सोमवार, ९ मे, २०२२

विश्वास फेसबुक किंवा गुगल एडवर्टाइजमेंट ने विकत घेता येत नाही.


 तुम्ही तुमचा बिजनेस तेव्हाच वाढवू शकता जेव्हा तुम्ही ठामपणे भविष्यात येणाऱ्या बिझनेसची गॅरंटी देऊ शकता. 


लोकं तुमच्यासोबत तेंव्हाच व्यवहार करतील जेव्हा ते तुमच्यावर विश्वास ठेवतील. 


 दुर्दैवाने विश्वास फेसबुक किंवा गुगल एडवर्टाइजमेंट ने विकत घेता येत नाही. 


विश्वास फक्त तुम्ही इतरांच्या आयुष्यात योगदान दिल्यानेच तुम्ही निर्माण करू शकता. 


फक्त तुमच्या ज्ञानाचे झेंडे लावून फायदा नाही, तुम्ही दिलेल्या माहितीच्या मदतीने त्यांच्या आयुष्यातले प्रॉब्लेम दूर झाले पाहिजेत किंवा त्यांची स्वप्नं पूर्ण करायला तुम्ही मदत केली पाहिजे. 


            विश्वास जिंकणं हे तुम्ही माणूस म्हणून कोण आहात त्याच्याशी निगडित आहे. 


माझ्या अनुभवातून मी तुम्हाला एकच गोष्ट सांगेन तुमचा बिझनेस वाढवण्यासाठी स्वतःवर सातत्याने काम करणं खूप महत्त्वाचं आहे. 


विनम्र रहा, जमिनीवर रहा व फोकस ने तुमच्या आवडत्या क्षेत्रात काम करा. 


इतरांचे  प्रॉब्लेम समजून घ्या आणि ते सोडवण्यासाठी प्रचंड मेहनत करा, ते करताना चूक झाली तर चूक कबूल करायलाही तयार रहा. 


           बरेच जण आपल्या व्हेकेशनचे  किंवा कुठल्यातरी झगमगत्या मिटींगचे फोटो शेअर करून मी किती यशस्वी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतात, पण मी माझा अनुभव तुम्हाला सांगतो, लोकं तुम्हाला आर पार बघू शकतात. तुमचे मनसुबे तुमच्या डोळ्यातून कळत- नकळत डोकावत असतात. (दुर्दैवाने ते तुम्हाला कळत नाहीत) 


         तुम्ही अस्सल शंभर नंबरी सोनं आहात की; इमिटेशन ज्वेलरी हे तुम्ही काय बोलताय यावरून  लोकं ठरवत नाहीत तर तुम्ही काय आहात त्यावरून ठरवतात.

म्हणूनच मला प्रामाणिकपणे वाटतं की, आपण सगळ्यांनी स्वतःवर निरंतर काम करत राहिलं पाहिजे. 

मग आपण सगळे स्वतःचे व्हायब्रेशन उच्च पातळीवर कसे घेऊन जाणार? कोणत्या गोष्टी आपण सातत्याने करणार ज्याच्या मदतीने आपल्या प्रत्येक कृतीतून एक अदृश्य विश्वास निर्माण होईल? 


          मी गेले कित्येक वर्षें एक छोटासा प्रामाणिक प्रयत्न करतोय आणि आता तुमच्या सगळ्यांच्या मदतीने गुढीपाडव्यापासून(२०२१)  आपण रोज सकाळी 'स्वराज्य मिरॅकल मॉर्निंग लाईव्ह' करायला सुरुवात केली आहे. गेले ३९२ दिवस आपण सातत्याने स्वतःवर काम करतोय आणि त्यामुळे अनेकांना आपल्यातले बदल जाणवू लागलेत. 


         रोज पहाटे बरोबर पाच वाजल्यापासून सव्वा सहा पर्यंत आपण अशा काही मूलभूत गोष्टींवर ३९२ दिवस झाले आपण सातत्याने काम करतोय, त्यामुळे इंचा-इंचाने कणा-कणाने आपण स्वतःमध्ये सुधारणा करत जातोय  आणि जेव्हा इतरांना ते लक्षात यायला लागतं तेव्हा तुमची क्रेडिबिलिटी आपोआप वाढते, तुमचा ब्रँड आपोआपच समृद्ध व्हायला लागतो. 


