१- तुम्हीं ध्येयं ठरवली आहेत पण ती साध्य करण्यात अडथळे येताहेत का ?
२- तुम्हीं ध्येय साध्य करण्यासाठी लागणारी योग्य कृती करण्यात कमी पडत आहात का ?
३- कृती करण्यासाठी हवी असलेल्या सकारात्मक ऊर्जेचा अभाव तुम्हाला जाणवतो का ?
वरीलपैकी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर हो असेल , तर हा ब्लॉग तुमच्यासाठीच आहे .
नमस्कार माझं नाव केतन गावंड, माइण्डसेट ट्रान्सफॉर्मर, मिशन ऑनलाईन स्वराज्य ह्या प्लॅटफॉर्मचा संस्थापक. येत्या ३ वर्षात १ लाख उद्योजकांचा माइण्डसेट ट्रान्सफॉर्म करून त्यांना त्यांचं सर्वोत्तम साध्य करण्यासाठी तयार करणं हा माझा ध्यास.
चला तर मग सुरुवात करूया .
माइण्डसेट - मानसिकता हा आपल्यासाठी जगाचा आरसा आहे.
गेल्या अनेक वर्षांच्या संस्कारातून, अनुभवातून आणि शिक्षणातून आपण आपली मानसिकता निर्माण केली आहे.
समोर येणाऱ्या प्रसंगातून प्रत्येक जण त्याचा वेगळा अर्थ लावतो आणि वेगळी प्रतिक्रिया देतो, हे देखील संपूर्णपणे आपल्या मानसिकतेवर अवलंबून असते.
आपण काय शिकतो हे खरंतर आपल्या मानसिकतेवरच अवलंबून असतं आणि म्हणूनच यशाची मानसिकता निर्माण करण्यासाठी मी हा ब्लॉग खास तुमच्यासाठी लिहिला आहे .
ह्या ब्लॉगच्या मदतीने तुम्ही,
१- स्वतःची मानसिकता समजून घेऊ शकाल.
२- स्वतःमध्ये प्रामुख्याने कोणत्या गोष्टींवर काम करण्याची गरज आहे ह्याची जाणीव तुम्हाला होईल.
३- आत्मपरीक्षण करून स्वतःची ताकद व अडथळे ह्याची यादी तुम्हीं बनवू शकाल.
४- स्टेप बाय स्टेप काम करून तुम्ही यशस्वी होण्यासाठी ग्रोथ माइण्डसेट निर्माण करू शकाल.
५- तुमची ध्येय जास्त वेगाने साध्य करून आरोग्य, आनंद व समाधान प्राप्त करू शकाल.
बऱ्याच जणांना असं वाटतं की, मानसिकतेत आमूलाग्र बदल घडवणं खूप कठीण आहे.
मी माझ्या अनुभवातून तुम्हाला सांगतो, ग्रोथ माइण्डसेट निर्माण करण्यासाठी आपल्याला एक्सपर्ट असण्याची गरज नाही. आज तुम्ही कुठे आहात ह्याने फार जास्त फरक पडत नाही पण तुम्ही कुठे जाण्याचा विचार करताय त्याने खूप फरक पडतो.
आज माझ्या उर्वरित आयुष्याच्या पहिला दिवस आहे, आज मी जे काही ठरवणार आहे आणि त्या मार्गावर जर मी येत्या पाच वर्ष चाललो तर मी भरपूर काही साध्य करणार आहे, हा विश्वास खूप महत्त्वाचा असतो.
आयुष्यात ग्रोथ माइण्डसेट असेल तर आपण भरपूर प्रगती करू शकतो.
साधारणतः लोकांमध्ये दोन प्रकारचे माइण्डसेट आपल्याला बघायला मिळतात. पहिला 'फिक्स माइण्डसेट' आणि दुसरा 'ग्रोथ माइण्डसेट'.
