल्या ध्येयाकडे घेऊन जातो आणि दुसरा जो आपल्याला आपल्या ध्येयापासून लांब घेऊन जातो.

ज्या व्यक्तींकडे त्यांचे ध्येय अस्पष्ट असते , ते बहुतांशी तोच मार्ग निवडतात जो त्यांना त्यांच्या ध्येयाच्या आणखीन जवळ घेऊन जातो.

दुर्दैवाने 98 टक्के लोकांकडे स्पष्ट ठरवलेली आणि प्रेरणा देणारी अशी निश्चित ध्येय नसतातच आणि म्हणून ते आयुष्यात बराच काळ समुद्राच्या प्रवाहात पडलेल्या एखाद्या ओंडक्याप्रमाणे वाहत राहतात आणि लाट येईल त्या किनाऱ्याला पोहोचत राहतात.

तुम्हाला देखील अजून स्पष्ट ध्येय असण्याचं महत्त्व पटलेलं नाही आहे का तर मग हा ब्लॉग तुमच्यासाठीच आहे.

नमस्कार माझं नाव केतन गावंड, गेल्या तेरा वर्षापासून मी अडीच लाख पेक्षा जास्त प्रशिक्षणार्थींना ध्येय निश्चितीचे महत्व शिकवत आलो आहे.

आज पासून मी तुम्हाला ध्येयनिश्चिती का महत्त्वाची आहे, तुमचे ध्येय कसे असावे ,ते पूर्ण करण्यासाठी काय काय करावे अशा वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन करायला सुरुवात करणार आहे.

चला तर मग सुरुवात करुया.

रिसर्च असं सांगतो की स्पष्ट हे असणाऱ्या लोकांची अचीवमेंट ध्येयं नसणाऱ्यांपेक्षा 275 टक्के जास्त असते. मला वाटतं हे एकच कारण आपल्याला ध्येय निश्चिती करण्यासाठी प्रवृत्त करणारे आहे ,तरीपण आपण आणखी थोडं खोलात जाऊ या.

१-ध्येयनिश्चितीमुळे आपण जास्त चांगले बनतो



कल्पना करा की तुम्ही आज पॉईंट A ला उभे आहात आणि तुम्हाला पॉईंट B ला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचायचं आहे.


पॉईंट A आणि पॉइंट B ह्याच्या मधली दरी आहे ती मुख्यत्वे चार गोष्टींवर अवलंबून असते

-एकतर ज्ञानाची कमतरता आहे
-दृष्टिकोनाची कमतरता आहे
-कौशल्यांची कमतरता आहे किंवा
-सवयींची कमतरता आहे


जेव्हा निश्चित ध्येय ठरवून तुम्ही स्वतःमध्ये ज्ञान, दृष्टिकोन, कौशल्य आणि सवयी यांच्यात सुधारणा करायला सुरुवात करता तेव्हा तुम्ही जास्त सक्षम जास्त चांगले बनता .
२-ध्येय आपल्याला वेळेचे व्यवस्थापन करायला भाग पाडते


परीक्षेचा सगळ्यात चांगला अभ्यास टाईम टेबल डिक्लेअर झाल्यावर होतं कारण आता आपल्या डोळ्यासमोर ध्येय स्पष्ट असतं. वेळेचं उत्तम नियोजन करून आपण कामाला लागतो आणि बऱ्याच वेळेला आपलं ध्येय पूर्ण करण्यात यशस्वी होतो.

जसं हा नियम परीक्षेला लागू पडतो तसंच आयुष्यातल्या विविध ध्येयांनादेखील हा लागू पडतो . एकदा ध्येय ठरले आणि ते प्राप्त करण्याची तारीख ठरली की आपोआप आपण ॲक्शन मध्ये येतो आणि कमीत कमी वेळात जास्तीत जास्त मिळवण्यासाठी प्रयत्न करतो.

३- ध्येयामुळे आत्मविश्वास वाढतो


ध्येय आपल्याला नेहमी आशा देतात की आपला उद्या हा आजच्यापेक्षा चांगला असणार आहे. अचानक आपल्या वागणुकीत एक वेगळा आत्मविश्वास जाणवायला लागतो आणि आपण आयुष्यातल्या आव्हानांना जास्त चिकाटीने जास्त धैर्याने सामोरे जायला सुरुवात करतो.

मी माझ्या कारकिर्दीत अश्या असंख्य व्यक्ती बघितल्या आहेत ज्यांच्या आत्मविश्वासात फक्त ध्येय ठरवल्यानंतर प्रचंड वृद्धी झालेली आहे .

याउलट ज्या व्यक्तींकडे काहीही साध्य करण्याची ध्येय नसतात ते गलितगात्र होऊन हरवल्यासारखे जगत असतात ,म्हणून निश्चित अशी ध्येये ठरवा आणि आत्मविश्वासाने जगा.

