तुम्हाला देखील 2022 ची जबरदस्त सुरुवात करायची आहे का?
तुमच्या प्रगतीचा आणि यशाचा वेग दुप्पट करून एक आनंदी आणि आरोग्यपूर्ण आयुष्य जगायचे आहे का?
यापैकी कुठल्याही प्रश्नाचे उत्तर जर 'हो' असेल तर हा ब्लॉग तुमच्यासाठीच आहे.
नमस्कार! माझं नाव केतन गावंड, पर्सनल सक्सेस कोच.
मी आजपर्यंत तीन लाखापेक्षा जास्त ध्येयवेड्यांना ध्येयसिद्धीचे प्रशिक्षण दिले आहे.
तुम्ही देखील २०२२ मधले तुमचे सर्वोत्तम ध्येय साध्य करावे अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे.
आज आपण २०२२ ला जबरदस्त बनवण्याच्या काही मूलभूत स्ट्रॅटेजी समजून घेणार आहोत .
मला अजूनही आठवतंय ,2020 ची सुरुवात झाली आणि त्या वर्षावर करोनाचे सावट अगदी सुरुवातीपासूनच गडद होत होतं.
बघता बघता सगळीकडे लॉकडाऊन लागला.
काही आठवड्यात परिस्थिती पूर्ववत होईल अशी अपेक्षा करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या वाट्याला निराशाच आली .
अठरा महिने झाले तरी अजून देखील परिस्थिती पूर्ववत झालेली नाही.
बऱ्याच जणांचे जॉब गेले, कितीतरी जणांना आपले व्यवसाय बंद करावे लागले आणि कित्येक वर्ष रुळावर चालणारी गाडी कार शेड मध्ये बंद करून ठेवण्याची वेळ आली.
2021 ची सुरुवात होताना एक वेगळी आशा, एक वेगळी उमेद आपल्या सगळ्यांकडे होती पण दुर्दैवाने तसं काही झालंच नाही.
परिस्थिती बिघडली आणि पुढच्या लोकडाऊनला आपल्याला सामोरे जावे लागले.
आपल्या सगळ्यांच्या नशिबाने वॅक्सिनेशन सुरू झालं आणि आता परिस्थिती बऱ्यापैकी आटोक्यात आली आहे .
मानवी मन हे प्रचंड आशावादी आहे आणि २०२२ कडून आपल्या सगळ्यांच्या जबरदस्त आशा आहेत , आणि हो , या आशेला आपण सत्यात उतरवू शकतो .
हीच ती योग्य वेळ आहे , योग्य नियोजनाने आपण 2022 ला एक अभूतपूर्व वर्ष बनवू शकतो
२-दुप्पट यश
०-विना तणाव विना चिंता
२-दुप्पट फिटनेस
२-दुप्पट आनंद
अशी माझी 2022 ची व्याख्या आहे.
पण ते साध्य करण्यासाठी आपल्या सगळ्यांना जबरदस्त तयारी करण्याची गरज आहे.
परिणामकारक नियोजन
आयुष्यात कोणती व्यक्ती अपयशी होण्याचं नियोजन करत नाही पण ते नियोजन करत नाहीत म्हणून फेल होतात
आज आपण 2022 च्या नियोजनाला सुरुवात करणार आहे
- पहिली पायरी - वार्षिक नियोजन
पोहोचायचं कुठे हे स्पष्ट असतं त्यावेळी निर्णय आपोआपच घेतले जातात
31 डिसेंबर 2022 पर्यंत तुम्हाला कुठे पोहोचायचे याची स्पष्टता जर तुमच्या मनामध्ये आली तर त्या ठिकाणापर्यंत, ध्येयापर्यंत पोहचण्याचे नियोजन तुम्ही व्यवस्थित करू शकता.
मग हे काही बेसिक प्रश्न , मूलभूत प्रश्न स्वतःला विचारायला सुरुवात करा.
2022 मध्ये असं काय झालं तर मी स्वतःला यशस्वी मानेन?
दीर्घकाळ नियोजन ही यशस्वी व्यक्तींची खासियत आहे
ज्यावेळी तुम्ही प्लॅनिंग करतात तेव्हा तुमच्या समोर दिसत असलेल्या अनेक पर्यायांपैकी तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्याचे निवडक पर्याय तुम्ही निवडता आणि ही यशाची पहिली गुरुकिल्ली आहे .