       तुम्हाला देखील या मॉर्निंग रिवर्स चा अनुभव घ्यायचा असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि आमच्या या उपक्रमात सहभागी व्हा.

https://t.me/+pqDR8nZ8eqM5NDNl


       महिनाभर रोज ह्या गोष्टी करून बघा आणि स्वतःमधील बदल अनुभवा. (जो तुम्हाला इतर लोकं येऊन सांगतील.) 


ऑनलाईन स्वराज्य नक्की काय आहे हे जाणून घेण्यासाठी मी एक व्हिडिओ share करत आहे तो नक्की बघा आणि जर ह्या सेल्फ डेव्हलोपमेंट च्या प्रवासात तुम्हाला योग्य व्यक्तींची साथ हवी असेल तर नक्की मला संपर्क करा 

https://videos.groovevideo.com/5f08f964609eab00131936ed/groovevideo-a8c21baafaf3db3d11151610a0faf7f7.mp4


धन्यवाद 

केतन गावंड 

९६१९३१३०३४

४ टिप्पण्या:

  1. खुप छान लिहलं आहे सर

    अगदी खरं आहे व्यवसाय मध्ये लोकांना जिंकण्यासाठी जाहिराती पेक्षा विश्वास महत्त्वाचा असतो आणि हा विश्वास आपण मिळवला तर हीच लोक खूप आत्मीयतेने आपली जाहिरात करतात...

    आपल्या ज्ञाना पेक्षा आपण ते ज्ञान कसे देतो व लोकांचे कोणते प्रॉब्लेम सोडवतो हेही तितकेच महत्वाचे...

    हे सर्व तुमच्यामुळे आम्ही शिकू शकलो सर
    आणि सतत या सिस्टीम सोबत तुमच्या सोबत आम्हाला तुम्ही जोडून ठेवलं आहे

    आमचे vibrationउच्च पातळीवर नेण्यासाठी सातत्याने प्रयत्न शील आहात
    त्यामुळे खूप सकारात्मक बदल आयुष्यात होत आहेत

    थोडक्यात पण खुप महत्त्व पूर्ण माहिती
    खूप सुंदर ब्लॉग

    Thank you so much sir🌹🙏

    उत्तर द्याहटवा
  2. खूपच सुंदर ब्लॉक सर 🙏 आणि खर आहे कि दोन वर्षांमध्ये आपण जो विश्वास संपादन केला आहे आणि त्यामुळेच आपली ही प्रगती आहे ही अगदी उच्च पातळीवर गेली आहे आणि सदैव तुमची साथ असल्यामुळे आम्हाला त्या गोष्टी शक्य झाल्या आहेत. त्याचबरोबर morning rituals खुपच आत्मविश्वास वाढला आहे. आमची व्हायब्रेशन्स मोठ्या पातळीवर गेलेले आहेत. त्यामुळे सकारात्मक बदल घडून आलेले आहेत. 🙏🙏धन्यवाद सर

    उत्तर द्याहटवा
  3. खूपच अप्रतिम ब्लॉग सर 🙏 तुमच्यामध्ये खूपच आत्मविश्वास वाढलेला आहे आणि सकारात्मक बदल घडलेली आहेत. या सगळ्याचे श्रेय त्यालाच आहे. या ब्लॉग मध्ये जर आपण इतका सविस्तर सगळं लिहून आणि जो व्हिडीओ आपण दिलेला आहे त्या आपल्या सोडून पण या सगळ्या गोष्टी माहिती ही महती तुम्ही सांगितलेली आहे सर खूपच ग्रेट आहात. 🙏🙏

    उत्तर द्याहटवा

आयुष्यावर प्रभुत्व मिळवण्यासाठी स्वतः वर प्रभुत्व मिळवा - ह्या मूलभूत गोष्टींवर काम करा

आयुष्य हातातून चाललंय असं तुम्हाला वाटतं का ? तुमच्या सवयींवर तुमचा ताबा नाही असं तुम्हाला वाटतं का? सतत चिडचिड होते का ? तुमची करिअर कुठेत...