फिक्स माइण्डसेट असणारी व्यक्ती खालील प्रमाणे विचार करते-
- मला माझ्या मूलभूत शिक्षणातून, माझ्या आई-वडिलांकडून ज्या गोष्टी मिळाल्या त्याच्यापेक्षा वेगळं असं काही मी कमावू शकत नाही.
- एका ठराविक वयानंतर नवीन कौशल्य मी कधीच निर्माण करू शकत नाही.
- माझी आर्थिक परिस्थिती हा नशिबाचा भाग आहे, आता कितीही मोठे प्रयत्न केले तरी मी ती बदलू शकत नाही.
- अपयशामुळे माझे कर्तृत्व मर्यादित होते.
- मी एखाद्या गोष्टीत एकतर चांगला आहे किंवा नाही.
- मला आव्हानं आवडत नाहीत.
- माझ्या क्षमता पूर्वनियोजित आहेत.
- मी टीकेला आणि प्रतिक्रियेला वैयत्तिक घेतो.
- मी जेंव्हा वैतागतो, तेंव्हा प्रयत्न सोडून देतो.
- मला जे येतं मी त्यालाच चिकटून राहतो.
दुसऱ्या बाजूला ग्रोथ माइण्डसेट असलेली व्यक्ती स्वतःला सातत्याने जाणीव करून देते की, मी माझ्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत नवीन गोष्ट शिकू शकतो, स्वतःमध्ये आवश्यक बदल घडवूं शकतो.
ग्रोथ माइण्डसेट असणार्यां व्यक्तीचे काही मूलभूत बिलीफ असतात
- ह्या जगात अशक्य असं काहीच नाही.
- प्रत्येकासाठी प्रत्येक गोष्ट ही मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. (Abundance)
- जग मला मदत करायला नेहमीच तयार आहे.
- अपयश ही पुन्हा नव्याने, जोमाने आणि चांगल्या प्रकारे प्रयत्न करण्याची संधी आहे.
- आव्हानं मला प्रगतीसाठी तयार करतात.
- मला काय मिळतं ते यश नाही, मी जे बनतोय ते यश आहे.
- माझे प्रयत्न आणि दृष्टिकोन माझ्या शक्यता ठरवतात.
- प्रतिक्रिया माझ्यासाठी अत्यंत महत्वाच्या आहेत त्या मला सुधारण्यासाठी प्रवृत्त करतात.
- प्रत्येक गोष्ट समजून घेण्याची माझ्यामध्ये प्रचंड उत्सुकता आहे
- मला अज्ञाताची भीती नाही, त्याला सामोरे जाण्याची माझी तयारी आहे.
- अपमानाची किंवा इतरांच्या टीकेची भीती नाही.
- बदलला सामोरं जाण्यास ते नेहमी तयार असतात.
ग्रोथ माइण्डसेट असणारी माणसं सातत्याने नवीन गोष्टी शिकत राहतात, सातत्याने स्वतःला पुढे जाण्यासाठी प्रवृत्त करत राहतात आणि मी काहीही साध्य करू शकतो हा विचारच त्यांच्यासाठी सगळ्यात मोठी प्रेरणा ठरतो.
ग्रोथ माइण्डसेट असणाऱ्या व्यक्ती इतरांपेक्षा जास्त रिस्क घ्यायला तयार असतात त्यांना कठीण कॉम्प्लेक्स गोष्टींमध्ये जास्त वेळ लागतो याची जाणीव असते आणि त्यासाठी ते सातत्याने मेहनत घ्यायला देखील तयार असतात.
हजारो मैलांचा प्रवास हा एका पावलाने सुरू होतो आणि ते एक पाऊल सातत्याने पुढे टाकत राहण्यासाठी ग्रोथ माइण्डसेट असणारी व्यक्ती नेहमीच तयार असतात.