आपोआपच तुमची संपूर्ण ऊर्जा ,वेळ कौशल्य तुम्ही त्या ध्येयाच्या दिशेने वापरायला सुरुवात करता आणि त्यामुळे तुम्ही ध्येयापर्यंत पोहोचण्याची संभावना वाढते.
एकदा ध्येय ठरले की ज्या प्रमाणे आपल्याला ते पूर्ण करण्याचे मार्ग दिसतात तसेच, संभाव्य अडथळ्यांचीदेखील जाणीव आपल्याला होऊ लागते आणि मग आपण प्लॅन B बनवतो . एका वास्तववादी नियोजनाची सुरुवात इथूनच होते .
काही प्रश्न मी तुम्हाला विचारायला सुरूवात करतो त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करा.
१) असं काय झालं तर तुम्हाला २०२२ प्रचंड यशस्वी झाल्यासारखे वाटेल.
या प्रश्नावर पाच ते दहा मिनिटं विचार करा , कदाचित येणारी उत्तर ही तुमच्या 2022 च्या नियोजनाला दिशादर्शक ठरतील.
त्यानंतर बरोबर 12 महिन्यानंतर तुमचा आयुष्य कसं असेल याची कल्पना मनातल्या मनात करा.
गेले बारा महिने (२०२२ चे ) जबरदस्त होते कारण......
यापुढे तुमच्या मनात जे काय येतंय ते लिहायला सुरुवात करा .
तुम्ही साध्य केलेली सगळी छोटी-मोठी ध्येय , तुम्हाला आलेले अनुभव आणि त्यातून तुम्हाला मिळालेला प्रचंड समाधान.
हे सगळं बघितल्यावर या एका प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करा ,
जर तुम्ही एक आणि फक्त एकच गोष्ट 2022 मध्ये साध्य करू शकलात , ज्यामुळे तुम्हाला स्वतःचा प्रचंड अभिमान वाटेल ती गोष्ट कोणती असेल?
ती अशी कोणती एक गोष्ट आहे ती साध्य केल्याने माझ्या संपूर्ण आयुष्यावर तिचा सगळ्यात जास्त सकारात्मक परिणाम जाणवेल?
अशी कोणती एक गोष्ट आहे जी मला मनापासून साध्य करायची होती पण ती मी अजूनही केलेली नाही ?
मला आयुष्यात खरंच अगदी कळकळीने कोणती गोष्ट हवीच आहे ?
अशी कोणती गोष्ट आहे जीची मला प्रचंड भीती वाटते ?(बऱ्याच वेळा ज्या गोष्टी तुम्हाला सगळ्यात जास्त भीती वाटते तीच गोष्ट तुम्हाला करण्याची जास्त गरज असते)
दुसरी पायरी -काम कमी दम जास्त
तुम्हाला कमीतकमी गोष्ट करण्याची गरज आहे ज्याचा प्रभाव खूप जास्त असेल. बरेच लोक याच्या अगदी विरुद्ध करतात - गॅरी केलर लेखक द वन थिंग
तुम्ही आज पॉईंट A ला उभे आहात आणि पॉइंट B (तुमचे No १चे ध्येय ) पर्यंत पोहोचण्याचे मार्ग तुमच्याकडे आहेत , पण ह्या सगळ्यातला कोणतातरी एक मार्ग सगळ्यात जास्त प्रभावी आहे.
तुम्हाला जर एखादं मोठं झाड जमीनदोस्त करायचं असेल तर एकाच ठिकाणी कुर्हाडीने तुम्हाला सातत्याने घाव घालायला लागतात. तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी बरेच घाव घातले तर कदाचित तुमचं ध्येय पूर्ण होणार नाही.
माझ्या अनुभवातना मी तुम्हाला एकच गोष्ट सांगू शकतो की,सगळ्यात कठीण गोष्ट ही ती एक गोष्ट शोधणे आहे आणि एकदा तुम्हाला ती सापडली की तुम्हाला बाकी काहीही न करता, झापड लावून फक्त तीच गोष्ट सातत्याने सारखी सारखी करत राहणं अतिशय महत्त्वाचं आहे.
जर तुमचे नियोजन योग्य असेल तर ही एक गोष्ट तुम्हाला दुप्पट, चौपट, दहापट, शंभरपट रिझल्ट देऊ शकते . याची स्पष्टता तुम्हाला असेल तर तुम्ही फार कमी वेळात तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकता.