४- ध्येयामुळे आपल्याला स्पष्टता मिळते


एकदा आपल्याला तीन वर्षात काय साध्य करायचं हे स्पष्ट असेल तर मग
-दोन वर्षात आपण कुठपर्यंत पोहोचायला पाहिजे
-वर्षभरात पर्यंत पोहोचायला पाहिजे
-सहा महिन्यात आपल्याला काय साध्य करायला लागेल
- तीन महिन्यात काय मिळवायला लागेल
- महिन्याभरात कुठपर्यंत आपली मजल गेली पाहिजे
-आठवडाभरात कुठपर्यंत पोहोचणं महत्वाच राहील


हे सगळे प्रश्न आपल्याला पडायला लागतात आणि एका निश्चित गेम प्लान ने आपण वाटचाल करायला सुरुवात करतो.

बऱ्याच व्यक्तींना आयुष्यात ही क्लारिटी नसते. दिवसभरात समोर येणारं , डोळ्यांना उत्तेजित करणारे किंवा मनाला हवहवसं वाटणारं कामकरण्यात त्यांचा दिवस निघून जातो.

जर ते नोकरीमध्ये असतील तर समोर वाढून ठेवलेलं काम करण्यात त्यांचं आयुष्य निघून जातं आणि मग अचानक मी नक्की काय करतोय हा प्रश्न त्याला पडायला लागतो.

याउलट स्पष्ट ध्येय असणारी व्यक्ती ही आपल्या ध्येयासाठी रोज जाणीवपूर्वक वेळ बाजूला करायला लागते आणि थोडं थोडं का होईना आपल्या ध्येयाच्या दिशेने प्रगती करत राहते.

तात्पर्य निश्चित ध्येय असणारी व्यक्ती आयुष्यात जास्त चांगली बनते, वेळेचे व्यवस्थापन करायला शिकते ,तिचा आत्मविश्वास वाढतो आणि एका स्पष्ट नियोजनाने ती आयुष्यात पुढे चालत राहते.

मला नक्की माहिती आहे की ह्या ब्लॉग मधून तुम्हाला ध्येय निश्चित करण्याची प्रेरणा नक्कीच मिळाली असेल.

तुम्हाला ध्येयनिश्चिती करून ती पूर्ण करण्याबाबत आणखीन जबरदस्त टिप्स हव्या असतील तर नक्कीच ह्या ब्लॉगवर कमेंट करा.

लवकरच मी तुमच्या सगळ्यांसाठी ध्येयनिश्चितीचा तीन तासाचा एक जबरदस्त लाईव्ह वर्कशॉप घेऊन येत आहे ,जो तुम्हाला आयुष्यात वेगाने प्रगती करण्यासाठी नक्कीच मदत करेल.

वर्कशॉप अटेंड करण्याची प्रबळ इच्छा निर्माण झाली असेल तर कंमेंट मध्ये ध्येनिश्चिती असं टाईप करा.



वेळेचं, पैशाचं आणि निवडीचं स्वातंत्र्य मिळवून तुम्ही तुमचं उर्वरित आयुष्य स्वतःच्या मर्जीने जगावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.

तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की कळवा.


साडेसहा हजार समविचारी ध्येयवादी लोकांची कम्युनिटी जॉईन करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आमचा मिशन ऑनलाइन स्वराज्य हा ग्रुप नक्की जॉईन करा

https://www.facebook.com/groups/884927385661089/?ref=share

ऑनलाईन स्वराज्य हा आपल्या सगळ्यांचा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो आपण मिळवणारच!




३६ टिप्पण्या:

  1. खुपच सुंदर ब्लॉग सर

    खरं तर ध्येय म्हणजे काय...हे खर्या अर्थाने तुमच्या मुळे कळाले

    दिवसाच्या धेया पासुन , महिन्याचे , 3 महिन्याचे , वर्षाचे , तीन वर्षाचे , 5 वर्षाचे धेय काय असावे हे तुम्ही खुप छान समजून सांगितले...आपल्या कोर्स मधे.
    धेय लिहण्याचे नियम कळाले. रोज ते वाचल्याने प्रचंड सकारात्मक ऊर्जा मिळते. या दहा महिन्याच्या प्रवासात प्रचंड शिकायला मिळाले सर, रोज प्रतेक पाऊल हा धेयाच्या दिशेनेच पडतोय...
    तुमच्या सतत च्या मार्गदर्शनातून धेय अजुन दिवसेंदिवस स्पष्ट होतात...व जवळ येऊ लाग्ल्यात.

    एक गोष्ट जी मला तुमची खुप आवडली ती म्हणजे कोणतीही कृती करताना नेहमी स्वतहाला एक प्रश्न विचारा असे तुम्ही सांगता..
    " ही कृती मला माझ्या धेयाच्या जवळ नेणारी आहे की दुर? "
    त्यामूळे खुप फायदा होतोय. आपल्या धेयाच्या दिशेन जाताना भरकट नाही.

    Thank you so much sir...तुमचे मार्गदर्शन खुप मौल्यवान आहे.