ग्रोथ माइण्डसेट असणाऱ्या व्यक्तींचा आत्मविश्वास हा इतरांपेक्षा प्रचंड जास्त असतो कदाचित त्यांच्याकडे खूप टॅलेंट किंवा दैवी देणग्या नसते, पण सातत्याने कोणतीही गोष्ट मी साध्य करू शकतो या गोष्टीवर त्यांचा दुर्दम्य विश्वास असतो.
वरील सगळ्या गोष्टी बघितल्यावर तुमच्या देखील हे लक्षात आलं असेल की ग्रोथ माइण्डसेट किती महत्वाचा आहे.
मग तुम्हाला काय वाटतं, तुमचा माइण्डसेट कोणत्या प्रकारचा आहे? फिक्स की ग्रोथ ?
कंमेंट मध्ये नक्की कळवा.
तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला त्याबद्दल नक्की प्रतिक्रिया द्या.
पुढच्या भागात आपण ग्रोथ माइंडेस्ट कसा निर्माण करायचा त्याबद्दल बोलू.
माइण्डसेट बदलूया, सर्वोत्तम मिळवूया !
धन्यवाद
खूपच जबरदस्त माहितीपूर्ण ब्लॉग. Point to point उत्तम मांडणी केली आहे.
उत्तर द्याहटवाThank you for sharing great thoughts 🙏🏻🙏🏻
धन्यवाद !
हटवाअतिशय सुंदर, अर्थपूर्ण ब्लॉग.
उत्तर द्याहटवाThank you so much sir
थँक यू उचिता
हटवाखूप सुंदर ब्लॉग.👍माझा growth mindset aahe. आणि ह्या सकारात्मक community मुळे तो दृढ झाला आहे. Deepest Gratitude to you and to the community people.🙏
उत्तर द्याहटवाखूप छान blog आहे सर👌👌👌
उत्तर द्याहटवाआपली growth होण्यासाठी growth mindset असणे खूप महत्त्वाचे आहे या बद्दल खूप सुंदर मार्गदर्शन केले आहे
खूप प्रेरणादायी शब्द
आणि असे विचार सातत्याने करणे व वातावरणात राहणे
महत्वाचं आहे
ते तुमच्या मूळे ,तुम्ही सांगत असलेल्या छान छान पुस्तकांमुळे ,व ऑनलाइन स्वराज्य community मूळे शक्य झाले आहे
Thank you sir
आमच्या विचारांना सातत्याने खत पाणी देण्यासाठी
व growth mindset रुजवण्यासाठी🙏
खूप प्रेरणादायी blog 🙏
खूप सुंदर
उत्तर द्याहटवाउत्तम लेख! माझाही ग्रोथ माईंडसेट आहे. प्रगतीच्या आणि शक्यतांचा दृष्टीने विचार करणं काम करणं हे मला जमू लागलं आहे!
उत्तर द्याहटवाखूपच छान ब्लॉग सर. आणि सगळ्यात महत्त्वाचं सर तुमच्याकडून ग्रोथ माईंडसेटच आम्ही शिकत आलेलो आहोत, आमच्या सर्वांमध्ये ग्रोथ माईन सेट हा फिक्स झालेला आहे. आणि तुमचे असे ब्लॉग जे थोडेसे आपल्या ध्येयापासून भरकटलेले असतात त्यांना जागेवर आणण्यासाठी खूप महत्त्वाचे ठरतात.
उत्तर द्याहटवाVery informative blog 👌
उत्तर द्याहटवामाझा ग्रोथ माईंड सेट आहे आणि ऑनलाइन स्वराज्यामध्ये योग्य मार्गाने आपल्या माईंड चा ग्रोथ कसा करावा याचं पुरेपूर मार्गदर्शन मिळाल्यामुळे नक्कीच त्याचा उपयोग आमच्या ग्रोथ वर होत आहे.
Thank you 🙏🌷
Yes नेहमीच Growth Mindset आहे.Smile on face असते.धन्यवाद
उत्तर द्याहटवा