ती कृती शोधण्यासाठी तुम्ही अर्धा ते एक तास वेळ द्या
बऱ्याच वेळेला सुरुवातीला तुमच्या डोक्यात येणाऱ्या कल्पना कदाचित तेवढ्या प्रभावी नसतात , पण तेव्हा तुम्ही दहा, पंधरा ,वीस ,पंचवीस, तीस गोष्टी लिहाल आणि त्याला परत एकदा पारखून बघाल तेव्हा कदाचित तुम्हाला तुमची ती एक गोष्ट सापडेल.
गेले दीड वर्ष मी जे काम करतोयत्यातून माझ्या लक्षात आलेली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला सातत्याने लोकांना ध्येयनिश्चितीपर्यंत पोहोचवण्याचे वर्कशॉप करण्याची गरज आहे आणि ह्या वर्षात ते मी जास्तीत जास्त मी करणार आहे.
ही एक गोष्ट माझ्या मनामध्ये , माझ्या कौशल्यांमध्ये आणि माझ्या सवयीमध्ये आमूलाग्र बदल घडून आणेल आणि मला माझ्या ध्येयापर्यंत पोचण्यासाठी मदत करेल.
एक गोष्ट कशी असावी निवडण्यासाठी काही परिमाण मी तुम्हाला देतो.
-ह्या गोष्टीमुळे मोमेंटम निर्माण झाला पाहिजे, गती निर्माण झाली पाहिजे.
-तुमच्या विचारसरणीमध्ये या एका गोष्टीमुळे आमूलाग्र बदल घडला पाहिजे.
-तुम्हाला बऱ्यापैकी प्रगती जाणवली पाहिजे.
आणि तुमचे विकल्प कमी झाले पाहिजे.
योग्य विचारसरणी - योग्य कृती - जबरदस्त रिझल्ट
चुकीची विचारसरणी- चुकीची कृती- सामान्य किंवा अतिसामान्य असे रिझल्ट
तिसरी पायरी - पहिल्या १२ आठवड्याचे नियोजन
भविष्याची सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे ते एकावेळी एक दिवस असे करत करत उलगडते. एकावेळी एक दिवस याच गतीने आपल्या दिशेने येते
भारतीय माणसाची सगळ्यात मोठी खासियत म्हणजे रिव्हर्स इंजिनिअरिंग जगभरात कुठलंही औषध येऊ दे , कुठलीही टेक्नॉलॉजी येऊ दे त्याला रिव्हर्स इंजिनीरिंग करून कमीत कमी वेळात अस्तित्वात आणण्याचा कौशल्य भारतीय माणसांमध्ये आहे आणि त्याच कौशल्याचा वापर करून आपण आपल्या ध्येयाला साध्य करू शकतो.
आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जे लोकं नवीन वर्षाची ध्येय एक तारखेला ठरवतात ते आठ तारखेच्या आत आपले ध्येय कचऱ्याच्या डब्यात टाकून देतात .
अश्या व्यक्तींकडे ऊर्जा असते , इच्छा असते पण नियोजनाचा आणि सातत्याचा अभाव असतो .
जगभरातल्या संशोधनातून हे सिद्ध झालं आहे की १२ आठवड्याचे नियोजन तुम्हाला जास्त चांगले रिझल्ट्स मिळवून द्यायला मदत करू शकते .
प्रत्येक १२ आठवडे म्हणजे जणू काही १२ महिनेच आहेत या आवेशाने नियोजन करा
जेवढ्या छोट्या छोट्या ध्येयामध्ये त्यांचे विभाजन करता येईल तितकं करा .
१२ आठवड्याचे (३ महिन्यांचे ) - ३ सगळ्यात महत्वाची ध्येय
प्रत्येक महिन्याचे - ३ सगळ्यात महत्वाची ध्येय
दर आठवड्याचे - ३ सगळ्यात महत्वाची ध्येय
रोजचे -३ सगळ्यात महत्वाची ध्येय
दर तीन महिन्यांनी हा exercise पुन्हा करा .
अश्या प्रकारे तुम्ही तुमच्या वार्षिक ध्येयापर्यंत पोहोचू शकाल , २०२२ ला एक अभूतपूर्व वर्ष बनवू शकाल.