    धेयनिश्चिती

    तुमच्या लाइव workshop ची वाट पाहतोय
    नक्किच पुन्हा एक नविन सकार्त्मक दृष्टिकोण मिलेळ या बद्दल पुर्ण खात्री आहे.

    पुढील वाटचालीच तुम्हाला खुप सुभेच्छा
    अतिशय प्रेरणादायी ब्लॉग.

    Online स्वराज्य हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो आपण मिळवणारच

    उत्तर द्याहटवा
  2. अप्रतिम ब्लॉग sir. ज्यांचे ध्येय नसतात त्यांचे achievement कमी असतात.ध्येयाची clarity का महत्वाची हे तुमच्या मार्गदर्शनामुळे कळाले. Thank you so much sir 🙏

    उत्तर द्याहटवा
  3. धन्यवाद सर. सकारात्मक लोकांबरोबर काम करीत असल्याचा आनंद मिळतोय. Goal Setting Challenge 🤝🙏👍

    उत्तर द्याहटवा
  4. नक्कीच सर दिल्याशिवाय प्रगती होऊ शकत नाही

    उत्तर द्याहटवा
  5. Definately captian is very important to Drive our Ship, So our Destination should be clear to reach when and How
    ध्येयनिश्चिती

    उत्तर द्याहटवा
  6. Great blog Sir. जर आपल्याला आपल्या आयुष्याला काही अर्थ द्यायचा असेल तर ध्येय निश्र्चित करायलाच हवं. कृतार्थ आयुष्याची गुरुकिल्ली आहे ती.

    उत्तर द्याहटवा
  7. खूप सुंदर मार्गदर्शन सर. विचार करायला भाग पडलात तुम्ही .

    उत्तर द्याहटवा
  8. खूप सुंदर ब्लॉग आहे आणि ह्याची सवय आम्हाला आधीपासून तुम्ही दिलेली आहे .सातत्याने पुन्हा पुन्हा वाचावासा वाटतो कारण आम्ही जी ध्येय लिहिलेली आहेत त्याला पुन्हा एनर्जी मिळण्यासाठी हा ब्लॉक नेहमी वाचावासा असा इतका सुंदर लिहिला गेला आहे.

    उत्तर द्याहटवा
  9. खूप सुंदर ब्लॉग .ए पासून बी पर्यंत जाण्यासाठी खूप छान मार्गदर्शन थँक्यू सर.

    उत्तर द्याहटवा
  10. तुमचे ब्लॉग वेचले की आमच्या धेयांना ऊर्जा मिळते.

    उत्तर द्याहटवा
  11. तुमचे ब्लॉग वेचले की आमच्या धेयांना ऊर्जा मिळते.

    उत्तर द्याहटवा
  12. As usual superb Sir,

    तुम्ही लिहिलेल्या या ब्लॉग मधील शब्द आणि शब्द मनाला पटतो, ध्येय निश्चित करणं गरजेचं आहे, आणि त्या साठी तुमची मदतही हव्ये.



    ध्येयनिश्चिती

    उत्तर द्याहटवा
  13. सर मी तर कधीच माझीही काही ध्येय आहेत याचा विचारही केला नव्हता पण तुमच्या blue print course मुळे मला माझे ध्येय स्पष्ट झाले इसके नन्ही तर तुमच्या मार्गदर्शनामुळे आम्ही लवकरच आमच्या ध्येयापर्यंत नक्कीच पोहचू.
    Thank you so much sir

    उत्तर द्याहटवा
  14. खूप छान सर ध्येयाशिवाय जीवनाला अर्थच नाही.खूप सुंदर ब्लॉग लिहीला आहे thank you सर

    उत्तर द्याहटवा
  15. खूप सुंदर ब्लॉग सर. Goal setting he fakt tumachyabarobar shikav. It's a life changing turning point. Thank you so much Sir.

    उत्तर द्याहटवा
  16. उत्कृष्ट ध्येय पूर्ती सर खूपच छान पुन्हा उजळणी झाली 🙏🙏🌹🌹

    उत्तर द्याहटवा
  17. खूपच सुंदर ब्लॉग सर,ध्येय म्हणजे काय,ती कशी लिहायची आणि कशी पूर्ण करायची हेही तुमच्याकडूनच शिकतोय.खूप खूप thank you सर.

    उत्तर द्याहटवा
  18. खूपच सुंदर ब्लॉक सर, ध्येय कशी लिहायची, ती साध्य करण्यासाठी कन्सिस्टन्सी कशी ठेवायची हे तुमच्या कडूनच शिकतो आहे,

    उत्तर द्याहटवा

आयुष्यावर प्रभुत्व मिळवण्यासाठी स्वतः वर प्रभुत्व मिळवा - ह्या मूलभूत गोष्टींवर काम करा

आयुष्य हातातून चाललंय असं तुम्हाला वाटतं का ? तुमच्या सवयींवर तुमचा ताबा नाही असं तुम्हाला वाटतं का? सतत चिडचिड होते का ? तुमची करिअर कुठेत...