ऐकताना ह्या सगळ्या गोष्टी फार सोप्या वाटतात पण जेंव्हा आपण ध्येयाचा पाठपुरावा करण्यास सुरुवात करतो तेंव्हा बरेच अडथळे येतात.
ह्या अडथळ्यांवर मात करून ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला योग्य मार्गदर्शन , योग्य वातावरण आणि योग्य कृतीची गरज असते.
माझ्या २१ वर्षाच्या अनुभवातून आणि ऑनलाईन स्वराज्यातील असंख्य ध्येय वेड्या साथीदारांच्या मदतीने आम्ही ऑनलाईन स्वराज्य सुपर ग्रोथ सिस्टीमची निर्मिती केली आहे जी तुम्हाला ह्या तीनही गोष्टी मिळवून देण्यासाठी सक्षम आहे.
तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पाहोचवुन २०२२ ला जबरदस्त वर्ष बनवण्यासाठी मी तुमच्या साठी एक २ तासांची कार्यशाळा घेऊन आलो आहे .
खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही स्वतःची जागा निश्चित करू शकता.
तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटलं ते मला कमेंट्स द्वारे नक्की कळवा.
तसेच १०००० समविचारी आणि ध्येय वेड्या उद्योजकांची मिशन ऑनलाईन स्वराज्य ही कम्युनिटी नक्की जॉईन करा













सर, खरंच खुप powerful blog... आणि अगदी योग्य वेळी माझ्या वाचनात आला...डोक्यात येणाऱ्या सगळ्या कल्पना लिहा आणि plan B तयार ठेवा, त्या बरोबरच imperfect action घ्या ह्या तुमच्या तीन टिप्स मौल्यवान... आभार
उत्तर द्याहटवाThank you 🙏
हटवाGOOD 1 AND HIGHLY MOTIVATING
हटवाखूपच छान आणि नक्कीच 2022 प्लांनिंग करताना तुमच्या या टिप्स खूप छान उपयोगी ठरतील.
उत्तर द्याहटवाखूपच सुंदर blog आहे सर
उत्तर द्याहटवाखर तर आम्ही खूप भाग्यवान आहोत 2020 मध्ये जेव्हा लॉक डाउन झाले त्या सुरूवातीच्या काळापासून तुमचे मार्गदर्शन आम्हाला मिळू शकले...
लॉक डाउन मुळे offline व्यवसाय पूर्ण बंद झाल्या मूळे खरतर पुढचा मार्ग कठीण होता...
परंतु online स्वराज्यात आल्यामुळे ऑनलाइन जगातील अनेक नवीन संधी तुमच्यामुळे दिसू शकल्या...
हे क्षेत्र नविन असल्याने स्वतः ला नव्याने उभारण्याची गरज होती...आणि त्यासाठी आवश्यक कौशल्य तुमच्यामुळे विकसित होऊ शकली...
Blog लिहणे , podcast , videos बनवणे , online आपली community उभारणं... हेच करता करता ...तुमचे प्रेरणादायी विचार सकारात्मक वातावरण ,प्रेरणा दायी पुस्तके व्यक्तिमत्त्व विकास ही
खूप छान पध्दतीने झाला...याचा कधी स्वप्नातही विचार केला नव्हता...
स्पष्ट ध्येय आणि त्यासाठी नियोजन आणि आवश्यक action कशा घ्यावे हे तुम्ही खूप सुंदर पद्धतीने शिकवले सर
त्यामुळेच 2021 मध्ये onine माध्यमातून 1 लाख पर्यंत कमवू शकले...
आणि तुमचे मार्गदर्शन सोबत आहे 2022 मध्ये 10 लाख नक्कीच मिळवू सर
Thank you so much Ketan sir🙏
And online स्वराज्य
Feeling so blessed to be part of this beautiful community
Thank you so much Shraddha
हटवाJabardast sir
उत्तर द्याहटवाThank you
हटवाkhupach sundar blog aahe
उत्तर द्याहटवाthanku sir tumchya guideans and support mulech mala khup shikaila ani swatala kai have aahe te olakhata yet aahe thanku thanku thanku i m greatful for that.
Thank you so much 🙏
हटवाPowerful 2022 होईल ह्यात शंकाच नाही सर👍🙏🙇♀️All the best.
उत्तर द्याहटवाYes ...all the best 👍
हटवाVery deep knowledge. खरच परत परत वाचण्यासारखा लेख आहे. माझ्या आयुष्यातील ध्येयाशी एकनिष्ठ राहाण्यासाठी याची फार मदत होईल हे नक्की. मनःपूर्वक धन्यवाद for the golden words of wisdom.
उत्तर द्याहटवाThank you so much मैथिली ..means a lot
हटवाखूप धन्यवाद सर🙏
उत्तर द्याहटवासातत्याने तुम्ही 2021 मधे आम्हाला पुढे जाण्यासाठी प्रेरणा देत राहिलात. आणि आता अशी वेळ आलेली आहे की काहीच न करता मी कधीच स्वस्थ बसू शकत नाही. तुम्ही जे प्रश्न स्वतःला विचारायला सांगितलेले आहेत पहाटेच्या वेळेस मेडिटेशन नंतर एका फोकस आवर मध्ये त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे लिहून काढेन. आणि तुमचं मार्गदर्शन सातत्याने आहेच. त्यामुळे 2022 हे वर्ष सुद्धा तुमच्या आणि आमच्या मनातल्या इच्छा आकांक्षा स्वप्ने पूर्ण करणारं असेल.
Thank you thank you thank you very much sir 🙏🙏🙏🙂
Thank you sunita tai ...all the best 👍
हटवाखूप खूप धन्यवाद सर,सन 2022 हे निर्णायक आणि यशस्वी बनविण्याकरता आपल्या मार्गदर्शनाचा खूप फायदा होईल।।
उत्तर द्याहटवाधन्यवाद 🙏
हटवासरांना एकदा का ऐकल किंवा त्यांचा ब्लॉग वाचला की motivation ने आपण पूर्ण न्हाऊन निघतो
उत्तर द्याहटवाGreat सर
सद्या तरी सातत्य राखायचा प्रयत्न सुरू आहे
नेमके हेच सातत्य कामांच्या धबडग्यात राखले जात नाही
तुमच्या सर्व सुचना, मार्गदर्शन घेउन 2022 मध्ये उत्कृष्ठ performance करायचा प्रयत्न करू
नक्की सर ... धन्यवाद
हटवाही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवासर तुमच्या सहवासाने व आपल्या स्वराज्यसारथी यांच्या मदतीने खरच आमच्या जीवनाच सोनं झालं आहे तुम्ही जो काही विश्वास आमच्यामध्ये निर्माण केलेला आहे त्यामुळे मी एकच बोलू शकतो की आम्ही काही ही करू शकतो. येणार्या वर्षात तुमच्या सर्व सूचना मार्गदर्शन घेऊन आम्ही नक्कीच
उत्तर द्याहटवाआपले स्वराज्य निर्माण करणार.. धन्यवाद सर धन्यवाद.
धन्यवाद धनाजी सर
हटवानक्कीच सर आपल्या मार्गदर्शनाखाली येणारे वर्ष जबरदस्त होणार आहे, थँक्स सर
उत्तर द्याहटवानमस्कार
उत्तर द्याहटवाSir अतिशय सुंदर, माहितीपूर्वक blog. हा blog वाचून नवीन ऊर्जा मिळाली. तुमचे, blog, वर्कशॉप, स्कोप डे, आपल्या मिटिंग यातून नेहमीच प्रेरणा मिलते sir. खूप सुंदर उदाहरणं सांगितलं sir झाडाच. एकाच जागेवर मारलं तर तुटेल. सातत्याने एकच गोष्टीवर काम केल तर यश नक्की च मिळत हे आम्ही अनुभवतोय sir.
तुम्ही सांगितलेल्या सर्व tips, प्रश्न लिहून 2022 च planing करते sir. खूप खूप धन्यवाद sir 🙏🙏🙏🙏🙏
सर्वांनी जरूर वाचावा असा हा blog 👌🙏
हा, ब्लॉग म्हणजे एक वर्कशॉपच आहे. तुम्हीं इथे सांगितलेल्या गोष्टी प्रामाणिकपणे केल्या आणि मग कृती केली तर निश्चितच २०२२ ला अभूतपूर्व वर्ष बनवू शकतो.
उत्तर द्याहटवाThank you so much sir इतक्या सुंदर मार्गदर्शनासाठी.
God bless